विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

सहावी माळ

|| श्री कुलस्वामिनी मर्दडी माता प्रसन्न ||

सन्मान स्त्रीत्वाचा – पुरूषाच्या दायित्वाचा!

जनमन

चढला फुलला वेल सायलीचा
लाभे त्याला आशीष माऊलीचा

लगडले माझ्या घराला रामचांदणे
की म्हणावे त्याला कृष्णनांदणे?

चांदणनांदण्यात सवे येतेच वनिता
कधी राधा-कृष्ण कधी राम-सीता

भारतीयांचे हे आराध्य दैवत
पाझरते जेथे सारे हृदगत

हे सार आपुल्या संस्कृतीचे
प्रतिबिंब उमटते जनमनाचे!

वृंदा आशय

नवरात्रि-स्तवनाञ्जलिः

हेमंत प्रकाश राजोपाध्ये

षष्ठी:

आश्विन शु.६।। शके १९४७

शशिबिम्बस्मिता चार्वी महेश्वरी सुखप्रदा।
कात्यायनी महावीरा आज्ञाचक्रप्रतिष्ठिता।।


: चंद्रबिंबाप्रमाणे सुंदर अशा आपल्या स्मितहास्याद्वारे त्रिभुवनास सुखावणारी महावीरा भगवती कात्यायनी ही आज्ञाचक्रात प्रतिष्ठित असते.

With a smile radiant like the moon, Goddess Katyayani brings joy to the three worlds. The mighty heroine is enshrined in the Ajna Chakra.

श्रुतिस्मृतिपुराणानां ध्येया चिन्त्या परा गतिः।
बौद्धक्षपणकैश्चापि संस्तुता पूजिता वरा।।


: वेदशास्त्रे, पुराणे, स्मृतिग्रंथ या साऱ्यांचा चिंतनविषय असलेली भगवती राजराजेश्वरी सकळ जगाला उत्तम गती प्रदान करते. (कदाचित) याचमुळे ती बौद्ध आणि जैन धर्मीय यतिवर्गाद्वारेही पूजिली व स्तविली गेली आहे.

She is the supreme goal, contemplated in the Vedas, Smritis, and Puranas. Bestower of auspicious progress to the world, She has even been worshipped and praised by Buddhist and Jain monks.

ईशक्रोधोद्भवा घोरा दुर्गा शार्दूलवाहना।
चण्डिका भद्रकालीति शब्दशास्त्रेषु कीर्तिता।।


: साक्षात् महादेवाच्या क्रोधातून प्रकटलेली, प्रसंगी घोर स्वरूप धारण करणारी, सिंहवाहन असे हे देविस्वरूप चंडिका, भद्रकाली अशा नावांनी विविध श्रेष्ठ ग्रंथांत वर्णिले गेले आहे.

Born from the wrath of Lord Shiva, She assumes a fierce form when needed, riding a lion. The scriptures praise Her as Chandika and Bhadrakali.

कात्यायनसुता देवी देवत्रा मुनिकन्यका।
महिषासुरहन्त्री सा पायाद्भक्तजनान्मुदा।।


: कात्यायन ऋषींच्या घरात जन्मल्याने मुनिकन्या मानली गेलेली, देवादिकांचे रक्षण करणारी, महिषासुरविमर्दिनी भक्तजनांवर प्रसन्न होवो.

As the daughter of Sage Katyayana, revered as a sage’s child, She protects the gods. May the slayer of Mahishasura, the joyous Goddess, bless Her devotees.

सुमङ्गला महाशक्तिः चतुर्वर्गफलप्रदा।
हिरण्याभा प्रेरयेत्सा विश्वकल्याणहेतवे।।


: परममांगल्याचे रुप, चारी पुरुषार्थ सिद्ध करून देणारी, सोन्यासारखी झळाळणारी महाशक्ती आम्हाला समाजहितासाठी काम करण्याची प्रेरणा देवो.

She is the embodiment of supreme auspiciousness, the giver of the four aims of life. Shining like gold, may this Mahashakti inspire us to work for the welfare of the world.

व्रजगोपाङ्गनापूज्या कालिन्दीतटसंस्थिता।
नमस्तस्यै महादेव्यै धर्मकार्यार्थसिद्धये।।


: श्रीमद्भागवत पुराणातील दाखल्यानुसार यमुनातटावरील व्रजभूमीतल्या गोपिकांची पूज्य असलेल्या भगवतीला आमच्या धर्म-कर्तव्यपूर्तीसाठी प्रणाम करतो आहोत.


Praised in the Bhagavata Purana, She is worshipped by the gopikas of Vraja on the banks of the Yamuna. We bow to that Mahadevi for the fulfillment of our dharma and duties.


देवळातील अंधार : ६
शारदीय नवरात्र चिंतन
शनिवार, दि २७ सप्टेंबर २०२५
© प्रतिभा मिस्त्री

एक दुर्लक्षित आध्यात्मिक अधिकारी स्त्रीसंत बहिणाबाई पाठक
(बहिणाबाई पाठक यांचे वज्रसूचिकोपनिषदावर असलेले भाष्य)

ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात चातुर्वर्ण्य व स्वधर्म यावर ( गीता श्लोक ४१ ते ४८ ) मधे सविस्तर चर्चा आहे. ज्ञानदेव त्यांची चर्चा विस्ताराने करतात. याहीपलीकडे जाऊन संसिध्दी प्राप्त करणाऱ्या सिध्दाची लक्षणे ही तेथे गीतेमध्ये दिलेली आहेत. गुरुकृपेने जो भाग्यवंत ही संसिध्दी प्राप्त करू शकतो ते श्लोक ५० ते ५३ आले आहे.

