विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

आठवी माळ

||श्री कुलस्वामिनी मर्दडी माता प्रसन्न||

सन्मान स्त्रीत्वाचा – पुरुषाच्या दायित्वाचा

रक्षण

आंदोळीले मन, ताडीले तन

त्यास काय होते, ज्यास रामाचे रक्षण !

कर्मकांड वाटे ओझे, मन जेंव्हा निखळ ताजे

करी देवाचे पूजन, नित्य कामकाजे !

प्रेमेभरी भेटतो देव, सारा अहम् सरे

जिवा-शिवाच्या भेटीला कशा हवेत पसारे?

पानावले डोळे, दुखावले मन

तुज अर्पियले, तू अखंड सावधान !

सावरतोस ऐसा, वाढे आत्मबळ

तुझ्याच जीवावर, जीव सोशितो रे कळ !

वाहून जाऊ दे अज्ञानी दुःख,

ढवळून सारा तळ

तुज अर्पियलेले

तन-मन-धन

होऊ दे रे निर्मळ ! *

वृंदा आशय


नवरात्री_स्तवनाञ्जलि

आश्विन शु.८।। शके १९४७

हेमंत प्रकाश राजोपाध्ये

अष्टमी

या देवी वेदविनुता परमा शाम्भवी शिवा।
श्वेतवृषसमासीना शरदिन्दुप्रभा वरा।।
Described in the Vedic scriptures, this pure Goddess, seated on a white bull, is the power of Lord Shiva and shines like the beautiful moon of the autumn season.

श्वेताम्बरधरा दिव्या शिवचित्तप्रसादिनी।
त्रिशूलडमरूहस्ता वराभयकराऽनघा।।
Clad in white garments, She pleases the mind of Lord Shiva. Holding the trident and drum, She bestows boons and fearlessness.

देवासुराभिसम्पाते याऽभूद्देवसाहाय्यकृत्।
त्रैलोक्यमुग्धकारी याऽभवद्धर्माभिरक्षणे।।
In the battle between gods and demons, She aids the gods, protecting dharma, and with Her immense power captivates the entire universe.

शिवालीकस्य शिखरे सुप्रतिष्ठितविग्रहा।
आविर्बभूवसह्याद्रौ वाताप्यां भक्तकारणात्।।
Established on the peak of the Shivalik mountains, She appeared in Badami, southern India, as Shakambhari, appearing to bless devotees.

शान्तमुद्रा तपोनिष्ठा शिवार्पितमनोरथा।
शाकम्भर्यन्नपूर्णा सा सुखदा वनशंकरी।।
In a serene and pure posture, devoted to Lord Shiva, the ascetic Goddess Shakambhari, also known as Annapurna, grants happiness and is called Vanashankari.

सा पायाद्वनगौरी नो महाकारुणिका भवा।
इहामुत्रफलैर्नित्यं मोक्षदा प्रभवेच्च शुभा।।
May this immensely compassionate, world-creating Goddess Vanagauri bestow worldly and spiritual happiness, and grant liberation both here and beyond.


देवळातले अंधार: ८
शारदीय नवरात्र चिंतनःआश्विन शु ८,
मंगळवार दि ३० सप्टेंबर २०२५
©प्रतिभा मिस्त्री

