प्रकाशातील महिला आणि देवळातले अंधारः१०



आजचे शीर्षक विरोधाभास नाही. कारण शारदीय नवरात्र चिंतनांमधे मी ( दि २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५) सर्वसाधारण स्त्री पण वेगवेगळ्या स्तरांवर वावरणारी डोळ्यासमोर ठेऊन तिच्या जीवनातील अंधार निवडले होते. शक्तीपूजा करताना संकल्पसिध्दीसाठी देवता उत्सव व पूजा तर प्रचंड उत्साहाने साजरे करायचे,पण प्रत्यक्षात अवहेलना, दुर्लक्ष आणि अपमान हेच या स्त्रियांचे जीवन असते, हा दांभिकपणा ही सर्वशक्तीने सांभाळायचा हा विरोधाभास मी दाखवला होता. वाईट याचे वाटते, की यात स्त्रियांचाही सहभाग असतो. यामागे अज्ञान आणि अपुरे सामर्थ्य हेच खरे कारण आहे. यात सुशिक्षित स्त्री कुठे आहे, ती तिचे आज उत्तरदायित्व विसरली आहे काय, असा प्रश्नही मी उपस्थित केला होता. कारण शिक्षण व संस्कार या दोन्हींशी जिचा काही संपर्क नाही आला तिला दोष देणे बरोबर नाही. पण ज्या सुशिक्षित व संस्कृती संपन्न जीवन जगतात त्यांची काही जबाबदारी व कर्तव्ये आहेत. स्त्री सुधारणेच्या पहिल्या कालखंडात राष्ट्रीय पातळीवर राजा राम मोहन राॅय व महाराष्ट्रात न्या. महादेव गोविंद रानडे यांनी याची पहिली सुरुवात केली आणि नंतर अनेक पिढ्या अनेक पुरुष कार्यकर्ते या आघाडीवर स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी झटले. त्यांच्या शिक्षणासाठी म फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. आता २०२५ च्या काळात या सुधारणा आपण स्त्रियांनी समर्थपणे पुढे न्यायच्या आहेत, यात आमची पांढरपेशी स्त्रीच जर गतानुगतीक रूढींचे अवडंबर माजवत असेल तर कसे चालेल? पुढच्या अनेक स्त्रियांच्या पिढ्या याचा दोष आपल्याला देत राहातील.
ज्ञान हे एक मूल्य आहे आणि त्या वाटेवर खंबीरपणे आपण चालले पाहिजे. आज याबाबत चिंतन आहे. या ज्ञान हे मूल्य मानून भारतातील सर्वोच्च संशोधनात सन्मान मिळवणाऱ्या अशा स्त्रियांच्या बाबत त्यांच्याच शब्दांमधे विचार करत आहोत. येथे खाली फोटो आहे इंडियन एक्स्प्रेस च्या एका बातमीचा: The biggest science awards go to men….हा संपूर्ण लेखच सुंदर होता त्यामधे आलेली आहे. य शनिवार २८ आँक्टो २०२३ च्या या अनुराधा मस्कारेन्हस यांचा हा लेख आहे. या प्रकाशातील महिला म्हणते आहेत, कारण अत्यंत उच्चविद्याविभूषित, उत्तम कार्यक्षेत्र व उत्तम करिअर करणाऱ्या या स्त्रिया आहेत. पण म्हणून त्यांचे प्रश्न ही सुटलेले नाहीत. ते कसे ते पाहाः ही मानाची शांतिस्वरूप भटनागर पारितोषिके राष्ट्रीय स्वरूपाची असतात आणि त्यांची निवड कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR करते. तिच्याकडे या ॲवाॅर्ड साठी नामांकने पाठविणाऱ्या संस्था आहेतः CSIR च्या गव्हर्निंग बाॅडीचे मेंबर, भारतातील विद्यापिठांचे व्हाइस चॅन्सलर्स, आयायटीचे डायरेक्टर्स, महत्त्वाच्या आर अँड डी संघटनांचे डायरेक्टर जनरल उदा DRDO, ICMR, ICAR IMD, CSR चे डायरेक्टर्स, NTI आयोगाचे मेंबर्स आणि भारत सरकारचे सायन्स डिपार्टमेंट आणि भटनागर पारितोषिक प्राप्त झालेले शास्त्रज्ञ. साधारणपणे ४५ वर्षे ही वयाची अट असते. ही पारितोषिक निवड प्रक्रिया ही पूर्णपणे गुणवत्ता आधारित व पारदर्शक असते असे CSIR चे प्रमुख डॉ शेखर मांडे (त्या वेळचे) म्हणतात. याच रीतीने आॉक्टो २०१८- २२ या काळातील शास्त्रज्ञांची निवड झाली आहे, हे ते सांगतात.
