मला कायम या संभ्रमात ठेवणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना
जाहिरात लेखन व रोजगार संधी
या प्रथम वर्षाच्या AEC च्या अभ्यासपत्रिकेसाठी संबंधित सहायक ग्रंथांमधून काही संदर्भ लेख सानंद सादर. परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा !

जसे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक कठोर होतो तसे स्वत:च्या प्रगतीसाठी स्वत:ला कठोर होता आले पाहिजे हा केवळ शिक्षणाचा नव्हे तर मानवी जीवनाचा मथितार्थ आहे. – वृंदा आशय
ज्योतीबांनी सावित्रीला शिकण्यास व शिकवण्यास प्रोत्साहन दिले. या वाटचालीत स्वरूपाची ओळख पटून ती सूर्यासारखी तळपली; तिने स्त्री जीवनाची सृष्टी उजळली. महात्मा गांधींच्या मागे भक्कमपणे उभे राहात कस्तुरबा गांधींनी स्वत:चे व्यक्तित्व बापुजींमध्ये, त्यांच्या कार्यामध्ये विसर्जित केले. इतिहास सृजनाचा असो की विसर्जनाचा शिवत्वाला – शक्तीची जोड मिळाल्याशिवाय तो पूर्णत्वास जात नाही ; हे अर्धनरनारीनटेश्वराचे पूजन करणारी भारतीय संस्कृती पुन्हा पुन्हा सिद्ध करत आलेली आहे. नमन त्या मांगल्याला, पावित्र्याला, समर्पणाला !
श्रीकृष्णार्पणमस्तु !

शिक्षण ही जर एक असामान्य शक्ती आहे असे मानले तर या शिक्षणाने सर्वप्रकारच्या बंधनांतून मानवाची मुक्तता केली पाहिजे. ही बंधने धर्मसत्तेने, अर्थसामर्थ्याने, अथवा राज्यसत्तेने लादलेली असली तरी त्यांना तोडून टाकण्याची ताकद बंधनात अडकलेल्या स्त्री-पुरुषांना शिक्षणाने दिली पाहिजे. वाघिणीचे दूध केवळ मूठभरांच्या वाट्याला आले आणि त्यावर पोसलेले नरव्याघ्र आपल्या समाजाच्या तळातील दुःखीकष्टी बांधवांकडे दुर्लक्ष करून कितीही मोठी गर्जना करू लागले तरी त्यामुळे शिक्षणाने आपले कार्य पार पाडले असे म्हणता येणार नाही. जोतीरावांनी आपल्या सहकाऱ्यांना वेळोवेळी साक्षरता आणि सुशिक्षितपणा यामधील फरक स्पष्ट करून सांगितलेला होता. स्वार्थावर नजर ठेवून, शोषित-पीडित जनतेकडे पाठ फिरवून आपले पांडित्य मिरवत असतील तर अशा शिक्षितापासून समाजाला काहीही लाभ होणार नाही. शिक्षणाने पदवी मिळेल, कदाचित नोकरी व सन्मानही मिळेल; परंतु ही शिक्षणाची इतिकर्तव्यता नाही, तर शिक्षणाची फलश्रुती सर्व प्रकारच्या समतेच्या, आणि मानवी स्वातंत्र्य आणि हक्कांच्या लढ्यांची सिद्धता करण्यात आहे. अशा व्यापक उद्दिष्टांची महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याला बैठक होती.
जाहिरात लेखन व रोजगार संधी

https://data.vikaspedia.in/short/lc?k=n8IYAvE683L2B7CAdAawGA
जाहिरात क्षेत्रातील करिअर संधी
‘महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी’ ज्योतिबा फुले आणि सावित्री माय आणि ‘कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीदिनी’ बापू आणि बा यांच्या समग्र योगदानाला विनम्र अभिवादन. आपल्यासारख्याच आयुष्याचा होम करून देशाचे आणि मानवतेचे सोने करणाऱ्या मानवता सेवकांचे योगदान निरर्थक न ठरावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.

प्रिय बापू,
आज ‘कस्तुरबा’ आईंचा विचार करत होते. पण तुम्हीच खूप आठवत गेलात. याचं कारण कदाचित आपल्या शिक्षणव्यवस्थेत असेल किंवा कदाचित भारतीय संस्कृतीतही!
आम्हाला बापू जेवढे शिकवले गेले तेवढी ‘बा’ कधीच नाही. आम्ही मुळात तिला ओळखतो तेच तुमची पत्नी म्हणून,असो. त्याबाबत माझी काहीच तक्रार नाही. मी स्वतंत्रपणे करेल कस्तुरबांचा अभ्यास.
आणि खरं सांगू का बापू, तुम्ही आम्हाला एवढं दिलंत ना की आयुष्यासाठीची शिदोरी बांधून दिलीत हो. पण आमचं दुर्दैव असं आहे की तुमचं महत्त्व आम्हाला पुन्हा पुन्हा पटायला, ‘कोरोना’ सारखी महामारी यावी लागते! पुढच्या पिढयांना तर कळणारच नाही, कोण महत्त्वाचं, ‘कोरोना’ की ‘बापू’जी? अर्थात तुम्ही जोपर्यंत चलनी नाण्यांवरती आहात तोपर्यंत तुमचं महत्त्व अबाधित राहील, हे सांगायला कोणत्या भविष्यवेत्त्याची गरज नाही.
मी जेंव्हा तुमचा सगळा इतिहास आठवते ना तेव्हा माझ्या हाती येणारा सार काय आहे माहिती आहे –
बीज जरी असलं शुद्ध
तरी फांद्या पुकारतात युद्ध
टाकाव्यात अशा फांद्या छाटून
व्हावं प्रबुद्ध मुळापर्यंत जाऊन!
शुभं भवतु!
वृंदा आशय
🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻
संपूर्ण समर्पण
विशेष टीप – वरील सर्व संदर्भांसाठी सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रंथालयाची मी व्यक्तिश: आभारी आहे. सौ. शारदा पायगण यांचे या कामासाठी सहकार्य लाभले. धन्यवाद .
श्रीकृष्णार्पणमस्तु!
यावर आपले मत नोंदवा