लोकांनी निवडून पाठविलेल्या देवीयाँ

होय आज आपण दोन्ही सभागृहामधे निवडून पाठविलेल्या आपल्या स्त्री प्रतिनिधी यांच्या बद्दल वाचणार आहोत. पण येथे आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्य व व्यक्तिगत तपशील पूर्ण टाळणार आहोत. निवडून आलेली एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्या शक्तीचा आविष्कार लोकशाहीच्या दोन्ही सर्वोच्च सभागृहात होतो का याचा विचार करणार आहोत. कारण त्या कायदा निर्मितीमधे प्रत्यक्ष सहभागी असतात. स्त्री शक्तीचा हा एक खरा लोकशाही आविष्कार आहे.
यापैकी लोकसभा ही प्रत्यक्ष मतदानाने निवडून आलेल्या प्रतिनिधींची असते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात (जे की राष्ट्रपतीकडुन नामनिर्देषित केले जातात). त्यांच्यापैकी ७४ या २०२४ मधे लोकसभेवर निवडून आलेल्या महिला आहेत. म्हणजे १३.६२% स्त्रिया आहेत. राज्य सभेत संख्याबळ एकूण २२४ आहे, त्यांच्या मधे फक्त २४ स्त्रिया आहेत. म्हणजे १३% फक्त. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह म्हणून मानले जाते आणि ते कधी लोकसभेसारखे विसर्जित होत नाही. लोकसभेतील निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या मधून मतदानाने त्यांची निवड होते. राष्ट्रपतींनी पाठवलेले सन्माननीय प्रतिनिधित्व हेही असते (सध्या १२).

या २०२४ च्या निवडणुकीत निवडणूक लढवणाऱ्या स्त्रियांमधे १०% वाढ झाली, पण निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये किंचितशी घट झाली. सर्वसाधारणपणे गेल्या पंधरा वर्षांमधील हे प्रमाण जरासे वाढलेले दिसते. आपण एकूण लोकसभा सीट्स पैकी एक तृतीयांश संख्या स्त्रियांसाठी मान्य केल्या आहेत, पण पक्ष पातळीवर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. २०२४ मधे एकूण ७७ स्त्रिया निवडून आल्या आहेत, तर ही आकडेवारी १४.७% येते. यांमध्ये बीजेपी १६% काॅंग्रेस १३% व तृणमूल काॅंग्रेस यांचे प्रमाण जास्त आहे. पण जागतिक क्रमवारीत पुरुष-स्त्री प्रतिनिधित्व तुलनेत भारतीय स्त्री प्रतिनिधित्व हे १८५ देशांच्या यादीत १४३ व्या क्रमांकावर आहे! उदा साऊथ आफ्रिका ४६% यू के ३५% यू एस २९% इत्यादी. हे असे का आहे याची अनेक कारणे आहेत, पण बीजेपी च्या निवडून आलेल्या उदिता त्यागी म्हणतात ते खरे कारण आहे:”Politics is a full time commitment, not a part -time venture. Women often juggle many responsibilities at home, and sometimes, it’s challenging to balance both roles effectively.”
याशिवाय राजकीय क्षेत्रात टिकून राहण्यासाठी राजकीय निर्णयप्रक्रिया व कायदे इ चे त्यांचे ज्ञान अद्ययावत नसते. अगदी पंचायत राज मधे निवडून आलेल्या बहुसंख्य स्त्री प्रतिनिधींना त्याचे सुरवातीला प्रशिक्षण द्यावे लागते. पण एकदा का त्या या दृष्टीने सक्षम झाल्या की त्या फार चांगल्या क्षमतेने लोकहितांची कामे करतात हा ग्राम पंचायतींच्या ३३% प्रतिनिधित्वाचा यशस्वी अनुभव आहे.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे राजकारण करताना वैयक्तिक चारित्र्य हनन आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे एकूणच असलेले असमान सामाजिक वातावरण आणि गृहित धरलेली अन्यायकारक समीकरणे व सामाजिक संकेत या सर्वांचे दबाव स्त्री प्रतिनिधींना जास्त सोसावे लागतात. उदा घरातील जवळच्या व्यक्तीचे आजारपण असेल आणि लोकसभा अधिवेशन असेल तर प्रतिनिधित्व सांभाळत राजकीय जबाबदारी निभावताना मानसिक ताणांना तोंड द्यावे लागते. सामाजिक संकेत तिची कसोटी पाहातात. याखेरीज प्रत्यक्ष निवडणुकीतही पूर्ण झोकून काम करावे लागते. प्रचारसभा घेणे, गेट मिटींग्ज आयोजित करणे, धोरण पत्रिका काढणे, सार्वजनिक सभेतून बोलणे, मतदारांच्या गाठीभेटी घेणे, चौकाचौकात मिटींग्ज घेणे, इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचारांना समर्थपणे तोंड देणे आणि आता नवीन पण अजस्त्र झालेले सोशल मिडिया संवाद राखणे ही सर्वच शारीरिक व मानसिक शक्तींची परीक्षा पाहाणारी कामे असतात, २४ तासही अपुरे पडावेत अशी परिस्थिती असते.
याखेरीज फार महत्त्वाचे, पण जे पडद्यामागे न दिसणारे कारण आहे, ते निवडून येण्यासाठी निवडणुकीत खर्च करावा लागणारा प्रचंड पैसा. आयोगाने मंजूर केलेल्या रकमेमधे कोणत्याही उमेदवाराला निवडणूक लढवता येत नाही. यामधे खूप काही खूप हुशारीने केले जाते, करावे लागते. चहापाणी नाष्टा दोन जेवणे दिल्याखेरीज कार्यकर्ते भेटणार नाहीत. त्यामुळे बळकट आर्थिक शक्ती असणारे उमेदवारी मिळविण्यात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. रिझर्व्हेशन व जातींच्या प्रतिनिधित्व यांसाठी टोकाची रस्सीखेच असणाऱ्या कमालीच्या स्पर्धात्मक राजकारणाला तोंड देणे आणि या परीक्षेतून यशस्वीपणे बाहेर पडणे सोपे नसते. आजतर ते फार अवघड झाले आहे. सत्ता समीकरणेच बदलली आहेत.

