||श्री कुलस्वामिनी मर्दडी माता प्रसन्न||
सन्मान स्त्रीत्वाचा – पुरुषाच्या दायित्वाचा !

संदेश वागेश्वरीचा !
वाणी असो अशी लाघवी |
वठल्या झाडा फुटो पालवी !
सामर्थ्य वाणीचे तू जाण |
तो आहे गं रामबाण !
वाणीने स्थापावे ऋत |
व्हावे अमृताचे दूत !
वाणीने वदावे सत्य |
त्यजावे सारे मर्त्य !
मधुर असावी वाणी |
गावी चैतन्याची गाणी !
वाणी असो व्रतस्थ |
होवो साऱ्यांची हृदयस्थ !
वृंदा आशय
हेमंत राजोपाध्ये

#नवरात्र_स्तवनाञ्जलिः
तृतीया :
ध्येया पुण्यमयी दुर्गा चन्द्रघण्टेति कीर्तिता।
साधकैश्चिन्तिता ध्याता चक्रे मणिपुरे स्थिता।।
: मणिपूर चक्राची अधिष्ठात्री असलेली परम पुण्यस्वरूपिणी भगवती दुर्गा, जी चंद्रघंटा या नावाने विख्यात आहे, ती आमच्या चिंतनाचा, ध्यानाचा विषय होवो.
She, the supremely sacred Goddess Durga, known as Chandraghanta, the presiding deity of the Manipura Chakra—may she be the focus of our contemplation and meditation.
—
नानापरिमलद्रव्यैर्नानामङ्गलभेरिभिः।
आविर्भवति योगीनां ध्यानाकाशे सुमङ्गला।।
: नाना सुगंधी द्रव्यांनी मढलेली अशी सुमंगला देवी ध्यानमग्न योगी, साधकांच्या हृदयाकाशात मंगल वाद्यांच्या घोषात प्रकट होते.
Adorned with manifold fragrances, the auspicious Goddess Sumangala reveals herself in the inner sky of meditation to yogis and seekers, amidst the resonant sounds of auspicious instruments.
—
चन्द्रार्धबिम्बशिरसा पद्मा राजीवलोचना।
युद्धोद्यता स्वर्णवर्णा खड्गबाणादिधारिणी।।
: चंद्रकोर जिच्या मस्तकावर आहे अशी पद्मा कमलनयना देवी सोन्यासारखी लख्ख झळकत, खड्ग, धनुष्यबाण धारण करत युद्धासाठी सिद्ध असते.
With a crescent moon upon her head, lotus-like eyes, and a golden radiance, the Goddess Padma shines brilliantly, armed with sword, bow, and arrow, ever ready for battle.
—
यस्या दर्शनमात्रेण दुःखा नश्यन्ति निश्चितम्।
सर्वशक्तिधराप्येषा करुणावरुणालया।।
: जिच्या केवळ दर्शनमात्रे दुःखांचा निःपात होतो अशी सर्व शक्तींना धारण करणारी देवी करुणेचा सागर आहे.
By whose very sight sorrows are surely destroyed—she, the bearer of all powers, is also an ocean of compassion.
—
अणुरेणुस्वरूपिण्यै शैलजायै नमोऽस्तु ते।
ब्रह्माण्डपालिकायै ते देव्यै नित्यं नमो नमः।।
: विश्वातील प्रत्येक अणू आणि रेणूंच्या रूपातून अभिव्यक्त होणाऱ्या, ब्रह्मांडाचे पालन करणाऱ्या देवीला माझे नित्य नमन असो.
Salutations to Shailaja, who manifests even in the tiniest atom and particle; salutations again and again to the Goddess who sustains the entire cosmos.
प्रतिभा मिस्त्री
सेवानिवृत्त , इंग्लिश विभाग , स. भु. विज्ञान महाविद्यालय
सध्या वास्तव्य – न्यूयॉर्क, अमेरिका
( मॅडम, भौतिक प्रश्नांचा विचार करत सडेतोड व स्पष्ट विचार मांडणीस आपण नेहमीच आम्हाला प्रवृत्त केलेत. त्याच कृतज्ञतेने ज्ञानोत्सव या संकेतस्थळावर आपले मन:पूर्वक स्वागत करते.)
