|| श्री कुलस्वामिनी मर्दडी माता प्रसन्न ||
सन्मान स्त्रीत्वाचा – पुरुषांच्या दायित्वाचा !

कृपा
सरस्वतीची वीणा हाती
जोडून देते सारी नाती ।।
तिला प्रार्थिता, तिला आवाहिता
अक्षरशः ती देई हुंकार ।।
शब्दाशब्दातून मग प्रकटे
तिचाच हा झंकार ।।
दिव्य ती गीत गाते
अवघे जीवन संगीत होते ।।
वृंदा आशय
नवरात्रिस्तवनाञ्जलिः।
आश्विन शु. ४।। शके १९४७
हेमंत प्रकाश राजोपाध्ये

नवरात्रिस्तवनाञ्जलिः।
चतुर्थी :
न सदासीद्यदा किञ्चिन्नासदासीत्तदा यया।
विनिर्मितं जगत्तस्यै कुष्माण्डायै वयं नुमः।।
: जेव्हा हे भौतिक जग अस्तित्वात नव्हतं, जेव्हा या अस्तित्वाविषयी काहीच शक्यता नव्हती तेव्हा ज्या आदिशक्तीने हे विश्व निर्माण केलं त्या कुष्मांडा देवीला आम्ही नमन करतो.
English Meaning:
When neither existence nor non-existence was manifest, it was by Her primal power that this universe was created. To that Goddess Kushmanda, the originator of creation, we bow.
या देवी सृष्टिकर्त्तृत्वादादिशक्तिरिति स्मृताः।
सूर्यमण्डलवासिन्यै भगवत्यै वयं नुमः।
: सृष्टिनिर्मितीच्या अद्भुत लीलेमुळे जी आदिशक्ती म्हणून विख्यात आहे त्या सूर्यमंडलात निवास करून असलेल्या भगवतीस आम्ही नमन करतो.
English Meaning:
Renowned as the primordial power due to Her wondrous role as the creator of the cosmos, dwelling in the very sphere of the Sun, we bow to that supreme Goddess.
सूर्यकान्ता महातेजा शक्तिमूलात्मिका शिवा।
दिक्कालाद्यनवच्छिन्ना सिंहवाहनभूषिता।।
: सूर्याच्या तेजाने झळाळणारे, जगातील चैतन्यशक्तीचे मूळ असलेले, दिशाकाळादि बंधनापासून अबाध्य असे हे देवीस्वरूप सिंहवाहिनी रूपात शोभून दिसते.
English Meaning:
Radiant with the brilliance of the Sun, the source of all vital power, infinite and beyond the limits of space and time, She shines forth, adorned in the form of the lion-rider.
अष्टहस्ता ऋषिध्येया शस्त्रमालायुता वरा।
सर्वरोगप्रशमनी सुधाकुम्भधरा शुभा।।
: विश्वरहस्याचे आणि जगत्कल्याणाविषयी चिंतनरत असलेल्या ऋषींच्या ध्यानाचा विषय असलेली अष्टभुजा, शस्त्र आणि माळांनी विभूषित असलेली, अमृतकुंभ धारण करणारी शुभांगिनी भगवती सर्व रोगांचे शमन करते.
English Meaning:
Worshipped by sages absorbed in the mysteries of existence, She, the eight-armed Goddess, adorned with weapons and garlands, bearing the pot of nectar, bestows auspiciousness and dispels all diseases.
आधिव्याधिहरा पुण्या सद्भक्तानां च तारिणी।
ऐहिकामुष्मिकफलप्रदा सा भवतारिणी।।
: सर्व भौतिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक, व्यावहारिक आधिव्याधींचे शमन करणारी, सद्भक्तांना तारणारी, ऐहिक आणि आमुष्मिक (पारलौकिक) फळ देणारी जगज्जननी भवसागराचे तारण करणारी आहे/होवो.
English Meaning:
She removes worldly and spiritual afflictions—be they physical, mental, social, or material. She delivers true devotees, granting both worldly and transcendental fruits, and ferries beings across the ocean of existence.
