
हे पवन
हे पवन
हम ऋणी हैं आपके
जो आपने हनुमान जैसा
शिवांश दिया है
जिनकी भक्ती और शक्ती
देती है अपनेपन का एहसास
हे पवन
हम ऋणी हैं आपके
जो हवा के झोंके जैसा
मेरा कान्हा आ जाता है
छा जाता है मेरे जीवन में
उसे सुगंधित एवं शीतल करते हुए
है पवन
हम ऋणी है आपके
जो मेरे राम का तीर
आपके संवेग जैसा चलता है
और जहां लग जाए
वहां से निकलता है नीर
है पवन
हम ऋणी है आपके
जो प्रदान किया आपने
मन को आप जैसाही वेग
जो निराश होकर भी
पलभर में जा पहुंचे
भगवत चरण!
हे पवन….
वृंदा आशय
🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏
(संकलित)
आदिगुरु शंकराचार्य एकदा शाक्तमताचे खंडन करण्यासाठी काश्मीरला गेले होते. पण मार्गात त्यांची तब्येत खराब झाली, ती इतकी की शरीरात त्राण उरले नाही. शरीर भुकेने कासावीस झाले होते. ते एका झाडाखाली झोपले होते. तेव्हा त्यांनी एका गवळणीला डोक्यावर दह्याचे मडके घेऊन जाताना पाहिले. शंकराचार्यांच्या पोटात आग होत होती आणि त्यांना खूप तहान देखील लागली होती. त्यांनी गवळणीला हाक मारली, परंतु तिने सांगितले की तुम्हीच इथे येऊन दही घेऊन जा. आचार्य नी खूप थकलेल्या शब्दात तिला सांगितले की, माते,माझ्यात तिथवर येण्याची शक्ती नाही! शक्ती शिवाय मी कसा येऊ?
गवळण हसत उत्तरली ,” शक्ती शिवाय कोणी एक पाऊल देखील टाकू शकत नाही, आणि तुम्ही शक्तीचे खंडन करायला निघालात?
हे ऐकल्यावर आचार्यांचे डोळे खाडकन उघडले. ते समजून चुकले की गवळणीच्या रुपात साक्षात आदिमाया, आदिशक्ती जगदंबा त्यांच्या समोर आली आहे. क्षणार्धातच त्यांच्या मनातील शिव आणि त्यांच्यामधील भिन्न असण्याची जी भावना होती ती नष्ट झाली आणि त्यांनी भगवतीच्या समोर लोटांगण घालून तिचे चरण पकडले, त्याचवेळी त्यांच्या मुखातून शब्द निघाले “गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी”
त्याचवेळी त्यांनी भगवती भवानीचे जे शरणागत आणि समर्पण भावाने जे स्तवन केले ते भवानी अष्टक नावाने पुढे प्रसिद्ध झाले.
शिव स्थिर आहे आणि भवानी गतिशील शक्ती, चेतना आहे. जसे दुधापासून त्याचा रंग वेगळा करता येत नाही, साखरेपासून त्याची गोडी वेगळी करता येत नाही, तसेच शिव शक्ती हे अभिन्न आहेत याचे ज्ञान त्यांना झाले. जगन्माता महामाया जगदंबेने त्यांच्या डोळ्यावरिल हा अज्ञानाचा पडदा तिच्या या अद्भुत लीलेने दूर केला होता. म्हणून श्री शंकराचार्य तिचे स्तवन करताना म्हणतात ,
“माते मी काहीच जाणत नाही, तूच माझी गती आहेस, तूच एकमेव माझी गती आहेस.”
|| भवानी अष्टक ||
न तातो न माता न बन्धुर्न दाता ।
न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता ।
न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव ।
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥१॥
भावार्थ :- हे भवानी ! पिता, आई, भाऊ, दाता, पुत्र, कन्या, सेवक, स्वामी, पत्नी, ज्ञान आणि वृत्ती, यापैकी कोणीही माझे नाही, हे देवी! फक्त तूच माझी परम गति आहेस.
भवाब्धावपारे महादुःखभीरुः ।
पपात प्रकामी प्रलोभी प्रमत्तः।
कुसंसारपाशप्रबद्धः सदाहं ।
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥२॥
भावार्थ :- हे भवानी! मी अथांग भवसागरात अडकलो आहे आणि मी भवदु:खाने ग्रस्त आहे . काम लोभादि विकाराने या संसार बंधनात बंदिस्त झालो आहे. आता फक्त तूच माझी गती आहेस. तूच माझी परम गती आहेस.
न जानामि दानं न च ध्यानयोगं ।
न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रम् ।
न जानामि पूजां न च न्यासयोगम् ।
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥३॥
भावार्थ :- हे भवानी! न मी दान करणे जाणतो, न ध्यानयोग मला अवगत आहे, न मला तंत्र, मंत्र, स्तोत्रादीचे ज्ञान आहे, पूजा आणि न्यास या क्रियाहि मला माहीत नाहीत. तेव्हा हे भवानी तूच माझी गती आहेस, आणि तूच माझी परम गती आहेस.
न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं ।
न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् ।
न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर् ।
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥४॥
भावार्थ:- न मी पुण्य जाणतो न मी तीर्थ. न मी मुक्ती जाणतो न लय. हे आई! भक्ती आणि व्रतवैकल्ये याचेही मला ज्ञान नाही. तेव्हा हे भवानी आता तूच माझी गती आहेस. तूच परम गती आहेस.
कुकर्मी कुसंगी कुबुद्धिः कुदासः ।
कुलाचारहीनः कदाचारलीनः ।
कुदृष्टिः कुवाक्यप्रबन्धः सदाहम् ।
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥५॥
भावार्थ:- मी कुकर्मी, कुसंगतीत राहणारा, दुर्बुद्धि, दुष्टदास, कुलाचारहीन सदाचारहीन, दुराचारपरायण, कुत्सित दृष्टि ठेवणारा आणि सदा दुर्वचन बोलणारा आहे, हे भवानी ! माझी तूच एकमात्र उत्तम गति आहेस.
प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं ।
दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित्।
न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये ।
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥६॥
भावार्थ:- मी ब्रह्मा, विष्णु, शिव, इंद्र, सूर्य, चंद्र वा अन्य कोणत्याही देवतांना जाणत नाही. हे भक्तांना शरण देणारी भवानी ! तूच एकमात्र माझी परम गती आहेस.
विवादे विषादे प्रमादे प्रवासे ।
जले चानले पर्वते शत्रुमध्ये ।
अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि ।
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥७॥
भावार्थ:- हे आई ! तू विवाद, विषाद ,प्रमाद, विदेश, जल, अनल, पर्वत,वन आणि शत्रू मध्ये सदा माझे रक्षण कर ,हे भवानी ! तू एकमात्र माझी परम गती आहेस.
अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो ।
महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः।
विपत्तौ प्रविष्टः प्रणष्टः सदाहं ।
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥८॥
भावार्थ:- हे भवानी! मी सदा अनाथ, दरिद्री, जरा-जीर्ण ,रोगी अत्यन्त दिन-दुबाळा, मुक, विपत्त्तीने ग्रस्त आहे, नष्ट आहे, आता एकमात्र माझी गती आहेस.
इति श्रीमद शंकराचार्यकृतं भवान्यष्टकं संपूर्णम् ॥
यावर आपले मत नोंदवा