शारदीय नवरात्र चिंतन ३:
आश्विन शु ३, दि २४ सप्टेंबर २०२५
©प्रतिभा मिस्त्री
तिची ‘ती’ गरजः तिच्या आरोग्याची ऐशीतैशी!
आता सर्व देवी मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि देवस्थाने हजारो लाखो स्त्रीभक्तांनी ओसंडून वाहात असतील. मोठमोठ्या रांगेत महिला उभ्या असतील. दर्शनासाठी घरून भल्या सकाळी निघावे लागते लवकर दर्शनासाठी नंबर मिळवण्यासाठी. अर्थात या सगळ्या घाईगर्दीत तिची ‘ती’ सोय चांगली असेलच असे नाही. ती ही नैसर्गिक शरीर गरज दाबून धरते काही तास. आवेग दाबणे हेच उत्तर.
….हे दुःख आहे सर्व ग्रामीण स्त्रियांचे हजारो वर्षे. नैसर्गिक विधींसाठी तिला शौचालयच नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ NFH तर्फे Sanitation for Women सर्व्हे केला गेला. त्यामधे आढळले की ६८.४ % स्त्रिया बऱ्यापैकी शौचालय वापरू शकतात पण ३०% कुटुंबांना ही सोय पुरेशी नाही. म्हणजे ग्रामीण भागांमधे ३पैकी १ तरी स्त्री सार्वजनिक जागा शौचालय म्हणून वापरतात. भारताच्या २०११ सेन्सस नुसार ५३.१% शहरी व खेडी दोन्हीही भागात कोणत्याच प्रकारचे शौचालय नसलेली घरे आहेत. २०२१ चा सेन्सस झाला नाही. याचा अर्थ ज्याला open defecation ODF सर्रास होते. केवढा गंभीर प्रश्न आहे हा!
त्या अनुषंगाने येणारे इतर गंभीर प्रश्न आहेतच जोडीलाः एक तर स्त्रियांना भर उजेडात जाता येत नाही, रात्री किंवा पहाटे फक्त. त्यामुळे नैसर्गिक आवेग दाबून धरत राहिल्याने येणारे आजार! शिवाय सुरक्षिततेचेही प्रश्न आहेत, त्यांना अंधारात छेडछाड, पाठलाग, शाब्दिक वा इतर स्वरूपांचे गुन्हे, लैंगिक टवाळी व चेष्टा, प्रसंगी अत्याचार, जबरीने पकडणे यांसारख्या प्रकारांना तोंड द्यावे लागते. बरे आपली ग्रामीण समाज व्यवस्था अशी, की हा तोंड दाबून मुक्याने सोसायचा त्रास असतो. दुर्दैवाने जातीव्यवस्थेची उतरंड खेड्यांमधून अजूनही पक्की असल्याने शौचविधीसाठीची सार्वजनिक ठिकाणेही त्याप्रमाणे ठरलेली असतात. अशा वेळी एखाद्या खालच्या स्तरातील स्त्रीवर वरिष्ठ स्तरातील व्यक्तीने अत्याचार केला, तर तिची न्याय मिळवण्यासाठी ची वाट खडतर एकूणच असते. वाऱ्याच्या फुंकरीवर तिच्या चारित्र्याचे अफवा पीक उठवले जाते. शौचविधी ही नैसर्गिक क्रिया अशी एका प्रचंड सामाजिक दडपणाखाली असते. त्यामुळे ODF साठी महिला एकट्याने जाणे टाळतातच!
दुर्दैवाने शहरी भागांमधे झोपडपट्टीत राहाणाऱ्या स्त्रीची ही हीच समस्या आहे. पुढे जाऊन नोकरी करणाऱ्या शहरी स्त्रियांनाही स्वच्छ सुरक्षित शौचालयांसाठी संघर्ष करावाच लागतो अजूनही. करमणूक नाट्यगृहे कार्यालये इ ठिकाणी ही या व्यवस्थेकडे नीट लक्ष पुरविले जाईलच याची शक्यता नाही.(पुण्यातल्या एका प्रसिद्ध शास्त्रीय संगीत महोत्सवात एका वर्षी झालेल्या अशा गैरसोयीची संयोजकांकडे तक्रार केली, दुसऱ्या दिवशी आयोजकांनी जाहीर माफी मागून नीट सोय केली! पण हे अपवादानेच घडते!) वरील NHF अहवालानुसार फक्त २२.५% स्त्रियांना पाणी आणि साबण उपलब्ध असते. बाकीच्यांचे काय!
