सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या (१५ सप्टेंबर १८६१ ते १४ एप्रिल १९६२)


शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणारा एक द्रष्टा अभियंता, महान अभियंता, उत्तम प्रशासक, उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजसेवक, भाषाप्रेमी, क्रीडाप्रेमी आणि नियोजनकार अशी विविध रूपे त्यांची होती.
त्यांनी २८ पुस्तके लिहिली. ते एक उत्तम लेखकही होते. त्यांची वेशभूषा युरोपियन वाटत असली तरी, डोक्यावरील पगडी मात्र भारतीय (कर्नाटकी) होती. त्यामुळे त्यांनी इंग्रजी, गणित, पदार्थ विज्ञान, आदी विषयांचा आग्रह धरला. तरी प्रादेशिक भाषा विकसित झाली पाहिजे, यासाठी खास प्रयत्न केले. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत झाले पाहिजे, असा विचार मांडणारा हा आधुनिक विचारवंत होता. राहणीमान, जीवनपद्धती त्यांनी विचार मांडले होते. म्हणून तर ते उत्तम प्रकारे शंभर वर्षांचे आयुष्य जगले.