विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

दुसरी माळ

नवरात्र विशेष


१. वृंदा आशय

मज खुणावतो
माझा कान्हा
शब्दांना मग
फुटतो पान्हा !

कधी हसावे
कधी रडावे
धडक कधी
गळ्यात पडावे!

उगा राहून
होतो साक्षी
सहज कर्मे
सतत रक्षी

रागावता मी
करतो मुग्ध
सतत भांडूनी
तिथेचि लुब्ध!

वृंदा आशय


२. हेमंत राजोपाध्ये

नवरात्रि-स्तवनाञ्जलिः

द्वितीया:
कराभ्यां वरदाभ्यां सा जपमालाकमण्डलू।
दधाना वरदा माता पार्वती ब्रह्मचारिणी।।

भक्तांना वर देण्यासाठी तत्पर असलेल्या हातांनी जपमाळ आणि कमंडलू धारण करणाऱ्या भगवती पार्वतीचे ब्रह्मचारिणी रूप वरप्रद आहे.
With hands ever ready to bestow boons, holding a rosary and a water-pot, Goddess Parvati in her Brahmacharini form grants blessings to her devotees.


शिवसौहार्दप्राप्त्यर्थं यया तप्तं तपः परम्।
अपर्णेति सुविख्याताऽभूदुमा हिमशैलजा।।

हिमालय पुत्री असलेल्या तिने भगवान महादेवांच्या प्राप्तीसाठी जिने केवळ वृक्षांची पाने खाऊन प्रखर तप आचरिले, त्यामुळे ती अपर्णा या नावाने विख्यात आहे.
The daughter of Himalaya performed severe penance, eating only leaves, to obtain Lord Shiva. Thus, she became renowned as Aparna.


तन्वी तपस्विनी देवी देवताभिः सुपूजिताः।
महादेवस्य पूज्यस्य हृदयं द्रावितं यया।।

आपल्या उग्र नैष्ठिक तपाद्वारे जिने महविरागी अशा महादेवाचे हृदयही द्रावित केले अशी सुकोमल असे तपस्वी शरीर धारण केलेली ही भगवती पार्वती देवी-देवतांद्वारे पूजिली गेली आहे.
Through her intense ascetic devotion, this slender, penance-embodied Goddess softened even the detached heart of Lord Mahadeva. Worshipped by all deities, she shines as Parvati the Tapaswini.


आविर्भूता लीलया सा रेणुकारूपधारिणी।
श्रीजामदग्न्यरामस्य जननी सह्यवासिनी।।

हीच आदिशक्ती भगवती रेणुका मातेचे रूप धारण करून सह्याद्री पर्वतावर भगवान जामदग्न्य परशुरामाची जननी होऊन वास करते.
The same primordial Shakti manifested playfully as Renuka Devi, dwelling in the Sahyadri mountains as the mother of Lord Parashurama, son of Jamadagni.


योगीश्वरी महाशक्ती मातापूरनिवासिनी।
श्रीदत्तात्रेयदेवस्य तपःस्थलविभूषिता।।

सकळ योगविद्यांची अधिष्ठात्री, महाशक्तीस्वरूपिणी अशी भगवती रेणुकांबा आपल्या चिरंतन जागत्या-गाजत्या अस्तित्वाद्वारे मातापुर/माहूर या भगवान दत्तात्रेयांच्या तपोभूमीस भूषित करते.
Renuka Devi, the supreme Yogeshwari and Mahashakti, as the eternal presiding force of yogic knowledge, sanctifies Matapur/Mahur, the sacred land of penance of Lord Dattatreya.


भक्तानां वरदात्री सा तप:शक्तिप्रदायिनी।
ज्ञानवैराग्यदा पुण्या शमादिगुणदायिनी।।

साधकांच्या तपाचरणास वर प्रदान करणारी, तपोनिष्ठेला शक्ती प्रदान करणारी, ज्ञान आणि वैराग्यदात्री भगवती रेणुका माई वेदांत ग्रंथात सांगितल्यानुसार ब्रह्मसाधनेसाठी आवश्यक अशी शमादि षट्कसंपत्ती (शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, आणि समाधान) हे गुण प्रदान करते.
She bestows boons upon devotees, grants strength to ascetics, and blesses seekers with knowledge and detachment. Renuka Mata confers the sixfold virtues essential for Vedantic pursuit—calmness, self-control, withdrawal, forbearance, faith, and contentment.

