|| श्री कुलस्वामिनी मर्दडी माता प्रसन्न ||
सन्मान स्त्रीत्वाचा – पुरुषांच्या दायित्वाचा


||ॐ गं गणपतये नम: ||
रे… तू!
तुझेच पूजन
तुझेच दर्शन
तुला समर्पण!
भक्ता पाहतो
मनी हर्षतो
सवेची राहतो
त्याचे सुख
त्याचे दु:ख
तुझेच मुख
कधी तरतो
कधी हरतो
मनी झुरतो
तुला सांगतो
तुला मागतो
तुलाच अर्पितो
तू हरतो..
तूच जिंकतो
तूच खेळतो
तूच इच्छितो
अंत पाहतो
तूच फुलतो
तुझेच पूजन
तुझेच दर्शन
तुला समर्पण!
वृंदा आशय

भावरूप राम
डॉ.. दिनेश प्रताप सिंह
मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम का जीवन आदर्शों का ज्योतिपुंज है। जिस रूप में भी उन्हें देखा जाए, उसी आदर्श रूप में उन्हें पा सकते हैं। सद्गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवाक, दृढ़व्रत, सदाचारी, सर्वभूतहितकारी, विद्वान, सामर्थ्यवान, प्रियदर्शन, आत्मवान, जितक्रोध, द्युतिमान, अनसूयक और योद्धा गुणों से सम्पन्न प्रभु श्रीराम अपने ओज में श्री, भू, कीर्ति, इला, लीला, कांति, विद्या, विमला, उत्कर्षिणी, विवेक, क्रिया और योगशक्ति इत्यादि कलाओं को धारण करते थे। वे जितने गुण-कलाओं से युक्त थे, उतने ही भावरूपों में उनके दर्शन होते थे। इसीलिए गोस्वामी तुलसीदास ने लिखा है, “जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरति देखी तिन्ह तैसी।” जिसके मन मे जैसी प्रबल भावना होती है, उसे श्रीराम उसी भावरूप में दिखाई देते हैं। इस भावना से हम उनके दर्शन लेते हैं, उसी भावना से उनके गुण, रूप, चरित्र और भाव का वर्णन भी करते हैं। बाबा तुलसीदास ने “रामचरितमानस” में बताया है, “रामायण शत कोटि अपारा”। जितने भाव, उतने रामायण।
श्रीराम करुनानिधान थे। जिस भी दीन-दुःखी उनका स्मरण किया, प्रभु ने उदारमन से उसका कल्याण किया। किसी के गुण-दोष की मीमांसा नहीं की। सभी शरणागत उनकी कृपा के पात्र बने। उनके अहित की कामना रखने वाले जयंत, मंथरा, कैकेयी और बाली को भी प्रभु ने अपनी कृपा प्रदान की और भक्ति में डूबे सुग्रीव, विभीषण, जटायु, केवट, निषादराज, शबरी और अहल्या का भी जगत में मान बढ़ाया। शबरी को नवधा भक्ति- श्रवण, कीर्तन, संस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य और आत्मनिवेदन का ज्ञान देकर सम्पूर्ण मानवता को अध्यात्म का सरल और सहज मार्ग दिखाया। सामान्य जन को ही नहीं, अपितु विश्वामित्र, सतानंद, भारद्वाज, शरभंग, अगत्स्य, अत्रि जैसे ज्ञानी-मनीषी ऋषियों की सुदीर्घ तपस्या को सुफल बनाया।
भगवान श्रीराम आदर्श राजा थे। उनके राज्य में किसी प्रकार का भेदभाव नहीं था, अपितु सबके प्रति प्रेमभाव था। वे भरतीय संस्कृति के आधार और एक आदर्श राजा थे। उनके राज्य में दैहिक-दैविक-भौतिक कष्ट की व्याप्ति ही नहीं थी। सभी अपने कर्तव्य का पालन करते हुए सबके साथ आत्मीयता से रहते थे। प्रभु श्रीराम के प्रताप से समाज में किसी प्रकार की असमानता नहीं थी। कोई निर्धन और दुखी नहीं था। यही नहीं तो कोई बुद्धिहीन, लक्षणहीन और अल्पायु नहीं था।