असा आहे आपला आजचा विषयः स्त्रियांसाठी सार्वजनिक स्वच्छतालये!
आता तिच्या आरोग्याशी निगडित अजून एक गंभीर प्रश्न. वरच्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार फक्त १२% स्त्रिया या पाळीच्या दिवसांमधे सॅनिटरी नॉपकिन्स वापरू शकतात. बाकीच्या ८८% स्त्रिया या जुने कपडे(५४.९% हे कपडे धुवून परत वापरतात, म्हणजे ४५% ते कचऱ्यात फेकतात), राख, गवत, वाळू इ वापरतात त्यांमधून रोगसंसर्ग शक्यता अधिक असते. ६४.०६% या पाळीच्या वापरलेल्या वस्तूंचे डिस्पोजल हे झुडपे, शेती, कचऱ्याची ठिकाणे येथे होते, तर २९.१ % हे नदीमधून होते. फक्त २४% हे वेस्ट बीनमधून घरातून होते. वारंवार सूचना देऊनही शहरी भागात हे नॅपकिन्स फ्लश केले जातात आणि ते सॅनिटेशन यंत्रणा ब्लॉक करतात, ती साफ करून घेणे काही हजारांचा खर्च असतो. पुन्हा कचऱ्यामधे टाकलेले नॅपकिन्स याची विल्हेवाट करण्यासाठी नगरपालिकांना स्वतंत्र यंत्रणा करावी लागते, ते कचऱ्यामधून अलग काढण्यापासून. त्यासाठी ते कसे गुंडाळून त्यावर लाल ठिपका मारून ते टाका अशा सूचना पुण्यासारख्या प्रगत शहरांमधूनही नगरपालिकांना कराव्या लागतात.
ग्रामीण भागांमधे ते वापरणेही शिकवावे लागते. माझ्या एका मैत्रिणीला हे जे काम तिने केले त्याबद्दल गौरवले गेले आहे. यातून प्रेरणा घेऊन कापडी नॅपकीन्सचा उद्योगच पुण्यात एका उद्योजक स्त्रीने केला आहे. पण शौचालयच नाही तेथे हे नॅपकिन्स बदलणे, त्यासाठी सुरक्षित जागा शोधणे, हेही जिकीरीचे काम ठरते! पुण्यामधे इन्फोसिस फाउंडेशनच्या ‘आरोहण सोशल इनोव्हेशन’ने पुरस्कार दिलेल्या ‘शेल्टर असोसिएशन’ ने एक घर एक शौचालय उपक्रमाखाली सु ३,५०० पेक्षा अधिक घरांमधे शौचालये उपलब्ध करून दिली. मागील नऊ वर्षांत राज्यात काही शहरांमधून २७,००० घरांपर्यंत ही योजना पोहोचली आहे. पुण्यात अजूनही ४० ते ५० हजार घरे या सुविधेपासून वंचित आहेत. ही पुण्यासारख्या एका शहराची कथा! अजून किती पल्ला आपल्याला गाठायचा आहे तेच हे तपशील सांगतात.
चित्र इतके निराशाजनक आहे काय? तर नाही. पंतप्रधान मोदींनी आपल्या कारकीर्दीची सुरुवातच २ ऑक्टो २०१४ मधे स्वच्छ भारत मिशन SBM ने केली. त्याचे दोन भाग केले: शहरी SBMU आणि ग्रामीण SBMU. 2024 ला एक दशक झाले आहे. त्याआधीच २०२१ मधे SBM 2.00 जाहीर झाली. या मोहिमेला कचरा ओला-सुका विल्हेवाट व सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया ही जोडले गेले. आज कचरा वेचण्यामधे ९७% नगरपालिका यशस्वी झाल्या आहेत, तरीही कचरा विल्हेवाट एक गंभीर समस्या आहेच. देशात ६६ लाख वैयक्तिक शौचालये बांधली गेली, त्यासाठी योग्य ती सरकारी आर्थिक मदत उपलब्ध आहे. ३,९१३ शहरे आणि ५.५४ लाख खेडी आज ODF मुक्त आहेत. अत्यंत यशस्वीपणे ही योजना राबवली गेली.याचा परिणाम स्वरूप वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने जाहिर केले की, भारतात सु तीन लाख बालमृत्यू हे टाळले गेले. स्त्रियांचे आरोग्य प्रश्न असे थेट स्वच्छतेशी जोडलेले आहेत आणि तिच्या बाळांचेही!पण अजूनही २०० मिलियन लोकांना टाॅयलेट्स उपलब्ध नाहीत.
