संपादक – वृंदा आशय

इतनी शक्ति हमें दे न दाता…... गीत गायन – डॉ. मेधा लखपती

अल्प परिचय:
डॉ. मेधा सुधाकर लखपति
शिक्षण : MA, NET, Ph.D., संगीत विशारद
प्रोफेसर डॉ. संजय मोहड यांच्या मार्गदर्शनात ‘जैन तत्त्वज्ञानातील निवडक संगीतस्त्रोतांचा अभ्यास’ या विषयावर Ph.D. संशोधन
गुरु आरती अंकलीकर-टिकेकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण
किती चिमणी ही निर्भय
देवा, कोण देते रे अभय ?

Abstract photograph & soulful comment by – Madhura Vivek Deshpande

अरुणोदय
नीलवर्ण आकाशी
शुभ्र मेघ प्रकाशी
तू विश्वास देशी
येथ धवल काशी
जागु दे रे साऱ्या
संचिताच्या पुण्यराशी
सत्कर्मी तू सतत
पावशी फळाशी
त्यागुनी अपूर्णता
प्राप्त कर परिपूर्णता
कर्म ते समर्पिता
एका केशवाशी
क्षणात वर
येई भास्कर
करी अध्यात्म साक्षर
अवघ्या जगाशी !
वृंदा आशय
|| गुरुवर्य रसाळ यांचा अपघात आणि ….. || – लेखक – ज्येष्ठ मराठी साहित्यिक इंद्रजित भालेराव
मूल मराठी गीत: वसंत निनावे
हिंदी अनुवाद: प्रमोद देशपांडे ‘पीडी’
https://www.facebook.com/share/r/1CBPbrHMXA/
हे आदिमा, हे अंतिमा
जे वांच्छिले ते तू दिले
कल्पद्रुमा
गीत: वसंत निनावे
संगीत: यशवंत देव
स्वर: रामदास कामत
सर्वव्यापक, कृपाशील आणि सहजसाक्षात्कारी परमेश्वराला केलेल्या या अर्थगर्भ प्रार्थनेचा हिंदी अनुवाद
जो सब कुछ देता है, फिर भी क्षमाशील है — उस करुणामय प्रभु को समर्पित यह विनम्र प्रार्थना।
हे आदि, हे अंत के स्वामी
हे आदि, हे अंत के स्वामी,
जो माँगा, वह सब कुछ पाया —
हे कल्पतरु, तू ही दानी।
इस माटी का गगन तू,
इस शिशिर में मधुमास तू,
मृत को देता अमृत-रस तू,
हे मेरे प्रभु, पुरुषोत्तम तू।
तेरे वरदानों से शीश झुका,
ऋणी बना मैं जन्मों जुड़ा,
मैं जुर्म और बदी की गागर,
पर तू सदा क्षमा का सागर।
भले ही ठहरे हम तेरे देनदार,
फिर भी करे तू अज्ञान जन को पार,
जग को दे सहज का योग,
हे जनकोत्तम, तू ही संयोग।
मूल मराठी गीत: वसंत निनावे
हिंदी अनुवाद: प्रमोद देशपांडे ‘पीडी’
https://www.facebook.com/share/r/1CBPbrHMXA/

साथ हो तुम मेरे
बन के हमदम मेरे,
बाँटे हैं तेरे साथ ग़म सारे,
दिए हैं तुम्हीं ने
खुशीयोकी उजियारे.
