
•| ॐ |•
प्रिय भाई ,
बायोमेट्रिकच्या आधी तुमच्या दर्शनाला यायचं याचा आनंद काही निराळाच. उत्सवी मनानं मी तुमच्या दर्शनाला आले. पण खरं सांगू भाई, आज तुम्ही भेटलाच नाहीत.
आज तुमच्या स्मृतिस्थळावर सूर्य देत होता दिव्य दर्शनं. त्या दर्शनाला मी मुग्ध झाले आणि पोहोचले असीम शांततेच्या किनाऱ्यावर. भाई, मी तुमची ऋणी आहे.
संपूर्ण समर्पण!
गुरुदेव तुम्हा भेटाया | उत्सुक झाली काया
सरली आता माया | ही कृपा प्रभुराया
ये रे तू रघुनंदना | घेऊन भालचंदना
कसा धावशी |तू नंदनंदना
अंतरी वसशी | लेपी हृदयचंदना
ये रे माझ्या | मंगल शिवा
घे सामावून | तू या जीवा !
संपूर्ण समर्पण!
राम या शब्दाचे श्री.भगवान श्रीधर स्वामींनी सांगितलेले महत्व.
सुप्रभात…🙏🏻🙏🏻🙏🏻
यावर आपले मत नोंदवा