(दिनांक १४ जानेवारी ते दिनांक २८ जानेवारी २०२६)
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ज्ञानोत्सवचा किरणोत्सव !



उगवते बिंब पूर्वेसी,
नमन करीत त्या पंचतत्त्वा,
वृक्ष ही झुकले चरणासी !!
रचना –
गीता गद्रेफोटो सौजन्य… श्री चितळे ( लछोरा)

हे सूर्यनारायणा ….
नमन करते तुला देवा
तू तेजाचा शाश्वत ठेवा
होता तुझी कृपादृष्टी
उजळून निघते सारी सृष्टी
येथ फुलते जीवन
पृथ्वीस मिळे नवसंजीवन
हे दृश्य निर्मिले कोणी
आजीवन आम्ही तुझे ऋणी !
वृंदा आशय
🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏

हे सिद्धिविनायक
रे सुमतीदायक
तू सर्वांचा
चालक पालक
घेशी मज कवेत
मानुनी अबोध बालक
हे गणपती,
मज भावे तुझी रीती
तू करशी कृष्णनीती
देऊनी निमंत्रण
देशी दर्शन
हळूच हसे
मनीचा सुदर्शन
तृप्त मी
घडता तव
दोहोंचे दर्शन
विनम्र मी
होता देवा
तव कृपावर्षण!
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु !
https://www.facebook.com/share/r/1awM7Mnes2/
सगुण उपासना का करावी ?


काळा माझा विठ्ठल
तो पंढरपुरचा बाणा
आहे मोठा स्नेहल
तो द्वारकेचा राणा
तो आला पंढरपूरला
जणू रुक्मिणीचा बहाणा
तेथे भेटला पुंडलिकाला
अन् झाला पतित पावना
सेवेत तल्लीन भक्त
दिली त्याला वीट
म्हणे थांब थोडा फक्त
लावले भक्तीचे तीट
सेवेला मायबापाच्या
देवही पाहा भुलला
हाकेला युगायुगांच्या
तो पावतच राहिला.
वृंदा आशय
यावर आपले मत नोंदवा