ज़मीं- आसमाँ या
समंदर किनारे,
तत्त्वमसि या
अहं ब्रह्मास्मि के इशारे,
सगुण–निर्गुणता
की व्याख्या से परे,
अव्यक्त पर अनंत
शब्दों से घिरे।
अर्थ हो अनर्थ हो,
क्षण हो या युग हो,
कभी दुर्गम या दुर्लभ ठहरे
प्रलय भी, करूणा भी
बस भक्ती की एक आवाज
परमतेज के दिल में बसेरे
शब्द हो, नाद हो
या शब्दहीन संवाद हो
मौन एक आत्मा को निखारे
नियती हो ,तटस्थ हो
या किस्मत
लिखनेवाले हो तारे
आदि हो अनादी हो,
प्रश्न हो या उत्तर तुम—
के बस एक राज गहरे,
शुन्य हो या पूर्ण हो,
मध्य हो या अंत हो,
सर्वव्यापी,कल्याण करे
डॉ.सीमा नंदकुमार ढगे, सहायक प्राध्यापक. सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय,
छत्रपती संभाजीनगर

तुला शोधता कुठे कसे
मंदिर मंदिर फिरलो ,
तुझा थांग नाही लागला
माघारी तसाच आलो !
तूच सृजन , तुझी निर्मिती
जोडीत नाते मातीशी ,
बीजातून पानं , फुले फळे
उंच आभाळी तूच नेशी. !
तूच पाया , तूच पायरी ,
अंधार प्रकाश तुझीच खेळी .
भिंती गवाक्षात तूच अमूर्त
तेज तुझेच कळसावरी .
सुरेल मंजुळ घंटानादात ,
साधशी तू संवाद ,
सुगंधात ही तुझी अनुभूती
तुझीच व्याप्ती वाऱ्यात !
श्वास उच्छवास तुझीच करणी
दृष्टी तूच दे बघण्याला ,
ज्योत ज्ञानाची चेतवूनी
तारून ने हा विश्व पसारा !!
गीता गद्रे
१५ डिसेंबर २०२५
छायाचित्र … सुषमा संदिप मुजुमदार

आज आयुष कधी नव्हे इतका आरामात बंगल्याच्या हिरवळीवर गरमागरम चहा घेत वर्तमानपत्र वाचत बसला होता. बंगल्याचं दार वाजलं आणि वीणा पणजी-आजी चक्क बॅटरीवरती चालणार्या व्हील चेयरवर बसून आत येतांना बघून आयुष चकित झाला होता.
‘हॅप्पी बर्थ डे ! , वीणा पणजी-आजी. आज मी हे काय पाहतो आहे ? अगं तुला हे पंख कधी फुटले ? कुठे गेली होतीस ?’
‘गेले होतेरे देवदर्शनाला. कालच मला रघुवीरने ही व्हील चेयर भेट दिली आहे. तुला माझ्याकडे बघायला वेळ असतो कुठे. मधमाशांच्या संशोधनात डोकं खुपसून बसलेला असतोस चोवीस तास. मधमाशांशीच जणू तुझं लग्न झालंय. बरं ते जाऊ दे. अरे आयुष , किती वर्षांची झालेरे मी आज ?
‘अगं , आज तुझा फक्त २७५ वा वाढदिवस आहे. सगळी नातलग मंडळी काही तासात पोहोचतीलच घरी. तू तयार हो बरं !’ – १०० वर्ष वयाचा पणतू आयुषने पणजी-आजीला आठवण करून दिली.
‘मला तयार व्हायला कितीसा वेळ लागणार आहे रे. नाहीतरी हा कार्यक्रम आभासी पद्धतीनेच तर साजरा करायचा आहे. वेळ , काळ , स्थळ , खरेदी सगळंच मेटावर्स मध्ये गेल्यावर ठरवू ना !’
‘अग पण , शंभरच्यावर नातलगांचा आपला गोतावळा घरी येउनच सहभागी होणार आहे, ते तुला ओवाळणार आहेत. आणि नंतर इंटरनेट द्वारा आमचे ५०० मित्र-मैत्रिणी या सोहळ्यात जगभरातून रुजू होणार आहेत. ऑग्युमेटेड रिअॅलिटी हेडफोन्स , इंटरनेट , स्मार्ट फोन्स , डिजिटल क्रिप्टो करन्सी याची तर मला सोय करून ठेवायला हवी ना. दूरस्थ पद्धतीने रुजू होणार्यांना मी तसे निरोपसुद्धा धाडले आहेत. चला , मला आता कामाला लागायला हवं. बरं , पणजी-आजी , वाढदिवस तुला कुठल्या पार्श्वभूमीवर साजरा करायचा आहे ? एखादा इंद्रमहाल , समुद्र किनारा , सुंदरसा बगीचा , की आणखीन काही ?’
