जनहितार्थ ७
शिव म्हणजे मंगल. जे जे मंगल ते ते येथे ! – ज्ञानोत्सव – संपूर्ण समर्पण !
महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी ।
स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः ।।
अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन् ।
ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः ।। १।।
वाचा संपूर्ण शिव महिमा स्तोत्र खालील लिंकवर क्लिक करून
👇
https://www.santsahitya.in/articles/shiv-mahim-strotr/

तो पारिजात
उभा राहील डौलात ,
शुभ्र केशरी फुलांचा
सडा होईल अंगणात .
पट्टराणी द्वारकेची
मग्न तिच्या स्वप्नांत ,
मंद धुंद सुगंधात ,
येतील कृष्ण महालात !
दिसामाशी पान पान
वृक्ष दडलेला रोपटयात ,
प्रकट होता होता
कळी पानापानांत .
सुगंध आसमंतात
फुले टपटप ओघळतात
शाखा वृक्षाच्या झुकल्या
महाराणीच्या अंगणात !
किंचित हसू गालात
श्रीकृष्ण समजावतात
गुपित सुवर्णतुलेचे
केवळ तुळशीपत्रात. !!
गीता गद्रे
देश से है प्रेम तो ……………
वंदे मातरम् !
यावर आपले मत नोंदवा