या संसिध्दी प्राप्त करून देणाऱ्या सर्व तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत उदाहरण जे आध्यात्मिक परंपरेत दुर्लक्षित आहे ते मला येथे आज सांगायचे आहे. ते आहे स्वतःला तुकाराम शिष्या म्हणवून घेणारी संत बहिणाबाई पाठक (काळ १६२८ ते सु. १७००) या द्रष्ट्या संत विदुषीचे. मनाने तुकारामांचे शिष्यत्व पतकरणारी बहिणा आपल्या गुरू संत तुकाराम यांना कधीही प्रत्यक्ष भेटलेली नाही. तिच्या अभंगांवरून आपल्याला कळते की तुकारामांनी देह ठेवल्यानंतर तिला स्वप्नदृष्टांत दिला व दिक्षा दिली. ती ब्राह्मण असल्याने तिला तुकारामांचे शिष्यत्व घेण्यास घरातील कर्मठ वातावरणाचा कडवा विरोध होता. पती अत्यंत कर्मठ व अती संतापी असल्याचे ती नोंदवते व त्याचा झालेला असह्य कौटुंबिक त्रासही व्यक्त करते. पण हा चरित्रभाग पूर्ण विसरायला लावते, ती तिची प्रखर विद्वत्ता आणि तिचा असलेला आध्यात्मिक उच्च अधिकार.

या अधिकारी वाणीने तिने २२ सामान्य उपनिषदांमधे सामील असलेले “वज्रसूचिकोपनिषद” यावर अभंग लिहिले आहेत. हा वेदान्तग्रंथ चातुर्वर्ण्य समाजविभाजनावर आणि त्यानुसार केलेल्या मानव विभाजनावर प्रखर तात्त्विक हल्ला करतो आणि कोणताही मानव अस्तित्वाची सर्वोच्च आध्यात्मिक सिध्दी प्राप्त करू शकतो, हे ठामपणे सांगतो. ज्याला आत्मैक्य अर्थात मानवातील अभेदत्व व समत्त्व म्हणता येईल त्याचा तात्त्विक आविष्कार हे उपनिषद करते. मानवी बुध्दी चांगले-वाईट, खरे-खोटे, योग्य-अयोग्य इ मधे फरक करते ती विवेकबुध्दी आणि या विवेकबुध्दीचा वापर करूनच खरा ब्राह्मण कोण ते ठरते, हे तत्त्वज्ञान हे उपनिषद मांडते. वर्णभेदावर येथे प्रखर टीका आहे. बहिणाबाईचा या उपनिषदाचा अभ्यास होता, हे तिच्या अभंगांमधून पुन्हापुन्हा प्रत्ययाला येते. म्हणून या उपनिषदाची एक अभ्यासक म्हणून तिला महत्त्वाचे स्थान आहे. येथे काही उदाहरणे देत आहे;


१. जीव हा ब्राह्मण म्हणावा इत्यर्थ।
तरी अर्थ येथे सापडेना।
सर्वांठायी जीव सारिकाचि एक।
पशुपक्षी देख चांडाळादि।।


२. देह तेथे जीव, जीव तेथे देह।
ब्राह्मण तो काय म्हणो तया।
बहिणी म्हणे सर्व योनींची शरीरे।
सारिखींचि बा रे विवंचिती।।


३. जीव प्राणियासी एक म्हणून| ब्राह्मणत्व देव म्हणो नये।


४. बहिणी म्हणे देह ब्राह्मण तो नव्हे। विवेकवैभवें
विचारिता।


५. याति नव्हेचि ब्राह्मण।ब्राह्मणाची खूण वेगळीच।।

जो सदैव ‘ब्रह्मी नांदे’ तोच ब्राह्मण म्हणून ब्राह्मणत्वाचे नऊ गुण ज्ञानदेव विस्ताराने वर्णन करतात व पुढे गीतेतील ब्रह्मवाद म्हणजे जीवत्वातील साम्यत्व विस्ताराने सांगतात. बहिणाबाई ही या तत्त्वचिंतनावरील पहिली स्त्री भाष्यकार आहे.

तुलनेने बहिणाबाई पाठक या फारशा परिचित संत नाहीत.देवळातील हा अंधार त्या देवळाच्या गाभाऱ्यातीलच आहे!हा अन्यायही दूर व्हायला हवा आहे. स्त्री संतपरंपरेत एक बंडाचा ध्वज हाती असलेली ही अलौकिक स्त्री संत आहे. या अलौकिकतेला हिऱ्यासारखे जपायला हवे.

आध्यात्मिक समतेचा बहिणाबाई पाठक यांनी फडकावलेला हा ध्वज आजही तळपत राहून मार्ग दाखवत आहे. तो केवळ अलौकिक ज्ञानठेवा आहे.कारण हा उपनिषद चिंतनाचा ज्ञानमय आविष्कार आहे.
एक स्त्री म्हणून ती एक सिध्द योगी आहे हे दर्शवीणारा आहे.

देवीचिंतनामधील खऱ्या आचार्य पदाला पोचलेल्या या वेदवतीला वंदन करूनच आपल्याला पुढे जावे लागेल.


⚖️ Navratri Day 6 –

Jagruti Dharmadhikari

Katyayani: Courage, Justice & Integrity ⚖️
Maa Katyayani symbolizes fearless strength and righteousness—qualities every school leader must embody.
True leadership in education is not measured by titles or authority, but by the courage to stand for fairness. Whether in admissions, opportunities, or policies, a leader’s greatest duty is to ensure equality, inclusivity, and justice for every learner.
🌱 When leaders uphold integrity, schools become safe spaces where talent thrives, diversity is respected, and no child is left behind.
✨ On this day of Navratri, let us remind ourselves:
A school leader is not just an administrator, but a guardian of fairness and hope.


यावर आपले मत नोंदवा