आपण वर पाहिले आहे, हे प्रमाण एकूण संख्येने अनुक्रमे १५% व १३% एवढेच आहे. खूप काही अजून साधायचे आहे. थोडीशी तुलना करू आपण स्त्री प्रतिनिधित्वाच्या प्रमाणाचीः साऊथ आफ्रिका, यू के, यू एस, याचे प्रमाण आपण पाहिले, पण आपला शेजारी नुकताच नव्याने झालेला बांगला देश(२१%) हाही पुढे आहे आपल्या!

प्रतिनिधित्व आणि त्याबाबतच्या उणिवांचे अगदी पक्ष पातळीवरही अभ्यास आहेत, राष्ट्रीय व राज्य पातळीवरचे अभ्यासही आहेत.

निवडून आलेल्या प्रतिनिधींचे काम काय असते?
१. आपापल्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करून त्यांचे प्रश्न धसाला लावणे.
२.सरकारच्या धोरणांवर सतत निगराणी ठेऊन भेदक प्रशन विचारणे व निस्पृहतेने कारभार होईल हे पाहाणे. त्यासाठी खास क्वेश्चन आवर असतात.
३. सरकारचे काम तसेच कार्यवाही अचूक व नेमकी होत आहे यावर डोळ्यात तेल घालून निगराणी ठेवणे.
४. आपत्तीच्या वेळी सर्व सहकार्य देणे.
अशा स्वरूपाची ही जबाबदारी असते. त्यामुळे सभागृहातील प्रश्नांना संबंधित मंत्री वा पंतप्रधान यांना समाधान कारक उत्तरे द्यावी लागतात. कोणत्याही योजनेबाबत चर्चा करणे, खर्च व अंदाजपत्रक मंजूर करणे, विविध अभ्यास मंडळे वा चौकशी समित्या नेमणे अशी ही कामे असतात. कितीही बहुमत असले तरी विरोधी पक्षाला विश्वासात व बरोबर घेऊनच सरकारला काम करावे लागते. लोकशाही व्यवस्थेत ‘हम करे सो कायदा’ चालत नाही.
हे काम नीट होते का? याबाबत स्त्री प्रतिनिधींच्या कामगिरींचा एक अभ्यास केला गेला. १५ वी लोकसभा(मे २००९ ते २०१४) आणि १६ वी लोकसभा(मे २०१४ ते २०१९) मधील पार्लमेंटमधे त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला गेला. त्यात आढळले की निवडून आलेल्या भा ज पा च्या स्त्री प्रतिनिधींनी सर्वांत अधिक प्रश्न आपल्याच पक्षाच्या सरकारला खडसावून विचारले आहेत. अजून एक निरीक्षण असे की आरोग्य, दळणवळण, रस्ते, लघु उद्योग असे विविध रूपाचे बारकाईने विचारलेले प्रश्न या स्त्री प्रतिनिधींनी उपस्थित केले आहेत.
याचा अर्थ या स्त्रिया पक्षाच्या धोरणाच्या एक मूक वाहक बनलेल्या नाहीत. हे चित्र इतर पक्षांबाबतही आढळले.