प्रभु श्रीराम ने लोककल्याण और आदर्शों की स्थापना के लिए ही धराधाम पर अवतार लिया था। समाज और लोकजीवन में व्याप्त कुरीतियों को दूर करके और रावण, कुम्भकर्ण, मेघनाद, खर, दूषण, ताड़का, मारीच, सुबाहु, कबंध इत्यादि आततायियों का विनाश करने के साथ ही अनेक अहंकारियों का उन्होंने मानमर्दन भी किया। वे प्रजावत्सल और लोकतंत्र के रक्षक थे। अपनी राजसभा में दोनों हाथ उठाकर घोषणा की, “जौ अनीति कछु भाखौं भाई। बरजहूँ मोहिं सब भय बिसराई।।” यदि मेरे मुख से कोई अनीति की बात निकले, तो बिना किसी भय के मुझे रोकिये। ऐसा राजा दुनिया में नहीं हुआ, जो स्वयं के ऊपर अपनी प्रजा का अधिकार स्वीकार करता हो। सम्पूर्ण भारत वर्ष को उत्तर से दक्षिण प्रभावित और अनुशासित करने वाले श्रीराम हमारी संस्कृति, सभ्यता, उत्कर्ष और लोकजीवन के उन्नायक हैं। विजयदशमी उनके पराक्रम और शौर्य का परिचायक है। आज विजयदशमी पर्व पर प्रभु श्रीराम को नमन।
मो.9619954242/9869240572

चंडभास्वरा साजिरी दिसे जगदंबा ।
मर्दुनि दैत्या कष्टुन हासे जगदंबा ।।
कडकड कडकड शस्त्रे परजे जगदंबा ।
लखलख लखलख झळाळते श्रीजगदंबा ।।
मंगलरूपा-ब्रह्मस्वरूपिणी जगदंबा ।
नटविण्या जगा स्वतः नटतसे जगदंबा ।।
ज्ञानस्वरूपिणी ज्ञानमयी ही जगदंबा ।
पंचभूतब्रह्मांडस्रष्ट्रि ही जगदंबा ।।
जगद्योनि ही शिवाह्लादिनी जगदंबा ।
विश्वैश्वर्या पुण्यनिधाना जगदंबा ।।
शिवस्वरूपिणि-मूळप्रकृति ही जगदंबा ।
अष्टभुजा-दशविद्यामति ही जगदंबा ।।
भक्तकाम-सत्वरदात्री ही जगदंबा ।।
सौख्यप्रदा होवो सुखरूपिणि जगदंबा ।।
उदयोऽस्तु ।
-हेमंत प्रकाश राजोपाध्ये
देवळातील अंधार: १०
शारदीय नवरात्र चिंतन: आश्विन शु . १० दशमी
गुरुवार दि २ ऑक्टोबर २०२५
© प्रतिभा मिस्त्री
प्रकाशातील महिला आणि देवळातले अंधारः १०
आजचे शीर्षक विरोधाभास नाही. कारण शारदीय नवरात्र चिंतनांमधे मी ( दि २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५) सर्वसाधारण स्त्री पण वेगवेगळ्या स्तरांवर वावरणारी डोळ्यासमोर ठेऊन तिच्या जीवनातील अंधार निवडले होते. शक्तीपूजा करताना संकल्पसिध्दीसाठी देवता उत्सव व पूजा तर प्रचंड उत्साहाने साजरे करायचे,पण प्रत्यक्षात अवहेलना, दुर्लक्ष आणि अपमान हेच या स्त्रियांचे जीवन असते, हा दांभिकपणा ही सर्वशक्तीने सांभाळायचा हा विरोधाभास मी दाखवला होता. वाईट याचे वाटते, की यात स्त्रियांचाही सहभाग असतो. यामागे अज्ञान आणि अपुरे सामर्थ्य हेच खरे कारण आहे. यात सुशिक्षित स्त्री कुठे आहे, ती तिचे आज उत्तरदायित्व विसरली आहे काय, असा प्रश्नही मी उपस्थित केला होता. कारण शिक्षण व संस्कार या दोन्हींशी जिचा काही संपर्क नाही आला तिला दोष देणे बरोबर नाही. पण ज्या सुशिक्षित व संस्कृती संपन्न जीवन जगतात त्यांची काही जबाबदारी व कर्तव्ये आहेत. स्त्री सुधारणेच्या पहिल्या कालखंडात राष्ट्रीय पातळीवर राजा राम मोहन राॅय व महाराष्ट्रात न्या. महादेव गोविंद रानडे यांनी याची पहिली सुरुवात केली आणि नंतर अनेक पिढ्या अनेक पुरुष कार्यकर्ते या आघाडीवर स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी झटले. त्यांच्या शिक्षणासाठी म फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. आता २०२५ च्या काळात या सुधारणा आपण स्त्रियांनी समर्थपणे पुढे न्यायच्या आहेत, यात आमची पांढरपेशी स्त्रीच जर गतानुगतीक रूढींचे अवडंबर माजवत असेल तर कसे चालेल? पुढच्या अनेक स्त्रियांच्या पिढ्या याचा दोष आपल्याला देत राहातील.