या निवड समितीत दोन तरी स्त्रिया शास्त्रज्ञ असतील हे पाहिल्याचे ते सांगतात. अशा अत्यंत मूलभूत संशोधनात गुणवत्तेच्या निकषांवर पुरून उरणाऱ्या विविध सायन्स क्षेत्रातील निवडक सोळा जणींची एक यादीच या लेखासोबत अनुराधा मस्कारेन्हेस यांनी त्यांच्या कर्तृत्वासह छापली होती. त्यामधे त्या दहाही जणी या सन्मानासाठी सार्थपणे योग्य होत्या. पण त्यांना डावलून त्यांच्यापेक्षा जरा कमीच असे शास्त्रज्ञ निवडले गेले! त्यांच्या आणि CSIR मधील तज्ञांच्या प्रतिक्रिया ही तेथे समाविष्ट होत्या.
तर या स्त्री शास्त्रज्ञांची व्यथा काय?
१. खाली दिलेल्या दुसऱ्या फोटोतील प्रतिक्रिया डॉ शुभा टोले यांची आहे. त्या न्यूरोसायंटिस्ट, सिनिअर प्रोफेसर आणि ग्रॅज्युएट स्टडीज टाटा इन्स्टिट्यूट आँफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेच्या डीन आहेत. स्त्रिया स्वतःची प्रसिध्दी सहसा करत नाहीत, असे त्या म्हणतात. (म्हणजे पुढे पुढे होऊन स्वतःची टिमकी वाजवण्याची अहमहमिका त्यांच्यात नसते. त्यासाठीचे लाॅबिंइंग त्या करत नाहीत. हेही एक पुरुषी कौशल्य आहे का?)
२. त्या पुढे म्हणतात, जे गुण या पारितोषिक निवडीसाठी ग्राह्य धरतातः क्रिएटिव्हिटी, नावीन्य, भविष्यातील उपयुक्तता, नेतृत्व हे स्त्री व पुरुष यांच्या मधे भिन्नपणे व्यक्त होतात. त्याबद्दल निवड समितीला योग्य त्या दिशांचे भान दिले जावे, त्यातील संवेदनशीलता समजून घेणे गरजेचे आहे. (Sensitize the Selectors.)
३. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पंचेचाळीसपर्यंतचे वय हे अपत्यांचा जन्म, पालनपोषणादी जबाबदाऱ्यांचे असते स्त्रियांसाठी त्यामुळे माता म्हणून या शास्त्रज्ञांना तारेवरची कसरत करावी लागते. डॉ मंगला नारळीकर, स्वतः एक नामवंत गणितज्ञ होत्या आणि नोबेल पारितोषिक प्राप्त डॉ जयंत नारळीकर यांच्या पत्नीही. त्यांनीही डॉ जयंत हे मुलींकडे मंगला यांनी लक्ष द्यावे अशाच मताचे होते, असे म्हटले आहे, जरी आपल्या बुध्दीमान पत्नीच्या करिअरची त्यांना जाणीव होती तरीही.
