जनप्रेमार्थ २
( होळी व धुलिवंदनानिमित्त ज्ञानोत्सव समितीकडून सर्व जनांना प्रेमळ शुभेच्छा !)


बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥
– संत तुकाराम
https://drive.google.com/file/d/16hQRWznL1gZaoSGWiBPwz9Sz2t8wAioC/view?usp=drivesdk
अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥१॥
मी-तूं-पण गेलें वायां । पाहतां पंढरीच्या राया ॥२॥
‘विठ्ठल’ हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत. संत ज्ञानदेवांनी त्याला जागवलं. पाच शतके संतांची मांदियाळी त्याला अभंगांमध्ये ओवत राहिली. शतकानुशतकं दिग्गज संगीतकारांची आणि गायकांची फळी त्याला गात राहिली. तत्त्वज्ञानाच्या शब्दातून आणि कलेच्या आराध्यातून ही परंपरा अव्याहतपणे चालू राहिली. मराठी मातीचा टिळा कपाळी लावून सर्वसामान्य माणसांनी ती उरीपोटी सांभाळली.
आपल्या सर्वांचं मंगलमय स्वागत आहे संत तुकारामांच्या या विठ्ठलाला अनुभवण्यासाठी!
तुकाराम बीजेच्या निमित्ताने
वरद गणेश सभेतर्फे व्याख्यानाचे आयोजन
विषय – संत तुकारामांच्या अभंगातून व्यक्त झालेले विठ्ठलाचे स्वरूप
वक्ता – प्रा. डॉ. वृंदा देशपांडे – जोशी
(उर्फ वृंदा आशय)
मराठी विभाग प्रमुख, सरस्वती भुवन महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर.
विशेष – व्याख्यान पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या स्वरूपात सादर होणार आहे (PPT)
दिनांक – गुरुवार, दिनांक ०५ मार्च २०२६
वेळ – दुपारी ०५ वाजता
स्थळ – वरद गणेश सभागृह

•|ॐ|•
निष्काम रंग
रंग रंगाचे रंग संगाचे
रंग मैत्रीचे रंग प्रीतीचे
रंग नीतीचे रंग गतीचे
रंग मतीचे रंग वृत्तीचे
रंग साथीचे अन् निवृत्तीचे…
संपूर्ण समर्पण!
शुभं भवतु !
वृंदा आशय
🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻
Radha’s love was devotion not desperation.

कृष्ण माझा – मी कृष्णाची!
कृष्ण माझा सखा सोयरा
घुसमटलेल्या क्षणी येतो
होऊन मंजुळ वारा….
घेऊन करी ती बासरी
‘ काय झाले’, विचारे
माझा श्रीहरी…
वाहती त्या क्षणी
घळघळ धारा, पाहुनी
त्याचा जीव अर्धा….
बोल ना गे माझी राधा !
क्षणात होई कृष्ण स्पर्श
राधेच्या मनी दाटे हर्ष
कृष्ण माझा मी कृष्णाची
गाठ आमुची जन्मोजन्मीची
वृंदा आशय
•|ॐ|•
निष्काम रंग
रंग रंगाचे रंग संगाचे
रंग मैत्रीचे रंग प्रीतीचे
रंग नीतीचे रंग गतीचे
रंग मतीचे रंग वृत्तीचे
रंग साथीचे अन् निवृत्तीचे…
संपूर्ण समर्पण!
शुभं भवतु !
वृंदा आशय
🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻
यावर आपले मत नोंदवा