‘ते तूच बघ बाबा. आणि तुझे आजी-आजोबा , आई-बाबा नाही उठले का अजून ?
‘अगं , आजी-आजोबा रघुवीर आणि शकुंतला फिरायला गेले आहेत. आई-वडील शंतनु आणि आर्या काल रात्री १ वाजेपर्यन्त तुझ्याच वाढदिवसाचं नियोजन करत होते. ठीक आहे तर मी असं करतो की स्वच्छ आशा एका समुद्रकिनार्यावरचं रिसॉर्ट या कार्यक्रमासाठी बुक करतो. आणि हो , तुला हे विचारायचं राहिलंच की कार्यक्रमाला येणारी मंडळी तुला तरुण दिसाविशी वाटते की आहेतशीच ? म्हणजे मला तसं प्रोग्रॅमिंग करायला बरं.’
‘सगळे कसे मला तरुण , आनंदी , उत्साही मूडमध्ये हवे आहेतरे बाबा !’
‘ओके, पणजी-आजी’ असं म्हणून आयुष कामाला लागला.
ठरल्या वेळी नातलग , मित्र , डॉ. आयुषची शास्त्रज्ञ मित्रमंडळी असे सगळेच ऑग्युमेटेड रिअॅलिटी हेडफोन्स घालून बरोबर सकाळी दहा वाजता जगभरातल्या विविध देशातून कार्यक्रमात हजर झाली होती. निसर्गाला देखील लाजवेल अशी सुंदरशी दुनिया तिथे अवतरली होती. समुद्रकिनार्याला लागून असलेल्या मार्केट मध्ये मित्रांनी प्रथम बँकेतून क्रिप्टो करन्सी प्राप्त करून घेतली. नवीन कपडे खरेदी केले , दागिने , भेटवस्तू खरेदी केल्या. आपले अवतार बदलले. आता कसे सगळे अगदी तरुण दिसत होते.
‘हॅलो आयुष , समुद्रकिनारा आणि निसर्ग किती छान नटलेला आहे’ – रॉबर्ट .
‘एंजॉय द सी शोअर रॉबर्ट’ – आयुष.
‘वीणा पणजी-आजी , आपण कशा आहात ? मी आयुषचा सहकारी. परदेशात असतो. तुम्हाला खूप खूप दीर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा’ – रॉबर्ट
‘सुखी राहा’ – वीणा
अथांग निळा सागर . त्याच्या उसळणार्या लाटा, त्यांच्यावर दिसणारा पांढरा फेस , या विलोभनीय दृश्याने सगळेच विलक्षण आकर्षित झाले होते. त्या फेसाळलेल्या लटा पुढे पुढे येत होत्या. किनार्यावर येऊन सगळ्यांना पदस्पर्शाचा आनंद देत होत्या. सागराच्या किनार्याला शिवून मागे फिरत होत्या. एक लाट केव्हा संपली आणि दुसरी केव्हा सुरू झाली हे उमगतच नव्हतं. लाटांचा हा पाठशिवणीचा खेळ मनसोक्तपणे सगळे लुटत होते. समुद्री वार्यांच्या तालावर ताडा-माडाची-सुपरीची झाडं डोलत होती. ओहटीच्या वेळी पसरलेला तो अफाट वाळूचा किनारा आणि भरतीच्या वेळी त्याला गिळू पाहणारा तो सागर हे परस्परांशी चाललेलं हितगुज वर्णन करायला शब्दांच्या पालीकडलं होतं.
