विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

२० मार्च विशेष

आज जागतिक चिमणी दिन . आज श्री. गुरुदेव दत्ताचे तृतीय अवतार श्री स्वामी समर्थांचा प्रकटदिन. गुरू दत्तात्रयांनी २४ गुरू केल्याची कथा आपणास ज्ञातच आहे.

सृष्टी आपली जननी, खूप पेरते मनी

कान देऊन ऐकूया काय सांगते ही अवनी ?





हैदराबाद मुक्तिसंग्रामात प्रत्यक्ष संघर्षाची मुहूर्तमेढ परभणी जिल्ह्यात रोवली गेली. त्याची सुरुवात महाराष्ट्र परिषदेच्या परतूर अधिवेशनापासून झाली. श्री. मुकुंदराव पेडगावकर व श्री. श्रीनिवासराव बोरीकर यांनी या संघर्षाला धार आणली. श्री गोविंदराव नानल यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व पहिले सत्याग्रही म्हणून बंडाचा झेंडा फडकविला. स्वातंत्र्याची चळवळ परभणी जिल्ह्याच्या सर्व भागात फोफावत गेली. संघटन वाढत गेले. समाजाच्या सर्व स्तरातले तरुण लोक सहभागी होत गेले. १९४७ – ४८ च्या सत्याग्रहात व सशस्त्र लढायात प्राण पणाला लावून लढले. या संघर्षात महिलाही सहभागी झाल्या. त्यात सौ. गीताबाई चारठाणकर आघाडीवर होत्या. या सशस्त्र संघर्षात स्व. बहिरजी शिंदे वापटीकर यांनी प्राणाची बाजी लावून हौतात्म्य पत्करले. त्यामुळे हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्याचे तेज वृद्धिंगत झाले.

(संदर्भ ग्रंथ – सर्वोदय यात्रा, स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर गंगाप्रसाद अग्रवाल कार्य – स्मृती ग्रंथ,
कार्यकारी संपादक प्रा. शोभा शिराढोणकर.)

मराठवाड्यातील पहिल्या तबलावादक प्रा. डॉ. लावण्यवती चौधरी ( निवृत्त प्राध्यापक, डॉ. सौ. इंभापा महिला कला महाविद्यालय ) यांचे कर्णवेधक वेणूवादन. तबल्यावर साथसंगत मॅडमचे चिरंजीव प्रा. शोण पाटील यांची. (शोणने विद्यार्थी असताना अखिल भारतीय तबलावादन स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त केले होते. त्याने नैनिताल येथील श्री अरविंद आश्रमात केलेले तबलावादन आजही माझ्या मनात रूंजी घालत असते,) ‘ज्ञानोत्सव’ च्या माध्यमातून गुरुसेवा घडत राहो, हीच दत्तचरणी प्रार्थना ! हे वेणुवादन श्रीकृष्णार्पणमस्तु !

हे सत्यसूर्या, तुला सांगते श्री गुरुदेवदत्त मनी अन् या सुरेख हिरव्या रानी मी शोधते विठ्ठल चिमणी !

आम्हाला नितांत अभिमान आहे आम्ही सरस्वती भुवनमध्ये कार्यरत आहोत!
विद्यार्थिर्पणमस्तु !

एकच प्रार्थना श्री गुरूदेव दत्तचरणी

उपासू दे तूज सतत ज्ञानराधा म्हणूनी !

संपूर्ण समर्पण

श्रीकृष्णार्पणमस्तु!


यावर आपले मत नोंदवा