विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

नि:शब्द प्रेमळ क्षणांना…

भले बुरे ते घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावा या वळणावर!

धारा धराधरधरा धरणीधरेण
धाराधरः स धरणीं धरते स्म धीरः।
धाराधरस्य धरणीधरधारयित्वं
धाराधरेण धरणी धृता धीरभावात्॥


पर्वतों को धारण करने वाले योगीराज श्रीकृष्ण पृथ्वी की रक्षा के लिए गोवर्धन पर्वत को अपनी उंगली पर धारण किये। बादलों (इंद्र के कोप) से गिरती जलधारा के बीच, उन्होंने बड़ी ही स्थिरता और धैर्य के साथ इस भू-धरा (पर्वत) को थामे रखा।

🙏प्रातःअभिवादन🙏

तुझे नी माझे मन जुळलेले , अंतर उजळलेले !

चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना

गेले आंब्याच्या बनी म्हटली मैनांसवे गाणी आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे

गेले केतकीच्या बनी गंध दरवळला वनी नागासवे गळाले देहभान रे

चल ये रे, ये रे गड्या नाचु उडू घालु फुगड्या खेळु झिम्मा झिम् पोरी झिम् पोरी झिम्

हे विश्वाचे अंगण आम्हां दिले आहे आंदण उणे करू आपण दोघेजण रे

जन विषयाचे किडे यांची धाव बाह्याकडे आपण करू शुद्ध रसपान रे

चाफा फुली आला फुलून तेजी दिशा गेल्या आटुन कोण मी – चाफा? कोठे दोघे जण रे?

(स्त्रोत -आठवणीतली गाणी )



संपूर्ण समर्पण – नि:शब्द, निर्मळ, प्रेमळ, ओघवत्या, संवादी क्षणांना ; समृद्ध मनांना!

वंदे मातरम् !

•|ॐ|•
माझ्या मनीचे बोल



ती
तुझ्या अंतरी खोल !
तेथ ती धरती फेर गोल
अन् होती अनमोल…..
वृंदा आशय
शुभं भवतु ! श्रीकृष्णार्पणमस्तु!

•| ॐ |•
प्रिय शिव,
काबीज केलेस माझे अंतर
अन् घडवत राहतोस निरंतर
ही ‘शिवण’ की घट्ट ‘वीण’ रे
की होते आहे हे भाग्यांतर?
शुभं भवतु
वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु!

https://youtu.be/kLsTGj_BrzA?si=ttqu-uRSeMOfxHTs

टीप – आजच्या पोस्टमधील सर्व मंडलआर्ट ड्रॉइंग व घड्याळ कलाकृती- अपूर्वा प्रशांत नाईक . धन्यवाद.

यावर आपले मत नोंदवा