|| श्री कुलस्वामिनी मर्दडी माता की जय ||
सन्मान स्त्रीत्वाचा – पुरुषांच्या दायित्वाचा

हा बदल उत्तम आहे. हे न्यायदेवते आजच्या दिनी , ‘रामक्षणी’, एकच विनवणी तुझ्या चरणी……
सामान्य माणसाने अभिमानानेही जगू नये आणि सत्ताधाऱ्यांनी मात्र अहंकाराने मिरवावे ही विसंगती कधीतरी संपली पाहिजे.🙏
वृंदा आशय

नवरात्रिस्तवनाञ्जलिः
हेमंत प्रकाश राजोपाध्ये, पुणे.
नवमी:
अणिमालघिमादीनां जनयित्री च धारिणी।
सिद्धिदात्री महामाया आदिशक्तिः सुरेश्वरी।।
: अणिमा, लघिमा (सूक्ष्म/विराट रूप धारण करणे वगैरे) सिद्धी-शक्तींची निर्माती आणि धारण करणारी, या सिद्धी सत्पात्री योगसाधकांना प्रदान करणारी आदिशक्ती असलेली देवादिकांची स्वामिनी भगवती सिद्धिदात्री या नावानेही विख्यात आहे.
She is the source and sustainer of powers like Anima (becoming minute) and Laghima (becoming light), granting these yogic perfections to worthy seekers. Known as the primordial power, She is Siddhidatri, the supreme Goddess of the gods.
देवाः दितिसुताः यक्षाः गन्धर्वाः मुनिपुङ्गवाः।
पन्नगाः विबुधाः सर्वे तां नमन्ति भजन्ति च।।
: देवता, दैत्य, यक्ष, गंधर्व, मुनिश्रेष्ठ, सर्पादि योनीमधील जीव आणि विद्वद्गण सारे तिला आळवतात आणि पूजतात.
All beings — gods, demons, yakshas, gandharvas, sages, serpents, and wise men — bow to Her and worship Her.
शिवशक्तेः सारभूता कमलासनमण्डिता।
नवदुर्गास्वरूपेषु चरमा परब्रह्मस्वरूपिणी।।
: परम मंगल असे शिवतत्त्व आणि विश्वनिर्मिती करणारे शक्तितत्त्व यांचे सारस्वरूप , कमलासनावर विराजमान असलेली परब्रह्मस्वरूपिणी सिद्धिदात्री देवी ही नवदुर्गास्वरूपांतील नववे परम रूप !
The essence of Shiva and Shakti, seated on a lotus, Siddhidatri is the supreme form of the Absolute, manifest as the ninth and final aspect of the Navadurga.
कर्मबन्धमहापाशखड्गविच्छेदतारिणी।
भवसागरबन्धस्य सीमोल्लङ्घनकारिणी।।
: कर्मबंधनांचे महापाश आपल्या ज्ञानरूपी खड्गाने भेदून साधकांना तारणारी देवी भवसागराच्या सीमा उल्लंघून नेणारी आहे.
With Her sword of wisdom, She cuts the great bonds of karma, delivering devotees beyond the limits of worldly existence across the ocean of samsara.
राजराजेश्वरी ख्याता महात्रिपुरसुन्दरी।
भक्तलालनविख्याता ललिता परमेश्वरी।।
: भक्तांचे लालन-पालन करणारी ही ललितांबिका परमेश्वरी भगवती राजराजेश्वरी महात्रिपुरसुंदरी या नावाने विख्यात आहे.
She is renowned as Rajarajeshwari, Mahatripurasundari, and Lalita Parameshwari, who nourishes and protects Her devotees with motherly care.
याऽविर्भवति वाग्रूपा प्रतिभावल्लभा मतिः।
प्रज्ञामेधाधारणादि शक्तिभिः ऋषिसंसृता।।
: प्रतिभाशक्तीचे प्रकटन आणि वर्धन करणारी ही भगवती त्रिपुरांबिका प्रज्ञा-मेधा आणि धारणा या बुद्धीच्या शक्तींच्या रूपात आविर्भूत होत ऋषींद्वारे वाणी स्वरूपात प्रकट होते.
She manifests as the power of speech and brilliance, inspiring intellect, wisdom, and concentration, appearing through the sages as the divine voice.
नवरात्रमहापर्वे सद्गुरुप्रेरणावशात्।
ययेरिता मतिरियं श्रद्धाभक्तिप्रचोदिता।।
त्वदीयगुणसंकीर्तीगायनेलेखने रता।
सर्वदाऽभिरतिर्मे स्यात्गुरुपादाभिचिन्तने।।
: ही दयाघना शारदांबे, हे नऊ दिवस तूच श्रीसद्गुरुप्रेरणेतून श्रद्धा-भक्तीभावनेद्वारे माझ्या बुद्धीस जागते केलेस आणि तुझ्या गुणसंकीर्तनाच्या गायन, लेखनामध्ये तिला गुंगवलेस. तुझ्या कृपेने माझी बुद्धि आणि चित्त ही श्रीसदगुरुंच्या चरणचिंतनात सदैव अभिरत राहो, अशी तुझ्या चरणी प्रार्थना!
