|| श्री कुलस्वामिनी मर्दडी माता प्रसन्न ||
सन्मान स्त्रीत्वाचा – पुरुषांच्या दायित्वाचा !

प्रकृति-पौरूषेय
आशीष गुरुजनांचे फळले
शल्य माझे कृष्णास कळले
तो म्हणे, तू राहा गं निर्धास्त
होणारच दुष्प्रवृत्तीचा अस्त
हा खेळ पुरूष- प्रकृतीचा
संदेश माझ्या संस्कृतीचा !
तो इच्छितो ते ती करते
तो बीज टाकतो ती धरते
होऊनी धरा फळते-फुलते
ते चैतन्य येथ विलसते!
वृंदा आशय

नवरात्रिस्तवनाञ्जलिः।
आश्विन शु. ५।। शके १९४७
हेमंत प्रकाश राजोपाध्ये
पञ्चमी:
देवसेनानायकस्य स्कन्दस्य जननी शिवा।
भक्तचिताह्लादिका सा सिंहारूढाऽभयप्रदा।
: देवेसेनेचे महापराक्रमी सेनापती भगवान कार्तिकेय/स्कंद यांची माता असलेली भगवती पार्वती सिंहावर आरूढ होणारी, अभय प्रदान करणारी व भक्तांच्या मनाला आनंद देणारी आहे.
She is Goddess Parvati, the mother of Lord Skanda, the mighty commander of the celestial army. Riding on a lion, She grants fearlessness and fills the hearts of devotees with joy.
पद्मपुष्पधरा देवी मोक्षमार्गप्रचोदिका।।
मूढाः प्रबुद्धत्वं यान्ति यत्कृपावीक्षणान्मनाक्।।
: हातात ज्ञानाचे प्रतिक असलेलं कमलपुष्प धारण करणारी ही देवी मोक्षमार्गप्रति प्रवृत्त करणारी आहे. तिच्या केवळ कृपाकटाक्षाने अज्ञ, मंदमती लोक प्रबुद्ध होतात.
Holding the lotus, symbol of wisdom, this Goddess inspires beings towards the path of liberation. By just a glance of Her grace, the ignorant and dull-minded attain enlightenment.
राजराजेश्वरी पुण्या शान्ता त्रिपुरसुंदरी ।
योगीश्वरी शक्तिरूपा ललितापरमेश्वरी।।
: हीच देवी परमपुण्यरूपा शांत- ज्ञानस्वरूपिणी योगीश्वरी राजराजेश्वरी त्रिपुरसुंदरी ललितांबिका या नावाने सुविख्यात आहे.
She is the supremely pure and serene Goddess, known as Rajarajeshwari, Tripurasundari, Yogeshwari, and Lalitambika, the embodiment of divine power and supreme wisdom.
ईक्षुचापधरा दिव्या अवस्थात्रयसाक्षिणी।
भक्तेष्टदाननिरता शाम्भवी त्रिपुरेश्वरी।।
: ऊसाच्या दंडापासून बनवलेले धनुष्य धारण करणारी, उत्पत्ती, स्थिती, लय यांची साक्षी असलेली, भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यात अभिरत होणारी, अशी ही शंभू महादेवाची ज्ञानशक्ती भगवती त्रिपुरसुंदरी आहे.
Holding the sugarcane bow, She is the witness to creation, sustenance, and dissolution. As the divine power of Lord Shambhu, Goddess Tripureshwari delights in fulfilling the wishes of Her devotees.
कुण्डलिन्यत्रिजवशा सद्योगीजनवल्लभा।
सार्धत्रिमण्डलासीना देवयोगर्षिवन्दिता।।
: श्रीदत्तात्रेयांनी जीचे प्रकटन केले अशी साडेतीन वेटोळे घालून मूलाधार चक्रात निवास करून असलेली भगवती कुंडलिनीस्वरूपा योगिजनवल्लभा अशी ललितांबिका देवता, योगी, संत, सज्जन अशा साऱ्यांसाठी वंदनीय आहे.
Revealed by Lord Dattatreya, She dwells in the Muladhara as the coiled Kundalini in three and a half spirals. Beloved of yogis, Goddess Lalitambika is revered by sages, saints, and the virtuous.
शमादिगुणसंसाध्या मुमुक्षूणां च मुक्तिदा।
वेदवेदान्तसाङ्ख्यादिशास्त्राणां सा प्रवर्तिका।।
: मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या शमादि षड्गुणांद्वारे जी सिद्ध, प्रसन्न होते, मुमुक्षू/मोक्षेच्छू मंडळींना मुक्तिप्रद ठरते अशी भगवती त्रिपुरसुंदरी वेदवेदांग, सांख्यादि शास्त्रांचे प्रवर्तन करणारी, रहस्य उलगडवणारी आहे.
Perfected through the six inner qualities such as calmness and discipline, She bestows liberation upon seekers of moksha. Goddess Tripurasundari reveals and propagates the wisdom of the Vedas, Vedanta, Sankhya, and other scriptures.