अनेकांनी समुद्र स्नानाचा मनसोक्त आनंद लुटला. २७५ वर्षांची वीणा , २२० वर्षांच्या आसपासचे रघुवीर-शकुंतला , १६० च्या आसपासचे शंतनु-आर्या आणि १०० वर्षांचा आयुष अशा चारही पिढ्या कशा तरुण आणि रुबाबदार दिसत होत्या. वीणा पणजींची आवडीची हिंदुस्तानी शास्त्रीय धून सुरू झाली आणि वातावरण कसं मंगलमय होऊन गेलं. केक कापला , जेवणाचा मनसोक्त आस्वाद लोक घेत होते. वीणा पणजींना लोक दीर्धायुषी होण्याची सदिच्छा देत होते. म्हणता म्हणता वेळ संपत आल्याचे सिग्नल्स हेडफोनवरती लुकलुकत होते. एकमेकांना निरोप ध्यायची वेळ आली होती.
गुड बाय , गुड बाय …
तीन तासांच्या या मनसोक्त आस्वादानंतर सगळेच आपापल्या सद्य विश्वात परतले होते. प्रत्यक्षात असा सुंदर स्वच्छ आणि अथांग रत्नाकर पृथ्वीवर उरलेलाच होता कोठे ? ती अथांगता आज हरवून गेली होती. समुद्राचा विशाल पुळणीकाठ माणसानेच हिरावून घेतला होता. उंच उंच इमारतींनी घेरला होता. समुद्रीजीवन जतन करून ठेवण्यासाठी कृत्रिम प्राणवायुवर मत्स्यालये श्वास घेत उभी होती. समुद्रकिनार्यांवर कचर्याचे ढीग जमा झाले होते. सगळ्यांचीच सरासरी वयं २०० वर्षं पार केलेली !
***
रॉबर्टने कार्यक्रम संपताच अधीरतेने आयुषला फोन केला.
‘आयुष , नैसर्गिक उत्क्रांतीची प्रक्रिया सध्या जवळ जवळ ठप्प झाली आहे. ती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उलट्या दिशेने नेणं घातकच ठरत चललं आहे. विचित्र अशा अनैसर्गिक चक्रात आपण अडकत चालले आहोत. मरण ही जीवनाची एक सुखद बाजू आहे हेच माणूस विसरून गेला आहे. पण या अफाट लोकसंख्येची भूक भागवायची कशी ? – रॉबर्ट आगतिकतेने बोलत होता.
‘अरे रॉबर्ट, मी देखील गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थच आहे. माझं मधमाशांचं संशोधन देखील चिंतेत टाकणारं आहे. जगभरातला डेटा असं सांगतो की गेल्या १५ वर्षात त्यांच्या संख्येत ६५ टक्क्याने घट झाली आहे.त्याला कारण आहे कीटकनाशकांचा अतिरेकी वापर. यातून निर्माण झालेली ‘अॅक्सिलरेटेड कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर’ मधमाशांच्या ह्रासाला करणीभूत आहे. नैसर्गिक परागसिंचनात मधमाशा अत्यंत प्रभावी ठरतात. आमच्या असंही लक्षात आलं आहे की जगभरातल्या मधमाशांच्या विविध जाती निरनिराळ्या हवामान क्षेत्रात स्थलांतरित केल्या गेल्या मुळे वेगाने नष्ट होत चालल्या आहेत. असं जर झालं तर ४ वर्षात वाढत्या जनसंख्येला भरवण्यासाठी लागणारं धान्य उत्पादन आपण करू शकणार नाही.’ – आयुष अंतर्मुख होऊन बोलत होता.
‘म्हणजे हा मधमाशांचा प्रश्न वैश्विक स्वरूपाचा आहे तर ! आणि हो , तुझ्यासाठी एक गुड न्यूज. वर्ल्ड फूड कॉर्पोरेशनने तुझी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वरती नियुक्ती केली आहे. ‘कॉल ऑफ द अर्थ’ नावाच्या या मिशनसाठी तुझ्या प्रकल्पाची वाट बघत आहोत.’ – रॉबर्ट आशेने बोलत होता.
