त्या सुंदर क्षणांना साक्षी ठेवून …


•| ॐ |•
अमृतमिठी
पिंपळाचे पूर्ण कोवळे
झाड मी देखीले
अन् मज कळले
जीवभावे विठ्ठल तो वर्तला
भूत माझा भविष्युन आवर्तला
वाटेत त्या गजांनी
जे शिंपले पाणी
अन् मज कळले
देवी सरस्वतीने
आशीर्वचली ही वाणी
घनगर्द सावल्यांनी
मज आज निमंत्रिले
देवा, आनंदून ऊनही
आज कोवळे पडले
पडेल दिठीस दिठी सुखावे अमृतमिठी !
संपूर्ण समर्पण!
वृंदा आशय
http://youtube.com/post/UgkxDQTWOMQgz-4fOs8ept23K5kepPosvgdR?si=vTy78kkCjf5TauTz
ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे !
आयुष्यातले काही क्षण असे असतात जिथे कृतज्ञता नि:शब्द होते.

•|ॐ|•
प्रिय भाईजी,
आजचं तुमचं दर्शन खूपच सुखद होतं. तुमच्याकडे येताना वाटेवर स्वागत केलं ते काळ्या-निळ्या रंगाच्या फुलपाखराने. एखाद्या माणसानं आनंदाचा पावा वाजवत मजेत फिरावं तसं ते माझ्याभोवती फेऱ्या मारत होतं. माझा जीव उल्हासला.
का ? कुणास ठाऊक ? आज तुमचं दर्शन घेताना मन सुखद मौन होतं. देवाचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या मंदिरामध्ये जसं आपण थोड्यावेळ बसतो, आज तसं तुमच्याजवळ मी बसले होते. त्याच क्षणी मला कळलं मला चारी मुक्ती मिळाल्या.
भाई, आता फक्त निरंतर कर्मरत राहण्याचा आशीर्वाद द्या. कधीही जाण आणि भान सुटू नये, मी तुमचा वारसा चालवत आहे.
संपूर्ण समर्पण!
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!

यावर आपले मत नोंदवा