चतुर्भुजा शुभ्रवर्णा देवानां विजयप्रदा।
तेजस्विन्यै महादेव्यै भगवत्यै नमो नमः।।
: चतुर्भुजा, मौक्तिकासम धवल कांती असलेल्यादेवतांना व सज्जनांना विजय मिळवून देणाऱ्या परम तेजस्विनी जगदंबिका राजराजेश्वरी ललितापरमेश्वरी भगवतीस पुनःपुन्हा साष्टांग नमन!
With four arms and a radiant, pearl-like fair complexion, She grants victory to the gods and the virtuous. To this resplendent Mahadevi, the Supreme Mother, Rajarajeshwari, Lalitaparamashwari, we offer repeated prostrations.

देवळातील अंधार : ५
आश्विन शु ५
शुक्रवार दि २६ सप्टेंबर २०२५
©प्रतिभा मिस्त्री
सायंटिस्ट्स स्त्रियाआणि आपण!
…..तर आपल्या पंतप्रधानांचा बंगलोर मधील इस्रोतील आपल्या सायंटिस्ट्स स्त्रियांसमवेतचा हा ८ नोव्हेंबर २०२४चा वर्तमानपत्रात आलेला वरील फोटो पाहा. यात टेलिमेट्री, ट्ँकिंग अँड कमांड नेटवर्क, सेक्शनमधे काम करणाऱ्या या स्त्रिया आहेत. आजचे चिंतन या सायंटिस्ट स्त्रियांवर आहे.
……साधारणपणे सर्व मिडिया मधून ज्या पोस्ट्स आहेत होत्या त्या अशा स्वरूपाच्याः त्या किती साध्या आहेत, साडी नेसून बांगड्या वगैरे घालून छान मोठे कुंकू लेऊन आहेत. त्या तोकडे बिनबाह्यांचे कपडे जिन्स वगैरे घालत नाहीत. नीट पध्दतीने भारतीय संस्कृतीचे पालन करतात इ इ.
…..हे सर्वसाधारणपणे विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग इ विविध आधुनिक वैज्ञानिक क्षेत्रातील यशस्वी आघाडीवर असलेल्या स्त्रियांबाबत अजूनही वापरले जाणारे मोजमाप आहे! यामधे आघाडीवर आपल्या पुरुषांच्या बरोबरीने आपण स्त्रियाही आहोत.
…..कर्तबगारीने पुरुषप्रधान क्षेत्रात उभे राहून निखळ बौध्दिक यश मिळवणाऱ्या या स्त्रियांना पावलोपावली या पुरुषसत्ताक संस्कृतीला तोंड देत पुढे जावे लागले आहे, हे आपण विसरलो आहोत. अजूनही याची जाण नाही आपल्याला. शास्त्रज्ञ सी व्ही रामन यांनी अण्णा मनी यांना त्यांच्या हाताखाली पी एच डी करू दिली नव्हती. दुर्गा भागवत यांच्या भगिनी कमला सोहोनी यांनाही त्यांच्या हाताखाली प्रचंड संघर्ष करून पी एच डी ची परवानगी मिळाली आणि त्यांच्या कठोर अटी पाळत त्यांना आपला रिसर्च पुरा करावा लागला. आजही हे संशोधनाच्या क्षेत्रात अतिशय बुध्दिमान सर्वार्थाने उच्च विद्याविभूषित गुणवत्ता सिद्ध केलेल्या स्त्रियांचै संघर्ष चालूच आहेत. विज्ञानाच्या क्षेत्रातील लिंगभेदाचे स्वरूप एखाद्या पिरॅमिडसारखे आहे, हे सांगून वैशाली चिटणीस शनिवार २६ ऑगस्ट २०२३च्या लोकसत्ता मधील ‘विज्ञानाच्या क्षेत्रातील लिंगभेद’ या आपल्या लेखात ही सगळी आकडेवारी देतातः
युनेस्कोच्या अहवालानुसार(२१०९) जगातील महिला संशोधकांचे प्रमाण २९.३ टक्के आहे, भारतात ते १३.९ आहे. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र प्रसाद यांनी २०१८ त लोकसभेत सांगितले की भारतात १६.६ टक्के स्त्रिया विज्ञानाच्या क्षेत्रात आहेत, तर सर्वसाधारण हे प्रमाण १५ टक्क्यांच्या आसपास आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार २०२१ मध्ये ४३टक्के मुलींनी विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी घेतली. ऑल इंडिया सर्व्हे ऑफ हायर एज्युकेशन नुसार २०१० मधे ३३ टक्के स्त्रियांनी विज्ञानात पी एच डी घेतली तर २०१८ त हे प्रमाण ४० टक्के च्या पलीकडे पोचले. विज्ञानात पी एच डी करणाऱ्या स्त्रियांमधे अमेरिका, चीननंतर भारताचा क्रमांक आहे तिसरा. पण पुढेही जाऊन संशोधन, शोधनिबंध, शिष्यवृत्या मिळवून पुढील क्षेत्रे काबिज करणे या बाबतीत एकूणच स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत जगातच मागे आहेत. भारतात पुरुष प्रधान संस्कृतीची पाळेमुळे खोल रुजली आहेत. बौध्दिक देदीप्यमान कामगिरी ऐवजी