***
कॉर्पोरेशनचे अध्यक्ष रॉबर्ट व त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स भारतातील एका आंतरराष्ट्रीय मधुमक्षिका केंद्रात गेली सात दिवस एका नवीन तंत्रज्ञानाच्या अविष्कारची प्रात्यक्षिकं करून बघत होती. डॉ. आयुष यांनी विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाने सगळ्यांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या. ‘मरणासन्न वसुंधरेत प्राण फुंकायचे कसे ?’ या वैश्विक समस्येवर उपाय म्हणून एका जागतिक प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवली जाणार होती. याच साठी आयुषने आज वर्ल्ड फूड कॉर्पोरेशनतर्फे भारतात एक जागतिक पत्रकार परिषद बोलावली होती. ही परिषद मुद्दाम एका वृक्षराईत घेण्यात आली होती.
‘पत्रकार बंधूंनो , मध्यभागी ही मधमाशांची पेटी आपण बघत आहात.याला ‘बिहाइव्ह’ असं म्हणतात. यात ५०० मधमाशा गुणगुणतांना आपण ऐकत आहात.’ असं म्हणून आयुषने रिमोटचं बटन दाबलं आणि त्यातल्या दहा मधमाशा वनराईकडे झेपावल्या. वनराईतल्या फुलांवर स्वार झाल्या आणि परगीभवन करून पेटीमध्ये बंदिस्त झाल्या.
हे बघून पत्रकार थक्क झाले होते . पण त्यांच्या मनात प्रश्नांचं मोहोळ उठलं होतं. म्हणाले , ‘रिमोटच्या सहाय्याने आपण या मधमाशा कशा काय नियंत्रित केल्या? मधमाशा आमच्या अन्न धान्याची समस्या पूर्ण करू शकतील ?’
‘फसलात ना ! या मधमाशा नैसर्गिक नसून कृत्रिम आहेत. आणि परागीभवन हा अन्नधान्य समस्येचा केंद्रबिंदू आहे.’ – आयुष मोठ्या आत्मविश्वासाने सांगत होता.
स्मार्ट बी
म्हणजे हे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय ?
‘सांगतो, विस्ताराने सांगतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने आम्ही ही प्रत्येक माशी तयार केलेली आहे. या प्रकल्पाचं नाव आहे ‘बी स्मार्ट’. या तंत्रज्ञानाला बायोम्युच्युअॅलिझम असं म्हणतात. यात जीवशास्त्र आणि जवळ जवळ इतर सगळ्याच शास्त्रशाखांचा एकत्रितपणे उपयोग करून घेतलेला आहे. यातून जे निर्माण झालं आहे ते मानवाच्या कल्पनेपलीकडचं आहे. निसर्गाचाच अत्यंत बारकाईने अभ्यास करून त्याच्या विविध गुणधर्मांचं अणु-रेणु स्तरावर विश्लेषण करणं आता विविध उपकरणांच्या सहाय्याने शक्य झालं आहे. पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा आपली गुणवैशिष्ठ्ये घेऊन जन्माला येत असतो. आपण ती त्याची नैसर्गिक सवय आहे , वागणूक आहे किंवा तो त्याचा स्थायी गुणधर्म आहे असं गृहीत धरून जमेल तेवढाच त्यांचा वापर करतो. परंतु हीच त्यांची गुणवैशिष्ठ्य जेव्हा आपत्कालीन परिस्थितीत मानवाला वरदान ठरणार असतात तेव्हा मात्र अभियांत्रिकी पद्धतीने त्यांच्या गुणवैशिष्ठ्यांच्या क्षमता वाढवाव्या लागतात आणि त्यांचा पूर्ण विकास कसा करता येईल हेही बघितलं जातं. यालाच बायोम्युच्युअॅलिझम म्हणतात. असं करत असतांना आमच्या हे लक्षात आलं की मधमाशांच्या नैसर्गिक गुणधर्मात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने कित्येक पटीने वाढ करता येऊ शकतेका ते बघवं .’ – पत्रकार मंत्रमुग्ध होवून हे सारं ऐकत होते.
पण या तर कृत्रिम मधमाशा आहेत ? परागसिंचनाचं कार्य त्या करतील तरी कशा ?
