संवादातून साहित्यशोध – पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
संपादक डॉ. बाळकृष्ण कवठेकर यांचे मनोगत
संपादक डॉ. लता मोहरीर यांचे मनोगत
डॉ. लता मोहरीर – संक्षिप्त परिचय
नाव : लता नरेन्द्र मोहरीर.
शैक्षणिक गुणवत्ताः एम.ए. पीएच.डी. (डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ)
रिसर्च फेलो: मराठी विभाग, विद्यापीठ.
अध्यापन : डॉ. इं. भा. पा . महिला कला महाविद्यालय, औरंगाबाद ( छत्रपती संभाजीनगर), १९७०-२००३, मराठी विभागप्रमुख.म्हणून निवृत्त
विद्यापीठाच्या मराठी व नाट्यशास्त्र विभागात अतिथी प्राध्यापक म्हणून अध्यापन.
संशोधन: पीएच. डी. विषय – ‘पाश्चात्यांचा मराठी नाट्यसृष्टीवरील प्रभाव : शेक्सपिअर (१८५०-१९५०).
प्रकाशन : ‘वेध साहित्यकृतींचा, ‘शेक्सपिअर आणि मराठी नाटक:
प्रामुख्याने संशोधनपर व समीक्षात्मक लेखन. प्रतिष्ठान, ललित, युगवाणी इ. मासिकांमधून
संशोधनपर नोंदी – मराठी विश्वकोश, प्राचीन मराठी वाङ्मयकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश –
विशेष उल्लेखनीय –
इंटरनॅशनल शेक्सपिअर काँग्रेसतर्फे दर पाच वषाँनी भरणा-या मेळाव्यात निमंत्रित म्हणून निबंध सादर –
१. शेक्सपिअरच्या नाटकांची मराठी भाषांतरे’ – टोकिओ (१९९१) ( हा लेख शेक्सपिअर सर्व्हे खंड १६ मध्ये प्रसिद्ध)
२. ‘शेक्सपिअरचे मराठी रंगभूमीवरील उपयोग’ (लॉस एंजेलिस (१९९६).
अध्यक्ष : अंबेजोगाई येथे झालेल्या तिसऱ्या मराठवाडा लेखिका संमेलन अध्यक्ष (२०१२)
पुरस्कार : ‘शेक्सपिअर व मराठी नाटक’ या पुस्तकाला म.सा.प. पुणेचा पुरस्कार (२०१६)