O compassionate Mother Sharada, during these nine days, through the inspiration of the Sadguru, You awakened my intellect with faith and devotion, engaging it in the singing and writing of Your praises. May my mind and heart remain forever absorbed in the contemplation of the Guru’s feet.
नमस्तुभ्यं महादेवि शक्तिमत्यन्नदायिके।
सृष्टिस्थित्यन्तकारिण्यै जगदम्ब प्रपाहि माम्।।
: हे अन्न-शक्ति-बुद्धिप्रदायिनि, उत्पत्ति-स्थिति-लय या अवस्थांची निर्मिती करणाऱ्या जगन्माते तू माझे सदैव रक्षण कर.
Salutations to You, O Great Goddess, giver of power, nourishment, and wisdom, who creates, sustains, and dissolves the worlds. O Mother of the Universe, protect me always.
ये पठन्ति स्तवाः देवि श्रद्धया मनसा मुदा।
प्रसीद तान् स्वभक्तान् स्वपुत्राञ्जननी यथा।।
: तुझ्या कृपेने स्रवलेली ही स्तवने जे जे श्रद्धेने, पूर्ण भावाने, प्रसन्न चित्ताने पठण करतील, करत आहेत त्या सर्वांवर, आई जसे आपल्या लेकरांवर प्रसन्न असते, तशी कृपादृष्टी सदैव ठेव.
Whoever recites these hymns with faith, devotion, and joy, may You, O Mother, be gracious to them as a mother is to her own children.
देवळातले अंधारः ९
शारदीय नवरात्र चिंतनः आश्विन शु ९
मंगळवार दि २९ सप्टेंबर २०२५
©प्रतिभा मिस्त्री
Bill & Will: कायदा आणि कृती, वास्तव आणि विधान,
इतिहास आणि इच्छा
१. कायदा आणि कृतीः
सप्टेंबर १९ , २०२३ला पार्लमेंटचे विशेष अधिवेशन बोलावून नारी शक्ती वंदन, अधिनियम, The Constitution (One Hundred & Twenty -Eighth Amendment Bill, 2023) हे ४५४ च्या प्रचंड बहुमताने पास केले गेले. या बिलाप्रमाणे लोकसभा आणि राज्यसभेतील एकूण प्रतिनिधी संख्येतील एक तृतीयांश संख्या या फक्त स्त्री प्रतिनिधींसाठी राखीव असतील. म्हणजे आता जी विषमता आहेः लोकसभेत १५% आणि राज्यसभेत १३% ती बदलण्यासाठी एक दिशा निश्चित केली गेली आहे. या बिलाला २७ वर्षांचा जुना इतिहास आहे. त्याबाबत १९९६ मधे झालेला डिबेट, तसेच २०१० मधे विमेन्स रिझर्वेशन बिलमधे असलेल्या उणिवा आणि राजकीय पक्षांमधील एकमताचा अभाव हे काही महत्त्वाचे टप्पे. या इतिहासातील विस्मृतीत गेलेले एक पान पण आज आठवले पाहिजे ते म्हणजे प्रमिला दंडवते(तत्कालीन जनता दल एम पी, मुंबई लोकसभा निवडणूक), सातवी लोकसभा (१९८०-८४) यांनी तेव्हा सादर केलेले प्रायव्हेट मेंबर्स बिल. याची आठवण करण्याचे कारण स्त्री प्रतिनिधित्वासाठी राखीव जागा ठेवण्याची सूचना प्रथम त्यांनी या बिलात केली होती. या २०२३च्या नव्या बिलाला प्रत्यक्षात आणण्यासाठी काही वर्षे सु १५ लागणार आहेत. कारण वाजपेयी सरकारने२००१ मधे आर्टिकल 82 मधे केलेल्या ८४ व्या घटना दुरुस्ती. ती नुसार २०२६ ची जनगणना झाल्याखेरीज लोकसभेच्या मतदार संघांची कोणतीही पुनर्रचना करता येणार नाही. याचा अर्थ असा की सध्याचे लोकसंख्येच्या प्रमाणात असलेले प्रतिनिधित्व रद्द केल्याखेरीज नवे प्रतिनिधित्व अंमलात येऊ शकत नाही. आता पंधरा वर्षांनी येणाऱ्या सभागृहांबद्दल आत्ताच काही विधान करणे अशक्य आहे.
हे आहे कायदा आणि कृती यांमधले अंतर.
२.आता वास्तव आणि विधान यात असलेले महदांतरः
१.१९७० मधील Towards Equality Report(1974)च्या अंतर्गत Committee of Status of Women in India ने स्त्रियांना राखीव जागा ठेवण्याबाबत ठाम विरोधी भूमिका घेतली होती.
२.स्त्रियांच्या राखीव जागा विविध मागास जातींसाठी असलेल्या राखीव जागांच्या प्रमाणे विभागण्याला कडवा विरोध झाला. आजही हा विवादाचा मुद्दा आहे.
३. निवडून आलेल्या पुरुष प्रतिनिधींना फ्रीडम आणि इक्वालिटीचे स्त्रियांना अधिकार मिळाले,की त्या पुरुषांना शत्रू मानायला लागतील आणि भारतीय संस्कृतीला धक्का पोहोचेल, असे त्या काळात त्यांनी व्यक्तही केले आहे.