‘निसर्गात मधमाशांच्या २५००० जाती आहेत. त्यातल्या अॅफिस मेरीफेला ही उत्तम असल्यामुळे तिच्या जीवशास्त्राचा आम्ही सर्वांगाने सखोल अभ्यास केला. आणि यांत्रिक पद्धतीने करंगळीच्या नखाच्या आकाराचा आणि नैसर्गिक माशीच्या एक चतुर्थौंश वजनाचा हुबेहूब एक ‘मायक्रोबोट’ तयार केला. याचे नाव ‘स्मार्ट बी’ त्याला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने सक्षम बनवला. पंखांचे फडफडणे , फुलावरती बसण्याची पद्धत , पुंकेसर हलवणे , परागकण मोकळे करणे , त्यांच्या संपूर्ण शरीरावरील सूक्ष्म केशरचना , परागसिंचनाच्या वेळी सोंडेचा दाब , फूल आणि मधमाशी यांच्या परस्पर संबंधांवर सर्व प्रक्रियांचं नियंत्रण. अशा सर्व बाबी आम्ही बारकाईने नियंत्रित केलेल्या आहेत. यात ‘रोबो-बझर’ नावाचा २ मिमी. लांबीचा तांब्याच्या तारेचा एक कृत्रिम पाय आम्ही जोडला असून तो पुंकेसराला हलवून जास्तीजास्त परागकणांचं सिंचन करतो. ही माशी आपले अत्यंत पातळ पंख प्रती सेकंदाला १२० वेळा फडफडवते.
आपण अत्ता प्रात्यक्षिकात बघितलंच की त्यांचं उड्डाणं , घिरट्या घेणं , आणि पुंकेसर हलवून परागसिंचन करणं हे किती नैसर्गिक वाटत होतं.’ – पत्रकारांना हे सगळं मानवी आकलनाच्या पालीकडचं वाटत होतं.
म्हणजे , ही सगळी प्रक्रिया स्वयांचलित असणार की मानव नियंत्रित ?
‘या ‘स्मार्ट बी’ मध्ये पाच प्रकारचे पर्यवरणीय संवेदक बसवलेले आहेत. एक म्हणजे या ‘बीहाइव्ह’ म्हणजेच मधमाशांच्या पेटीतले तापमान नियंत्रित केलं जाईल. दुसरं असं की परागीभवनाची वेळ त्यांना कळेल. तिसरं म्हणजे पिकांवरच्या कीटकनाशकांची मात्रा त्या ओळखतील , चौथं असं की वातावरणातल्या प्रदूषकांची मात्रा ओळखतील आणि पाचवा संवेदक पिकांवरती पडणार्या रोगांची सूचना देईल.’- पत्रकार ही नियंत्रण प्रक्रिया ऐकून थक्क झाले होते.
ते सगळं ठीक आहे , पण या तंत्रज्ञानाचे भविष्यात काही पर्यावरणीय धोके संभवतील …. ?
‘खूप छान प्रश्न विचारलात. आम्ही सुद्धा परागसिंचनाची प्रक्रिया निसर्गाच्या उलट्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहोत याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. परंतु पर्यावरणाचा ह्रास जेव्हा अपरिवर्तनीय होतो तेव्हा नवीन तंत्रज्ञानाची कास धरावीच लागते. सगळेच निसर्गावर सोपवून डोक्याला हात लावून बसलो तर वसुंधरेचा मृत्यू अटळ आहे येवढंच मी या प्रसंगी म्हणू शकतो.’
पत्रकार परिषद संपली होती पण पत्रकारांच्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं होतं.
***
जगभरातून उत्साहवर्धक निष्कर्ष मिळत होते. ‘स्मार्ट बी’ ही आता शेती नियंत्रकाची भूमिका बजाऊ लागली होती.अब्जावधींच्या संख्येत ‘स्मार्ट बी’ चं उत्पादन सुरू झालं होतं. केवळ ‘स्मार्ट बी’ च्या संदर्भात ५५० पेटंट्स नोंदवले गेले होते. उत्पन्न चांगलं आहे म्हटल्यावर शेतकरी पीक ध्यायला स्वतःहून पुढाकार घेत होता. या ‘बी रिव्होल्युशन’ चा उद्गाता होता डॉ. आयुष. जांभुळवनं आणि अमराया बहरल्या होत्या, स्ट्रॉबेरी , टमाटे , बटाटे यांचे विक्रमी उत्पादन घेता येत होते, धान्य पिकात उत्तम दाणा भरला जात होता.
