ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे !

(Aspiration towards the Divine)
प्रकृती ती जड । करील उघड । ईश्वरी ते रूप । सुघटित ।।
श्रीअरविंद
संपादकीय
मानवाने उचललेच पाहिजे अशा पुढच्या उत्क्रांतिकारक पावलाविषयी, अतिमानसाविषयी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी ह्यांनी काही सांगून ठेवले आहे. सद्यकालीन पशुवत मानवता आणि भविष्यातील दिव्य मानवता यामधील अंतर एकच छलांग मारून पार करणे खूपच अवघड आहे. म्हणूनच मानव आणि अतिमानसिक जीव या दोहोंमधील एक सेतू अशा दृष्टिकोनातून ते दोघं अतिमानवाकडे पाहत होते. अतिमानसिक जीव हे खूप दूरचे, तरीही अटळ असे भविष्य आहे. परंतु, अतिमानव हा मानवी देह व व्यक्तिमत्त्वांच्या द्वारे येथे अगोदरपासूनच कार्यरत आहे. अतिमानव हा अनुभवी सल्लागार व मार्गदर्शक बनून, भविष्यासाठी मानवाची तयारी करून घेत आहे. १९६९ सालच्या जानेवारी महिन्यामध्ये श्रीमाताजींनी अतिमानवाच्या अवतरणावर शिक्कामोर्तब केले आहे. ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे, मानव आणि अतिमानसिक निर्मिती यांच्यामधील हा एक हरवलेला दुवा आहे, असे आपण म्हणू शकतो. अल्पज्ञात असूनही, अतिमानसिक योगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळे अतिमानवाच्या आगमनाला हा अंक समर्पित करीत आहोत.
संपादक, ऑल इंडिया मॅगेझिन

— THE MOTHER
धृ धारयति इति धर्म:

•|ॐ|•
चंद्र 🌙 माझा
दिसतो आकाशराजा
त्याच्या आजूबाजूला
आज नाही कोणी
पूजतील सारे त्याला
उद्या कृष्ण म्हणूनी
चंद्रा,
आणशील आल्हाददायी चांदणं
तुझं असणं रामकृष्णाचं नांदणं!
वृंदा आशय
शुभं भवतु !
श्रीकृष्णार्पणमस्तु!
👆🏼 This was played at the Ashram during meditation on 4th April, the day of Sri Aurobindo’s arrival in Pondicherry.
A very clear, strong and pertinent message about politics in Mother’s voice (in French after 1 minute of music, followed by English, starting at about 5 minutes)… followed by 10 minutes of Mother’s organ music.
🙏🏼🌷
https://www.instagram.com/reel/DWTodkCkd5Z/?igsh=NmprMnJzOW8wc284
संपूर्ण समर्पण !
यावर आपले मत नोंदवा