—-पण हे सर्व पुरेसे अर्थातच नाही. आपले प्रतिनिधित्व गुणात्मक व्हावयाचे तर आपले मतदार अधिक सक्षम व विचारी होणे आवश्यक आहे. स्त्री मतदार संघ व मतदान हे राज्य पातळीवरही विधान सभा निवडणुकीत सहभागी असते. राज्यांसाठीचेही विविध अभ्यास झालेले आहेत. हे सर्व अभ्यास तज्ञांना अधिक विश्लेषणासाठी उपलब्ध आहेत. दोन्हीही सभागृहाच्या ग्रंथालयात अतिशय माहिती पूर्ण ग्रंथ, अहवाल व अभ्यास उपलब्ध असतात. पण अभ्यास करून बोलणारे प्रतिनिधी एकूणच फार कमी असतात. भूतपूर्व सभागृहात नामवंत स्त्रिया होत्या आणि आत्ता ही आहेत. त्यांचे सर्व संबंधित कामकाज इ संदर्भ उपलब्धही आहेत आता नेटवर.
गरज आहे ती पक्षांचे चष्मे बाजूला ठेऊन स्त्री हितासाठी सर्वकाळ दक्ष राहून प्रसंगी सरकारलाही, मग ते कितीही बहुमताचे असो, धारेवर धरणे. मतदार स्त्री जागरूक तर प्रतिनिधीही जागरूक हे सत्य आहे.
त्यासाठी राजकारण, पक्ष, धर्म, भाषा, प्रांत, जात, विभाग, आरक्षित वा न आरक्षित अशा कोणत्याही भिंती नकोत.

आज अष्टमीच्या त्या लढवय्या मातेला हाच जोगवा आहे, आई तुझ्या या लेकींच्या वाटेवर असलेले हे सर्व अंधार दूर कर.
माते, लोकशाहीच्या या मंदिरातही अंधार आहेतच दाटलेले. ते दूर कर.
निवडून आलेल्या या देवियाॅंना तुझे आठ हात दे व त्या आठही हातातली आठही अस्त्रे वापरून दुष्ट शक्तींचा नायनाट करण्यासाठी तुझे मर्दानी शौर्य दे.


Navratri Day 8 – Mahagauri: Purity & Transparency ✨

Jagruti Dharmadhikari


Maa Mahagauri symbolizes purity, clarity, and transformation. For school trustees, this day reminds us that true leadership shines brightest when it is transparent and accountable.
Schools don’t just need infrastructure and policies—they need trust. And trust is built when financial practices are ethical, communication is open, and governance is transparent.
💡 A trustee’s integrity sets the culture of the entire institution. When we lead with honesty and clarity, we inspire teachers, parents, and students to believe in the system we uphold.
🌸 Let us embrace the spirit of Mahagauri—ensuring that our schools are not just well-managed, but well-trusted.


टीप – काही व्यक्तिगत कारणाने नवरात्रातील आठवी माळ काल रात्रीच्या ऐवजी आज सकाळी प्रकाशित होत आहे. त्यामुळे व्यक्तिश : मी आमच्या लेखक – वाचकांची क्षमा मागते. – वृंदा आशय


यावर आपले मत नोंदवा