वर्ल्ड फूड कॉर्पोरेशन ने ‘बी मार्ट’ नावाची स्वतंत्र अशी जागतिक वितरण व्यवस्था उभी केली होती. यात शेती उद्योगाला आवश्यक अशा मुख्य आणि पूरक अशा सर्व सेवा-सुविधा जगभर पुरवल्या जात होत्या. गेल्या ५ वर्षात मिळवलेली ही सफलता अभूतपूर्व अशीच होती.
***
आज मात्र शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते. पीक उत्पादनात गेल्या पाच वर्षात ७ टक्यांनी वृद्धी झाली असली तरी काही पक्षी फार मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडत होते. पीक उत्पादनाच्या वाढत्या आकडेवारीने जरी वर्ल्ड फूड कॉर्पोरेशन सुखावलं असलं तरी पक्षांच्या मृत्यूमुळे पक्षी शास्त्रज्ञ आणि जैव विविधतेच्या अभ्यासकांमध्ये वेगळीक अस्वस्थता निर्माण झाली होती.
‘बी स्मार्ट’ या प्रकल्पाचा तर हा परिणाम नसावा.? याचा छडा लावण्यासाठी एका उच्च स्तरीय बैठकीचं आयुषने आयोजन केलं आणि विशिष्ट पक्षांच्या मृत्युमागील रहस्य शोधून काढण्यासाठी विविध देशातील पक्षी शास्त्रज्ञ या वरती गांभीर्याने विचार करू लागले होते.
‘सर ! या शेतात १० मॉकिंग पक्षी मृत अवस्थेत आढळले आहेत.’ असे म्हणत तो शेतकरी ते मृत पक्षी प्रयोगशाळेतच घेऊन आला होता.
‘मृत पक्ष्यांची रक्त तपासणी केली . काही विषारी प्रदूषकांचा परिणाम सुद्धा तपासला . पक्ष्यांची चिरफाड करून शरीरातील भागांची तपासणी करून बघितली. परंतु हा संसर्गजन्य रोगामुळे होणारा मृत्यू नाही’ हे मात्र एव्हाना वर्ल्ड फूड कॉर्पोरेशनने निश्चित केलं होतं.
विविध देशातून महिन्याभरातच किंगफिशर , पाकळ्या , वूडपिकर आणि काही इतर पक्षांचे सामूहिक मृत्यू होत असल्याच्या बातम्या माध्यमांवर झळकू लागल्या. या प्रकरणाने जेव्हा जगभर रौद्र रूप धरण करायला सुरुवात केली तेव्हा मात्र ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ शास्त्रज्ञांच्या टीमची आयुषने ताबडतोब कॉन्फरंसिंग द्वारा तातडीची सभा बोलावली. मुद्दा असा होता की या मृत्युचा ‘स्मार्ट बी’ शी काही संबंध असू शकतो का ?
‘परागसिंचनाचा वेग वाढावा म्हणून एका विशिष्ठ चिकट अशा कृत्रिम रसायनाची मी निर्मिती करून त्याचं पेटंट देखील प्राप्त केलं आहे. हे रसायन ‘स्मार्ट बी’ च्या पायावरील केसांच्या अग्र भागातून बाहेर पडतं आणि त्यांना ओलसर ठेवतं. त्यामुळे परागीभवनाची परिणामकारकता अनेक पटीने वाढते असं मला अभ्यासात दिसून आलं होतं. या रसायनाचा पक्षांवरती होणारा परिणाम तपासावा लागेल असं मला वाटतं.’ – चिनी शास्त्रज्ञ डॉ. पेंग सांगत होते.