— हेमंत राजोपाध्ये
आश्विन शु. २।। शके १९४७

नवरात्री_स्तवनाञ्जलि #Navaratri_Stavanañjali

अल्पपरिचय
नाव: हेमंत प्रकाश राजोपाध्ये
शिक्षण:
बी.ए. (संस्कृत) (फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे)
एम.ए. (संस्कृत), एम.फिल. (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
एम.ए. (इंडोलॉजी) (टिमवि, पुणे)
पीएच.डी. संशोधन (ग्योटिंगेन विद्यापीठ, जर्मनी)
व्यवसाय:
फ्लेम युनिव्हर्सिटी, पुणे व अहमदाबाद युनिव्हर्सिटी येथे संस्कृत, वैदिक साहित्य आणि भारतीय धर्म या विषयाचा अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत
अभ्यागत व्याख्याता (संस्कृत विभाग: मुंबई विद्यापीठ)
ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन या केंद्रसरकारला धोरण निश्चितीमध्ये संशोधन सहकार्य करणाऱ्या थिंक टँकमध्ये वरिष्ठ संशोधक व विभाग प्रमुख (२०१७-२०२०),
दक्षिण आशियायी धर्मेतिहास, वैदिक व अभिजात संस्कृत साहित्य, प्राचीन बौद्ध धर्म, मध्ययुगीन व आधुनिक मराठी श्रद्धाव्यवहार याविषयांच्या स्वतंत्र अभ्यासक्रमांची निर्मिती करून युरोपीय आणि भारतातील विद्यापीठांत व खासगी संस्थांमध्ये या विषयांचे अध्यापन
कृत्रिम या भारतीय भाषांमध्ये AI बनवणाऱ्या प्रमुख भारतीय AI कंपनीत वरिष्ठ भाषा संशोधक म्हणून कार्यरत
लेखन:
१. दैनिक लोकसत्ता’मध्ये २०१८, २०२० या वर्षांत वर्षभर ‘धारणांचे धागे’ व ‘इतिहासाचे चष्मे’ या पाक्षिक लेखमाला
२. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अकादमिक व बिगरअकादमिक नियतकालिकांतून संशोधनपर लिखाण
३. सिंघम, सुपर30, पानिपत या हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन
४. विविध अकादमिक परिषदांमध्ये, देशातील व विदेशातील विद्यापीठांमध्ये व्याख्याने
पारितोषिके:
१. पुणे विद्यापीठाचे एम.ए. (संस्कृत)करिताचे सुवर्णपदक
२. युरोपियन युनियनची ३ वर्षांसाठीची प्रतिष्ठित इरॅस्मस मुंडस पीएचडी शिष्यवृत्ती
३. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरतर्फे इन्फोसिस फाउंडेशनची अभ्यासवृत्ती
४. कोकण मराठी साहित्य परिषदेचा ‘भाऊसाहेब वर्तक स्मृती पुरस्कार’
५. महाराष्ट्र राज्य विश्वकोश महामंडळ समितीवर सदस्य म्हणून २०२१ ते २०२४ या काळासाठी नियुक्ती
  1. जागृती धर्माधिकारी – मनाकांत

Jagruti Dharmadhikari
Vice president: Maharashtra Rajya Shikshan Sanstha Mahamandal
President: Independent English Schools Association (IESA)
Founder President: Padma Education Society
CEO: Abhinav Eduvista

Navratri Rituals For Leadership:

🌼 Navratri Day 2 – Brahmacharini: Discipline & Devotion 🌼
Maa Brahmacharini embodies discipline and unwavering devotion—virtues every school trustee must live by.
For us, devotion is not ritual; it is a commitment to educational values. It is reflected in how we uphold ethics, implement policies with integrity, and align our schools with the vision of NEP 2020.
A trustee’s discipline ensures that schools don’t just run, they thrive—creating cultures where learning is purposeful, governance is transparent, and every child’s future is nurtured with sincerity.
✨ When discipline meets devotion, trusteeship transforms from management into a mission of nation-building.

-Jagruti Dharmadhikari

यावर आपले मत नोंदवा