हा इतिहास आणि ही वृत्ती आज पूर्णपणे बदलली आहे आणि एक नवा इतिहास नव्या एकमताने निर्माण झाला आहे,असे आपण खरंच मानू यात का?
स्त्री जीवनात प्रत्यक्ष सामाजिक, मानसिक, आर्थिक, आरोग्य, न्याय, उद्योग, कामाचे अधिकार, धार्मिक जाचकता अशा विविध पातळींवर आढळणाऱ्या अनेक स्तरांवरील असमानतेचे वास्तव हा कायदा एका लेखणीने बदलेल काय? अजूनही स्त्रीला लांच्छनास्पद गुन्ह्यांचे लक्ष केले जाते आहे आणि तिचा कायद्याच्या द्वारे न्यायासाठीचा संघर्ष दीर्घ व त्रासाचा आहे.
३.आता इतिहास आणि इच्छाः
१. जातीवर आधारित सर्व आरक्षणेच सध्या कायद्याच्या आधार निश्चितपणे मिळवू शकणार नाहीत. यात फार मोठी गुंतागुंत आहे. जनगणना ही जातींवर आधारित असावी का नाही याबाबत आज विवाद आहेत.
२.दुसरे असे काही मानतात की केवळ जेंडर बेस्ड प्रतिनिधित्व सभागृहात गुणवत्ता व अनुभव राखू शकेल काय? राखीव जागांबाबत असे झाले संशोधन आहे काय?
३. राजकीय नेतृत्व आपल्याच परिवारातील स्त्री सदस्यांना प्रतिनिधित्व देऊन आपली सत्ताकेंद्रे अधिक बळकट करतील. पक्षपातळीवल सर्वसाधारण स्त्रियांना समान संधी मिळतील असे नाही. सामान्य कर्तबगार स्त्रिया या कायद्याने पुढे येतीलच असे ठामपणे म्हणता येत नाही.
४. या वादांनी एकात्म समाजाचे स्वप्न केवळ स्वप्नच ठरेल. सर्व पातळींवर अविश्वास निर्माण होईल.
तात्पर्य, या कायद्याची दोन्ही सभागृहात नीट चर्चा होणे आवश्यक होते. ती न होता तो आणला गेला आहे. त्याच्या अंमलबजावणी बाबत पूर्ण स्पष्टता नाही, अशा परिस्थितीत तो लागू करणे अडचणीचेच अधिक होईल.असे तज्ञ मत आहे.
विरोधी पक्षाची टिका होती की, २०२४ च्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून सरकारने तेव्हाच्या बहुमताच्या आधारावर एक धूर्त खेळी केली. आता २०२४ च्या निवडणुकी झाल्या आहेत आणि २०१९ च्या परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. एकूण निवडून आलेल्या स्त्रिया लोकसभेत ७७ आहेत म्हणजे १४.७% आणि महत्त्वाच्या राजकीय पक्षांची याबाबत टक्के वारी १३ ते १६% साधारणपणे आहे.
मागच्या अष्टमीच्या चिंतनाचा आपण याची कारणमीमांसा ही केली आहे. कायदा करणे ही निश्चितच एक चांगली सुरुवात आहे, पण तो अंमलबजावणी मधे रूपांतरित होणै ही पूर्ण वेगळी गोष्ट आहे. तो खरंच जर प्रत्यक्षात आणायचा तर संपूर्ण राजकीय व सामाजिक मानसिकतेत पूर्ण बदल आणि आर्थिक समानतेत त्याचे रूपांतर व्हायला हवे.
हा खरा अंधार दूर होण्यास किती बरे दशके का शतके लागतील अजून?
तोपर्यंत मंडप घालून झळाळून राजकीय पक्ष डीजे लाऊन नवरात्रोत्सव दणक्यात करत राहातील!

🌸Navratri Day 9 – Siddhidatri: Fulfillment & Vision 🌸
Jagruti dharmadhikari , Pune
Maa Siddhidatri symbolizes completion, blessings, and higher vision. On this final day of Navratri, we are reminded that the true fulfillment of trusteeship lies not in short-term achievements, but in shaping a legacy for future generations.
As school leaders and trustees, our role is to look beyond today—to design policies, frameworks, and ecosystems that ensure education remains sustainable, inclusive, and future-ready.
📖 Every child entering our schools carries a dream. It is our vision, our foresight, and our courage that turns those dreams into possibilities.
✨ Let us pledge to lead with vision, so that the seeds we plant today blossom into a garden of empowered citizens tomorrow.
काल रात्रीच्या ऐवजी आज सकाळी ही पोस्ट प्रकाशित होत आहे, याबद्दल माझ्या वाचक – लेखकांची मी क्षमा मागते. न्यायासाठी वर्षानुवर्षे वाट पाहणारी सामान्य जनता माझा हा अपराध पोटात घालेल अशी आशा बाळगते. पुनश्च क्षमस्व ! – वृंदा आशय
यावर आपले मत नोंदवा