वरील तथाकथित ‘साडी कुंकू साधेपणा’चा उदोउदो’ हे याचेच निदर्शक परिमाण आहे. पुरुषप्रधान समाजात सत्तास्थाने पुरुषांकडे असतात आणि सत्तास्थानी पुरुष असणार हेच समाजात गृहित असते, त्यामुळे ती त्या संस्कृतीची चिन्हे कशी ढळढळीतपणे सांभाळते याचे तोंडभरून कौतुक तिच्या बौध्दिक आणि व्यावसायिक कर्तबगारी पेक्षा जास्त होते. विज्ञान क्षेत्रात याला तोंड देत यशस्वी होणाऱ्या भारतीय भौतिक शास्त्रज्ञ अण्णामणि, आयडा स्कडर, बायोकाॅनच्या संस्थापक किरण मझुमदार, जेनेटिक्स जीनोमिक्सच्या सुप्रिया काशीकर, विषाणुशास्त्रज्ञ गगनदीप कांग, भौतिकशास्त्र प्राध्यापक व जम्मू विद्यापिठाच्या कुलगुरु अंजू भसीन असे काही अपवाद आहेत. ‘लॅब हाॅपिंग’ या आपल्या पुस्तकात अशिमा डोग्रा आणि नंदिता जयराज यांनी अनेक मुलाखती घेऊन केलेल्या संशोधनात या क्षेत्रातील महिला संशोधकांनी सांगितले की,
त्यांना प्रयोगशाळांमधे, वैज्ञानिक बैठका, नोकरीच्या मुलाखती, फेलोशिप, संशोधन अनुदान, पुरस्कार, विज्ञान अकादमी अशा विविध पातळ्यांवर भेदभावाला सामोरे जावे लागते. त्यांच्या क्षमतेविषयी आकलनाविषयी पुरुषप्रधान संस्कृती-मनातून आलेले पूर्वग्रह बाळगले जातात. विज्ञानाच्या संबंधित क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व आहे आणि अपवाद वगळता ते स्त्रियांना सामावून घेण्यास उत्सुक नाहीत, असे आढळते.
चांद्रयान ३ च्या यशातील सामील महिलांचे कौतुक करताना आपण त्यांच्या निखळ बौध्दिक कर्तृत्वाचे कौतुक करावे. त्या काय घालतात इ गौण आहे.(समारंभात वावरताना जरा असते हे सजणेसवरणे इतकेच ते असावे/राहावे.) याही स्त्रिया एरवी कामावर फाॅर्मल ड्रेस कोडमधेच असतात, असू द्यात, कारण ते महत्त्वाचे नाही. ती त्यांची व्यावसायिक गरज असते. आज आय टी क्षेत्रात लाखोंनी स्त्रिया आहेत त्यांचीही ती गरज असते.
त्या स्त्रीत्वाचा कर्तृत्वाचा झेंडा उंच फडकवत असताना आपली मान उन्नत व्हावी, त्याला कमीपणा आणणाऱ्या या अशा भ्रामक समजुतींना आपण मूठमाती द्यायला हवी आता.
शाळा काॅलेजमधून कमलीच्या हुशारीने पुढे जाणाऱ्या आपल्या मुलीबाळी नातींसाठी आपण एक निर्मळ कर्तबगारीचीच मशाल बाळगायची तेजस्वी संस्कृती आपण नव्याने निर्माण करू यात.ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे.
चांद्रयानानंतर आता भारतीय महिला चंद्रावर पाऊल ठेवणार आहेत. तिला मुक्त मोकळा श्वास घेऊ द्यात.
‘जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळूनी किंवा पुरूनी टाका’ असे आवाहन कवी केशवसुत यांनी एकोणिसावव्या शतकाअखेरीस त्यांच्या ‘एक तुतारी’ द्या मज आणुनी’ या कवितेत केले होते. या नव्या चांद्र यानात प्रवास करणाऱ्या मुली हेच मागताहेत आता बौध्दिक चंद्रप्रकाश. स्री जीवनात एक निर्मळ शीतल ज्ञानप्रकाश पसरू देत ही आजची देवीचरणी प्रार्थना.

🌺 Navratri Day 5 – Skandamata: Compassion & Nurturing 🌺
Maa Skandamata embodies motherly compassion and the strength to nurture. For school leaders and trustees, this is a reminder that true leadership is not about control—it’s about care, collaboration, and creating ecosystems where everyone thrives.
A strong school is never built in isolation. It flourishes when trustees foster trust with parents, empower teachers, and align management towards a shared vision.
💡 Compassion in leadership doesn’t weaken governance—it strengthens it. Because when leaders nurture people, people nurture institutions.
✨ This Navratri, let us commit to being not just administrators of schools, but guardians of communities.
-Jagruti Dharmadhikari
यावर आपले मत नोंदवा