ज्ञान हे एक मूल्य आहे आणि त्या वाटेवर खंबीरपणे आपण चालले पाहिजे. आज याबाबत चिंतन आहे. या ज्ञान हे मूल्य मानून भारतातील सर्वोच्च संशोधनात सन्मान मिळवणाऱ्या अशा स्त्रियांच्या बाबत त्यांच्याच शब्दांमधे विचार करत आहोत. येथे खाली फोटो आहे इंडियन एक्स्प्रेस च्या एका बातमीचा: The biggest science awards go to men….हा संपूर्ण लेखच सुंदर होता त्यामधे आलेली आहे. य शनिवार २८ आँक्टो २०२३ च्या या अनुराधा मस्कारेन्हस यांचा हा लेख आहे. या प्रकाशातील महिला म्हणते आहेत, कारण अत्यंत उच्चविद्याविभूषित, उत्तम कार्यक्षेत्र व उत्तम करिअर करणाऱ्या या स्त्रिया आहेत. पण म्हणून त्यांचे प्रश्न ही सुटलेले नाहीत. ते कसे ते पाहाः ही मानाची शांतिस्वरूप भटनागर पारितोषिके राष्ट्रीय स्वरूपाची असतात आणि त्यांची निवड कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR करते. तिच्याकडे या ॲवाॅर्ड साठी नामांकने पाठविणाऱ्या संस्था आहेतः CSIR च्या गव्हर्निंग बाॅडीचे मेंबर, भारतातील विद्यापिठांचे व्हाइस चॅन्सलर्स, आयायटीचे डायरेक्टर्स, महत्त्वाच्या आर अँड डी संघटनांचे डायरेक्टर जनरल उदा DRDO, ICMR, ICAR IMD, CSR चे डायरेक्टर्स, NTI आयोगाचे मेंबर्स आणि भारत सरकारचे सायन्स डिपार्टमेंट आणि भटनागर पारितोषिक प्राप्त झालेले शास्त्रज्ञ. साधारणपणे ४५ वर्षे ही वयाची अट असते. ही पारितोषिक निवड प्रक्रिया ही पूर्णपणे गुणवत्ता आधारित व पारदर्शक असते असे CSIR चे प्रमुख डॉ शेखर मांडे (त्या वेळचे) म्हणतात. याच रीतीने आॉक्टो २०१८- २२ या काळातील शास्त्रज्ञांची निवड झाली आहे, हे ते सांगतात.
या निवड समितीत दोन तरी स्त्रिया शास्त्रज्ञ असतील हे पाहिल्याचे ते सांगतात. अशा अत्यंत मूलभूत संशोधनात गुणवत्तेच्या निकषांवर पुरून उरणाऱ्या विविध सायन्स क्षेत्रातील निवडक सोळा जणींची एक यादीच या लेखासोबत अनुराधा मस्कारेन्हेस यांनी त्यांच्या कर्तृत्वासह छापली होती. त्यामधे त्या दहाही जणी या सन्मानासाठी सार्थपणे योग्य होत्या. पण त्यांना डावलून त्यांच्यापेक्षा जरा कमीच असे शास्त्रज्ञ निवडले गेले! त्यांच्या आणि CSIR मधील तज्ञांच्या प्रतिक्रिया ही तेथे समाविष्ट होत्या.
तर या स्त्री शास्त्रज्ञांची व्यथा काय?

१. वर दिलेल्या फोटोतील प्रतिक्रिया डॉ शुभा टोले यांची आहे. त्या न्यूरोसायंटिस्ट, सिनिअर प्रोफेसर आणि ग्रॅज्युएट स्टडीज टाटा इन्स्टिट्यूट आँफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेच्या डीन आहेत. स्त्रिया स्वतःची प्रसिध्दी सहसा करत नाहीत, असे त्या म्हणतात. (म्हणजे पुढे पुढे होऊन स्वतःची टिमकी वाजवण्याची अहमहमिका त्यांच्यात नसते. त्यासाठीचे लाॅबिंइंग त्या करत नाहीत. हेही एक पुरुषी कौशल्य आहे का?)
२. त्या पुढे म्हणतात, जे गुण या पारितोषिक निवडीसाठी ग्राह्य धरतातः क्रिएटिव्हिटी, नावीन्य, भविष्यातील उपयुक्तता, नेतृत्व हे स्त्री व पुरुष यांच्या मधे भिन्नपणे व्यक्त होतात. त्याबद्दल निवड समितीला योग्य त्या दिशांचे भान दिले जावे, त्यातील संवेदनशीलता समजून घेणे गरजेचे आहे. (Sensitize the Selectors.)
३. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पंचेचाळीसपर्यंतचे वय हे अपत्यांचा जन्म, पालनपोषणादी जबाबदाऱ्यांचे असते स्त्रियांसाठी त्यामुळे माता म्हणून या शास्त्रज्ञांना तारेवरची कसरत करावी लागते. डॉ मंगला नारळीकर, स्वतः एक नामवंत गणितज्ञ होत्या आणि नोबेल पारितोषिक प्राप्त डॉ जयंत नारळीकर यांच्या पत्नीही. त्यांनीही डॉ जयंत हे मुलींकडे मंगला यांनी लक्ष द्यावे अशाच मताचे होते, असे म्हटले आहे, जरी आपल्या बुध्दीमान पत्नीच्या करिअरची त्यांना जाणीव होती तरीही.
४. घराजवळ कार्यक्षेत्र असल्याने आपल्या तान्ह्युल्याला दूध पाजणे कसे शक्य झाले ते एका शास्त्रज्ञ स्त्रीने सांगितले आहे, हे एक छोटेसे उदाहरण किती बारकाईने या स्त्रियांचा विचार व्हायला हवा, याचे निदर्शक आहे.
येथे मी फक्त काही मुद्दे घेतले आहेत. सुदैवाने सरकारी यंत्रणा याबाबत संवेदनशील झाली आहे आणि वयाची अट त्यांच्यासाठी शिथिल करणे अशा काही सुधारणा होत आहेत. चांद्रयान यशानंतर स्वतः पंतप्रधान या शास्त्रज्ञ स्त्रियांना भेटले. नुकतीच Special Call for Women Scientists CSIR-ASPIRE ची घोषणाही झाली आहे. खाली संध्या शेणाॅय या स्टॅनफोर्ड या जगातील अव्वल मानांकित विद्यापिठाने तयार केलेल्या अत्युच्च केवळ दोन टक्के श्रेष्ठ शास्त्रज्ञांमधे डाॅ संध्या शेणाॅय यांचा समावेश आहे, त्यांचा फोटो दिला आहे.
ज्ञानमार्गाला आपली संस्कृती श्रेष्ठ साधना मार्ग मानते. तथाकथित मूर्तिपूजा इ अज्ञानातून येते असे आपले आध्यात्मिक तत्त्वज्ञान आहे. पण सर्वसाधारण भक्त या वाटेवरून हळूहळू जात शेवटी निर्गुण निराकार परब्रह्म साध्य करतो असा हा संकेत आहे. या परिस्थितीत आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जागृत ठेवून समाजहितासाठी दक्ष राहाणे हे सुजाण मनाचे कर्तव्य आहे. अज्ञानाने व्याप्त अंधांरांची वाट जेवढी संपेल तेवढी चांगलीच आहे.धार्मिक उन्माद आणि त्यांचे अडाणी आविष्कार समाजमन निरोगी नसल्याचे लक्षण आहे. विवेक संपन्न धार्मिक संस्कृती ही भारतीयांनी सर्व जगात प्रथम उदघोषित केली. सत्य हे सुंदर व पवित्र आहे हे आपण जगाला सांगितले. ही चिंतेने या भूमिकेतून केली आहेत. पणती जपून ठेवा अंधार फार झाला, या अर्थाने एक लहानसा प्रयत्न.……पण तरीही या शास्त्रज्ञ महिलांनाही आजही आपले स्वयंभू असे प्रकाश जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अंधारांचा सामना सर्वसामान्य महिलेइतकाच कठीण आहे, हे वाचून जाणवले, की अजून अंधाराचे साम्राज्य आहेच आपल्यापुढे! देवळात उद्या अभूतपूर्व रोषणाई केली जाईल. शक्तीदेवतेचा हा नवरात्रोत्सव संपन्न होईल.
…दडलेल्या अंधारांना मात्र दडूनच राहावे लागेल.

Vijaya Dashami – The Victory of Values 🎉
jagruti Dharmadhikari
For school leaders, true Vijaya is not in numbers or rankings—it is in the triumph of values over shortcuts, learning over rote, and vision over routine.
Just as Vijaya Dashami marks the victory of good over evil, let us remind ourselves:
⚡ A leader’s success is measured not by how high they stand, but by how many they uplift.
🌱 When leaders sow integrity, innovation, and empathy, schools don’t just grow—they flourish.
✨ This Vijaya Dashami, let’s celebrate victories that outlast us: empowered teachers, inspired students, and institutions that breathe purpose.

यावर आपले मत नोंदवा