आता हे प्रकरण डॉ. बिल यांच्याकडे सोपवण्यात आलं. ‘यस , स्मार्ट बी मधील या रसायनाचा गंध मधमाशांच्या नैसर्गिक भक्षक पक्षांनाच आकर्षित करतोय ! हे पक्षी वेड्यासारखे या ‘स्मार्ट बी’ ला खात सुटले आहेत.’स्मार्ट बी’ जशी या पक्षांच्या चोचेत पकडली जाते तशी ती स्वसंरक्षणासाठी या रसायनाचा फवारा पक्षाच्या शरीरात सोडते आणि चोचेतून सुटका करून घेते , आणि कही वेळातच हा पक्षी तडफडून मरण पावतो.’ अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. बिल सांगत होते.
‘डॉ. पेंग’ , आयुष बोलतोय . ‘हे बघ या रसायनाची रेणवीय रचना बदलून त्याच्या चाचण्यांचे अहवाल मिळेपर्यन्त ‘स्मार्ट बी’ ना वातावरणात सोडणं त्वरित थांबवावं’ – आयुषने निर्णय घेतला.
‘ओह गॉड ! या पक्षांना सुद्धा काय वेड लागलंय ! ठीक आहे , मी ‘स्मार्ट बी’ना वातावरणात सोडणं त्वरित थांबवतो. आणि पर्याय सापडेपर्यन्त सर्व जागतिक केंद्रांना तशा सूचना देतो.’ – पेंग त्वरित उत्तरला .
पत्रकाराने विचारलेल्या त्या शेवटच्या प्रश्नाची आयुषला प्रकर्षाने आठवण झाली आणि त्याचं मन सुन्न झालं होतं. रसायन तंत्रज्ञांची कृत्रिम बुद्धिमत्ता चमू दुप्पट वेगाने कामाला लागली होती. आयुषला निसर्गाच्या मुळीच विरोधात जायचं नव्हतं परंतु मरणासन्न वसुंधरेला सावरणं हे त्यांचं एकमेव उद्दीष्ट होतं.
निसर्गाच्या कलाने घेता घेता आयुषची दमछाक होत होती. एक चूक सावरण्यासाठी दुसरी आणि दुसरी सावरण्यासाठी तिसरी …… ! निसर्गाच्या न्यायालयात आयुष आरोपी म्हणून उभा होता. न्यायाधीशांच्या कुठल्याच प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर नव्हतं. नव्याने तयार केलेल्या ‘सुपर स्मार्ट बी’ आसमंतात विहार करू लागल्या होत्या. ‘कॉल ऑफ द अर्थ’ मिशनने दुप्पट वेगाने भरारी घेतली होती.
***
https://www.facebook.com/share/p/1CzN45ySjs/
भले – बुरे ते घडून गेले …. हिंदी अनुवाद – श्री. प्रमोद देशपांडे ‘ पी डी “
पुस्तक पेटी उपक्रम – श्री. अभिजित जोंधळे, अंबाजोगाई

वृंदा आशय – पुस्तक पेटीमध्ये कोणती पुस्तके असतात?
उत्तर – पुस्तक पेटीमध्ये पहिली ते चौथी, पहिली ते सातवी किंवा पाचवी ते दहावी शाळेतील या विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार पुस्तके असतात. या पुस्तकांमध्ये उत्तम कथा, कविता, चरित्रे, आत्मचरित्रे, व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके, विज्ञानाची पुस्तके, करून पहा, विज्ञानातील का, कसे, कोण, किती, ओरिगामी, गणितातील गमती जंमती, शोधाच्या कथा, नव्या पद्धतीची रंगीत पुस्तके, एकपानी, सहापानी पुस्तके, कोडी, ही आणि अशी अनेक पुस्तके आपण या पेटी मध्ये ठेवतो.प्राथमिक शाळेच्या पेटी मध्ये 100 पुस्तके असतात.माध्यमिक शाळा असेल तर 80 पुस्तके असतात.