स्त्रियांच्या आरोग्याच्या फक्त दोन महत्त्वाच्या गोष्टींचा आपण येथे पाठपुरावा केला आहे. तिच्या गर्भधारणेबाबत, फॅमिली प्लॅनिंग, त्यासाठी सुरक्षित औषधे/गोळया उपलब्ध करून देणे, लैंगिक रोगांच्या पतीकडून आलेल्या संसर्गातून तिला सावरणे, तिचा सुरक्षित गर्भपात होईल हे पाहाणे, तरुण मुलींना योग्य ते लैंगिक शिक्षण देणे व आरोग्य मार्गदर्शन करणे, असे कितीतरी कोन या आरोग्याला आहेत. यासाठी काॅम्प्रिहेन्सिव प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे गाव भागातून असणारी ग्रामीण आरोग्य सेवा अधिक दर्जेदार व्हावी लागेल. १ ऑक्टो २०२३ ला नांदेडच्या सरकारी हाॅस्पिटलमधे झालेल्या २४ बालमृत्यूंनी महाराष्ट्रातील या व्यवस्थेचे वाभाडेच काढले आहेत. सुरक्षित प्रसूती ची गरज किती मोठी आहे हेही त्यावरून कळते..महाराष्ट्र प्रगत मानला जातो, इथे ही कथा, तर इतर प्रगतीच्या मार्गावर मागे असणाऱ्या राज्यांची गत काय असेल! अंगणवाडी सेविका आज खेड्यापाड्यात हे काम करत आहेत, त्यांचा यथोचित गौरव वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केला आहे.
अशिक्षित, अडाणी, गरीब आणि मजुरी करणारी स्त्री या सगळ्या आरोग्य भाषेपासूनच वंचित आहे. ‘जेंडर ॲंड सॅनिटेशन’ (जर्नल आर्टिकल, इंडियन अँथ्रपालाॅजिस्ट, व्हाॅल्यूम 51, नं 2) या आपल्या लेखात कृती मिश्रा यांनी, जर स्त्री आरोग्य सुरक्षित हवे असेल तर सुरक्षित आणि आरोग्यदृष्ट्या स्वच्छ शौचालये ही राष्ट्राची अत्यंत निकडीची प्राथमिक गरज असल्याचे सांगितले आहे.
जगज्जननीचा उत्सव करताना जननीपद देणाऱ्या या निसर्गाच्या या शारीर वरदानाचीच जर आपण अशी अक्षम्य हेळसांड करत असू, तर ती महामाता माफ करेल काय आपल्याला?
……..जाताजाता एक लहानसा प्रश्न, तुमच्या घराची स्वच्छता सांभाळणारी ताई सकाळी खूप लवकर घरातून निघते, तिचे येणेही दूरवरून असते, तिने अतिशय निकडीच्या वेळी तुमचे टाॅयलेट वापरायची विनंती केली, तर तुम्ही काय करता?
…………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………….
जागृती धर्माधिकारी

Jagruti Dharmadhikari: Navratri Rituals
⚔️ Navratri Day 3 – Chandraghanta: Courage & Responsibility ⚔️
Maa Chandraghanta symbolizes fearlessness and responsibility—qualities that define effective trusteeship.
In the journey of school leadership, courage is not about avoiding challenges, it’s about facing them with child-centric clarity. Whether it is a financial hurdle, an administrative reform, or a tough policy call, trustees must dare to choose what safeguards learning and growth.
💡 Bold decisions today become the strong foundations of tomorrow.
A trustee’s true strength lies in the ability to balance courage with responsibility—making choices that may be difficult, but always serve the best interest of children.
✨ Let us pledge to be fearless custodians of education, where every decision echoes responsibility, integrity, and vision
…………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………….
यावर आपले मत नोंदवा