देवळातील अंधारः४
शारदीय नवरात्री चिंतनःआश्विन शु ४,
दि २५ सप्टेम्बर २०२५

©प्रतिभा मिस्त्री
उद्योग जगतः स्त्रीउर्जेचे दुर्लक्षित जग
आपण काही अधिकृत संख्याच पाहू म्हणजे मी येथे हे दुर्लक्षित जग का म्हणते आहे ते स्पष्ट होईल. खरं तर ग्रामीण स्त्री ही शेती व्यवसायात उत्पादन निर्मिती क्षेत्रात हजारो वर्षे आहे, पण कृषि उद्योग जगत याबाबत पुरेसे जागे नाही, हे आपण आर्थिक, कामगार, ग्रामीण महिला इ चा याआधी जो भाग पाहिला त्यातून जाणले आहेच. हा पूर्णपणे एका प्रचंड ऊर्जा शक्तीचा अपव्यय आहे. कुठल्याही आपत्ती मधे ‘मोडला नाही कणा’ या विजिगिषु वृत्तीने स्त्रिया चिकाटीने लढतात. याची असंख्य उदाहरणे सभोवताली आपल्या जीवनात सदैव भेटतात. अनेक प्रकारच्या घरगुती उद्योगांमधे लाखो स्त्रिया काम करताना दिसतात. तरीही आज जागतिक लेबर पार्टिसिपेशन निर्देशांकात १३० पैकी आपण १२० क्रमांकावर आहे, फक्त १/३ स्त्रिया या आकडेवारीनुसार तेथे येतात. म्हणजे हे तिचे कृषि उद्योग मधील हजारो वर्षांचे उत्पादक काम मोजलेच गेलेले नाही या व्यवस्थेत.
आता ज्याला उद्योजक म्हणतात त्यामधे फक्त १४% स्त्रिया स्वतःचे व्यवसाय असणाऱ्या आहेत(सहावा इकाॉनाॉमिक सेन्सस भारत). त्यांच्यापैकी केवळ १०% या उद्योग मालक आहेत. त्यापैकी ९०% उद्योग हे लघुतम स्वरूपाचे उद्योग आहेत आणि जवळजवळ ८०% भांडवल स्वतःचे असणारे आहेत. भारताच्या GDPमधे स्त्रियांचा सहभाग फक्त १७% आहे. जगातील स्त्रियांच्या मास्टरकार्ड इंडेक्स मधे ५७ देशांमधे भारत ५२ क्रमांकावर आहे. केवळ २०.३७% MSME उद्योग हे स्त्रियांचे नेतृत्व असणारे आहेत आणि त्यांनी एकूण २३.३% लेबर गुंतवले आहे.
वर्ल्ड बँक च्या व्हाइस प्रेसिडेंट ॲनेट डिक्सन या म्हणतात (२०२२), भारतातील अर्धी स्त्री लोकसंख्या जरी या लेबर फोर्समधे आली तरी भारताचा वार्षिक आर्थिक विकास दर १.५% वाढेल आणि भारत ९% दर गाठू शकेल. हे होत नाही. कारण The World Econonic Forum Global Gender Gap Report 2018 प्रमाणे भारत १०८ नं वर आहे. याचे महत्त्वाचे कारण स्त्रियांचे आरोग्य, जीवन संघर्ष आणि टिकून राहण्यासाठीची आर्थिक क्षमता नसणे ही आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे पुरुष प्रधान व्यवस्थेतील त्यांचे एकूणच व्यवस्थेतील असलेले दुय्यम स्थान.
याला तोंड देण्यासाठी भारत सरकारने उद्योगिनी स्किम सुरू केली आहे. Women Entrepreneurship & Empowerment Foundation च्या संस्थापक अपर्णा सरोगी या क्षेत्रात उत्तम प्रेरणादायी काम करत आहेत. अत्यंत खडतर आव्हानांना तोंड देत जसवंतीबेन पोपट (खाली फोटो) यांनी सात महिलांच्या साहाय्याने केवळ ८० रु च्या भांडवलावर सुरू झालेला श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड आज सोळाशे कोटींहून अधिक रुपयांच्या घरात पोचला आहे. ‘फोर्ब्स इंडिया’च्या श्रीमंत भारतीयांच्या पहिल्या दहामधे स्थान व देशातील सर्वाधिक श्रीमंत महिलेचा मान पटकवणाऱ्या सावित्री जिंदाल यांचे पुरे आयुष्यच एक प्रेरणा स्थान आहे. पतीच्या निधनानंतर यशस्वी उद्योजक होऊन त्या हरयाणा सरकारच्या महसूल आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्री झाल्या. शिक्षणाचा अभाव आणि कौटुंबिक दुःखांवर मात करून त्यांनी हे यश मिळवले. पुण्यात पल्लवी उटगी यांचा सुपरबाॅटम्स हा कापडी डायपरचा उद्योग आज ८० माता आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने ७० कोटी रुपयांच्या उद्योगात रूपांतरित झाला आहे. खाली या काही यशस्वी उदाहरणांचा निर्देश येथे करत आहे. अशी खूप आहेत अजून उदाहरणे उदा., काही यशस्वी महिला उद्योजकांचे फोटो खाली देत आहे त्यांच्या नावानिशी. झूम करून पाहा.ही लिस्ट खूप वाढती आहे आता. खूप नावे घालता येतील.
