विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

उत्सव विठ्ठलाचा _ जीवशिव ऐक्याचा !

( निमित्त संत स्मरणाचे – तुकाराम बीज आणि एकनाथ षष्ठीचे ) – संपादक वृंदा आशय

सोहळा जीवभावे समर्पणाचा !

भाग्यसूतात ओवून अंतःकरण | विठ्ठला आज केले तुझे स्मरण | तरावया एकच वर दे माय बापा
तुजकडे येण्यास्तव तुजविण | नको कधी रे दुसरे कारण || – वृंदा आशय

विठो पालवीत आहे
गेली आठ शतके लक्षावधी मराठी मनांवर प्रेमाचे अधिराज्य गाजवणारा पंढरपूरचा श्रीविठ्ठल जसा भक्त-भाविकांना पालवतो आहे, तसाच तो शोधक-अभ्यासकांनाही पालवतो आहे. ज्ञानदेवांनी त्याला विश्व-सौंदर्यातून अनुभवले आहे; नामदेवांनी त्याला प्रेमस्वरूप मानले आहे; तर तुकोबांनी त्याला रंजल्या-गांजल्या जीवांचा सखा-सोयरा म्हणून स्वीकारले आहे. साऱ्या भारतीय धर्मदृष्टीला कर्मठतेतून मुक्त करून तिला जीवनसन्मुख रसिकता प्रदान करणारा लोकसखा कृष्णच विठ्ठल-रूपाने पंढरपुरात नांदतो आहे, अशी सकल संतांची धारणा आहे.

– डॉ. रा. चिं. ढेरे
बहुरुढ बहुजनांचा | संत एकनाथ ||
नाही त्याच्या ठायी | कोणी जगती अनाथ ||
हात जोडून नाथ म्हणाले सुजन हो ऐका |
माझ्या हृदयी दाटून आल्या शतकाच्या हाका
||
जय जय रामकृष्णहरी !

•|ॐ|•

कृतज्ञ आहे मी या काळाची
भेट घडवली ज्याने स्व – स्वरूपाची
भेट झाली ‘मी’त्वाच्या लयात
आता मी शिवाच्या आलयात
गंधवेडी सायली मी छंदवेडी सायली तुझ्या कृपेने फुलले मी गे माय माऊली !

संपूर्ण समर्पण!

शुभं भवतु!

वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु!








श्रीकृष्णार्पणमस्तु !

यावर आपले मत नोंदवा