४. घराजवळ कार्यक्षेत्र असल्याने आपल्या तान्ह्युल्याला दूध पाजणे कसे शक्य झाले ते एका शास्त्रज्ञ स्त्रीने सांगितले आहे, हे एक छोटेसे उदाहरण किती बारकाईने या स्त्रियांचा विचार व्हायला हवा, याचे निदर्शक आहे.
येथे मी फक्त काही मुद्दे घेतले आहेत. सुदैवाने सरकारी यंत्रणा याबाबत संवेदनशील झाली आहे आणि वयाची अट त्यांच्यासाठी शिथिल करणे अशा काही सुधारणा होत आहेत. चांद्रयान यशानंतर स्वतः पंतप्रधान या शास्त्रज्ञ स्त्रियांना भेटले. नुकतीच Special Call for Women Scientists CSIR-ASPIRE ची घोषणाही झाली आहे. खाली संध्या शेणाॅय या स्टॅनफोर्ड या जगातील अव्वल मानांकित विद्यापिठाने तयार केलेल्या अत्युच्च केवळ दोन टक्के श्रेष्ठ शास्त्रज्ञांमधे डाॅ संध्या शेणाॅय यांचा समावेश आहे, त्यांचा फोटो दिला आहे.
ज्ञानमार्गाला आपली संस्कृती श्रेष्ठ साधना मार्ग मानते. तथाकथित मूर्तिपूजा इ अज्ञानातून येते असे आपले आध्यात्मिक तत्त्वज्ञान आहे. पण सर्वसाधारण भक्त या वाटेवरून हळूहळू जात शेवटी निर्गुण निराकार परब्रह्म साध्य करतो असा हा संकेत आहे. या परिस्थितीत आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जागृत ठेवून समाजहितासाठी दक्ष राहाणे हे सुजाण मनाचे कर्तव्य आहे. अज्ञानाने व्याप्त अंधांरांची वाट जेवढी संपेल तेवढी चांगलीच आहे.
धार्मिक उन्माद आणि त्यांचे अडाणी आविष्कार समाजमन निरोगी नसल्याचे लक्षण आहे. विवेक संपन्न धार्मिक संस्कृती ही भारतीयांनी सर्व जगात प्रथम उदघोषित केली. सत्य हे सुंदर व पवित्र आहे हे आपण जगाला सांगितले.
ही चिंतेने या भूमिकेतून केली आहेत. पणती जपून ठेवा अंधार फार झाला, या अर्थाने एक लहानसा प्रयत्न.
……पण तरीही या शास्त्रज्ञ महिलांनाही आजही आपले स्वयंभू असे प्रकाश जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अंधारांचा सामना सर्वसामान्य महिलेइतकाच कठीण आहे, हे वाचून जाणवले, की अजून अंधाराचे साम्राज्य आहेच आपल्यापुढे!
देवळात उद्या अभूतपूर्व रोषणाई केली जाईल. शक्तीदेवतेचा हा नवरात्रोत्सव संपन्न होईल.
…दडलेल्या अंधारांना दडूनच राहावे लागेल.
[ A very good message from a FB Post:
Surround yourself with strong women, women more beautiful than you, smarter than you, and don’t envy them, admire them.
Surround yourself with good women who know how to listen, who know how to care, from whom you learn to relate to the world, women who teach you their power.
Surround yourself with women to weave an invisible web, a web for other women, so you don’t let them fall, so they feel the collective hug, so they don’t feel alone or crazy.
Surround yourself with women who embrace their shadow, who don’t apologize for being light, who are aware of their beauty and that they are alive.
Surround yourself with irreverent and brave women, women fighters who open the way and tear down walls, women of reference, women who do not ask for permission, who build their homes with the same hands, with which they cradle and caress.
Surround yourself with women who help you live as you are, who give you confidence and affection, who remind you that they are all one.”
✍️ Roy Galán
🎨 Pinterest]
यावर आपले मत नोंदवा