सुदैवाने स्त्रियांमधील उद्योजकतेशी आवश्यक सर्व निसर्गदत्त गुणवत्तेची दखल आज सरकारी यंत्रणा पूर्ण क्षमतेने घेते आहे. मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइलचे स्वतंत्र खातेच आहे. याशिवाय संघटनात्मक पातळीवर National Association of Women Business Owners NAWBO, Women’s Business Enterprise National Council WBENC, Self-Help Groups (SHGs), Farmer-Producer Organizations (FPOs), Khadi & Village Industries Commission KVIC अशा विविध पातळ्यांवर सरकारी यंत्रणा व स्त्री उद्योजक संघटना कमालीच्या सक्रीय आहेत. आज घरगुती उद्योग करणाऱ्या हजारो स्त्रिया अवतीभवती दिसताहेत.
देशातील GDP मधे स्त्रियांचा वाटा वाढविण्यासाठी अर्थ मंत्रालयाने योग्य ते निर्णय घेतले आहेत.
स्त्री उद्योजक उद्याच्या विकसित भारताचा आधारस्तंभ ठरतील एवढी त्यांची क्षमता आहे. आशा आहे की तिला यासाठी समाजघटकांची सर्व साथ मिळेल. कुटुंबाचे ढाचे त्यासाठी लवचिक बनवावे लागतील. कौटुंबिक कर्तव्यांचे तिचे ओझे सर्वांनी विभागून कमी करावे लागेल. तर प्रत्येक स्त्री एक नवी ” इंद्रा नुयी” बनू शकेल.(त्यांचे आत्मचरित्र आहे.)
आता अजून एक वेगळेच उदाहरण.
ही फार विलक्षण कथा आहे ती शांता कोल्हे, सरिता मेश्राम आणि कविता मोजे या ढिवर या मागास विमुक्त जमातीतील तीन अशिक्षित स्त्रियांनी मत्स्योत्पादन करण्याच्या क्षेत्रात केलेले विलक्षण काम याची. फीड या संस्थेच्या ग्रासरूट्स नेतृत्व विकास कार्यक्रमात त्या समाविष्ट झाल्या आणि त्यांनी तलाव वाचवणे, सशास्त्र माशांची पैदास व विक्रीव्यवस्था करणे या सर्व क्षेत्रांमधे विलक्षण काम केले. त्यांची सविस्तर कथा लोकसत्ता शनिवार चतुरंग दि ७ ऑक्टो २०२३ मधे आली होती (विद्या, मती,गती आणि चित्तही आमचेच, डॉ सुजाता खांडेकर, ग्रासरूट फेमिनिझम.) आज १२८० कुटुंबे या मजूर संघटनेची सदस्य आहेत आणि सहा वर्षांत १२ तलावांमधे नैसर्गिक पध्दतीने मत्स्य उत्पादनाचे काम तेथे वाढीस लागलं आहे. यात १०६ स्त्रिया पहिल्यांदाच हे शिकल्या आहेत. आणि त्यांचे हे सर्व काम पर्यावरण पूरक आहे.
स्त्रीची ही उद्योग शक्ती अजूनही अत्यंत निद्रिस्त अवस्थेत आहे. स्त्रीदेवतेचे उत्सव रोज उधळणाऱ्या नव्या रंगांमधे प्रचंड अहमहमिकेने साजऱ्या करणाऱ्या स्त्री शक्तीला मला एकच प्रश्न विचारायचा आहेः
आपले अंतरंगातील हे अंधार केव्हा संपणार? आपल्या खऱ्या शक्तीचा जागर आपण केव्हा करणार? आपण प्रकाशातील महिला केव्हा बनणार? त्यासाठी आपणा सर्वांना या
देखावा पूजेतून बाहेर पडायला हवे आणि आपले खरे शक्तिरूप ओळखले पाहिजे. नक्की अडाणी स्त्री कोण आहे आणि शक्तीचे रूप धारण केलेली स्त्री कोण आहे यातील सत्य जाणून घेतले पाहिजे.
देवळातील अंधारात आपल्या चेहऱ्याची ही भर पडू नये ही देवी चरणी प्रार्थना करू या.
Navratri Rituals:
🌟 Navratri Day 4 – Kushmanda: Creativity & Innovation 🌟
-Jagruti Dharmadhikari

Maa Kushmanda is revered as the creator of new possibilities, the one who turns darkness into light with her radiance.
In the same spirit, school leaders must become the torchbearers of creativity and innovation in schools. Our role is not just to preserve tradition but to enable transformation—by fostering STEM education, supporting digital learning, and encouraging teaching practices that ignite curiosity.
🚀 A school leader’s vision should empower schools to move beyond rote learning and towards experiential, innovative, and future-ready education.
✨ Let us remember: when School leaders champion creativity, schools don’t just teach—they inspire.
यावर आपले मत नोंदवा