विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

नवरात्र विशेष – कुटुंब माळ

||श्री कुलस्वामिनी मर्दडी माता प्रसन्न||

सन्मान स्त्रीत्वाचा – पुरुषाच्या दायित्वाचा

||श्री तुळजाभवानी प्रसन्न||

माणूस विनम्र होतो शांत मंद ज्योतीपुढे; आणि घालतो साकडे देवाच्या सामर्थ्याकडे! कारण परमेश्वराचे चैतन्यपूर्ण अस्तित्व ही भारतीयांची शतकानुशतकांची असलेली आढळ अशी दृढ श्रद्धा आहे. ज्याला परमेश्वर सातत्यपूर्ण आणि विलक्षण असा प्रतिसाद देत आलेला आहे. भारताचे सांस्कृतिक सामर्थ्य हेच जगाला दिशा देऊ शकेल; यात कोणताही संदेह नाही!

वृंदा आशय


वंदे मातरम्!


भवतालात अस्मानी-सुलतानीचा बेदरकार हल्लकल्लोळअसताना तरी

“… रोकडे काही। मूळ सामर्थ्य दाखवी।”

विवादे विषादे प्रमादे प्रवासे |
जले चानले पर्वते शत्रुमध्ये ||
अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि |
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥

(हेमंत प्रकाश राजोपाध्ये यांच्या फेसबुक वाॅलवरून साभार)

auromarathi.org हे यूट्यूब चॅनल व संकेतस्थळ चालवणाऱ्या केतकी ताई मोडक यांनी ‘दुर्गा आणि काली’ या भागाची लिंक (दुवा ) इथे देण्याची अनुमती दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. – वृंदा आशय


जय हिंद!

वेदमंत्राहूनी आम्हा वंद्य वंदे मातरम्!

संपादकांचे निवेदन – माझे वडील श्री. विजय विठ्ठलराव देशपांडे (देसाई) यांचा सातव्या माळेला वाढदिवस होता तर माझी आई सौ. जयश्री विजय देशपांडे हिचा दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. अण्णांचा हा ८० वा वाढदिवस आहे. शिवाय दोघांचेही वाढदिवस नवरात्राच्या काळात एकत्र आले हा सुवर्णयोग आनंददायी वाटला. त्यानिमित्ताने ‘ज्ञानोत्सव‘ या आपल्या संकेतस्थळावर प्रसारित करत आहे , माझ्या माहेरच्या अनुषंगाने हे विशेष पान. – वृंदा आशय पृष्ठरचना – कुटुंबप्रेमी – अपूर्वा प्रशांत नाईक


करारीपणा आणि लढाऊ बाणा

हा आमच्या कुटुंबाला लाभलेला अधिकृत वारसा आहे.

परिवाराकडून कै. वि. वा. देसाई (देशपांडे) आणि कै. ना.वि. देशपांडे यांच्या नावे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेस किंवा व्यक्तीस दरवर्षी पुरस्कृत केले जाते.

(टीप – श्री. विठ्ठलराव देशपांडे यांना ‘देसाई’ ही उपाधी जनमानसाने दिलेली होती. त्यामुळे ते त्याच नावाने ओळखले गेले .)


स्त्रियांच्या दृढ उपासनेतून उमटलेला

अध्यात्मिकतेचा अमिट ठसा ही आमच्या कुटुंबाची ओळख आहे.

मंदिरातल्या निरांजनासम मंद शीतल प्रकाश तू, आकाश तू, विश्वास तू…

दास रामाचा जीवप्राण तुझा, स‌दभक्ती तू , शिवभक्ती तू …

किती वर्णू ती गुरुभक्ती तुझी, सोज्वळ तू, प्रेमळ तू ….

नीरव शांती तव मुखकमळी, शालीन तू, कुलीन तू …

नामी रंगूनी श्रीरामाच्या पुण्यसंचयी केले तू, कृतार्थ तू, निस्वार्थ तू…

गोक्षीरातील नवनीतासम शुभ्र कोमल सुमना तू , गोप्रेमी तू , पुण्याई तू …

राघव सीता इष्ट देवता अंजनीसुता वंदनी तू , आश्वस्त तू, वरदहस्त तू …

वरुणी अरुणी सागर तरुनी केले प्रपंचा सुखकर तू , परमार्थ तू , चरितार्थ तू ….

देईन आशिर्वच तव रघुपति समर्थचरणी तल्लीन तू, श्रद्धाळू तू , सहिष्णू तू …

शतदा शतदा वंदावे तुज सुहास्य वदनी प्रसन्न तू , सतेजपुंजा दिसतेस तू …

पांडुरंगाच्या पंढरपुरी वाहे चंद्रभागा, तिच्या पवित्र पात्राचा प्रवाह तू , मायेची सावली, कृष्णामाई तू …

डेरेदार वृक्षाखाली जणू वाटसरूला विसावा, तसा तुझा सहवास आम्हा हवा, सदा राहो आनंदी तू, निर्धास्त तू, स्वस्थ तू…

काव्यरचना – CA अपेक्षा मुळे ( सौ. अपेक्षा ऋषीकेश देशपांडे )


वारसा भक्तीचा वारसा शक्तीचा – वृंदा आशय

वारसा भक्तीचा वारसा शक्तीचा हा ब्लॉग खालील लिंकवर वाचता येईल

https://vrunda-deshpande-joshi-prasangik.blogspot.com/2021/09/blog-post.html


ती. व. अण्णा व सौ. आईस,

काल सातव्या माळेला आपला आणि उद्या आईचा वाढदिवस! त्यानिमित्त समस्त परिवाराकडून आपले अभीष्टचिंतन!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक मागोवा घेते…

सभोवताली किर्र… अंधार असतानाही तुम्ही ठामपणानं उभे राहिलात. कधी परिस्थितीने कठोर परीक्षा पाहिली ; कधी आपल्याच माणसांनी फसवून पाहिलं. मात्र तुम्ही निश्चल राहिलात तुमच्या एकाच मतावर – ‘जगात चांगुलपणा आहे आणि ईश्वराच्या कृपेने तो वाढतच जाईल’.

प्रत्येक माणूस चांगला असतो, परिस्थिती त्याला विशिष्ट पद्धतीने वागण्यास भाग पाडते हे तुमचं गणित तुमच्याशी चांगलं आणि वाईट वागणाऱ्या दोन्ही माणसांबाबत, अगदी साधं- सोपं – सरळ असं. कदाचित यालाच नीतिमत्तेने वागणं असं म्हणतात. ही नीती तुम्ही आयुष्यभर सांभाळलीत, जोपासलीत आणि रुजवली देखील.

कदाचित परमेश्वरानं तुम्हाला त्या त्या वेळी अनेक चुकीची फळं दिलीही असतील; ज्याला जग ‘अपयश’ या नावाने ओळखतं. मात्र तुम्ही कोणत्याही परिस्थितीत परमेश्वरावरची तुमची श्रद्धा तसूभरही ढळू दिली नाहीत. तुमच्या या अपार सामर्थ्याने तो अवाक् झाला.

तुमची आयुष्याची जोडीदार आमची आई, म्हणजे तर जणू काही संत मुक्ताईनं, ज्ञानदेवांना जो उपदेश केला होता त्या उपदेशासारखं ‘गंगाजळ हृदय करा’ हे तत्त्व गंगेच्या नितळ – निर्मळ पाण्यासारखं आत्मसात करून बसलेली! गंगेच्या निखळ प्रवाहासारखंच ती प्रवाही राहिली; वाट्याला जे येईल ते घेऊन, आनंदाने! तिचा स्वभावच असा ज्याचं वर्णन कवी गोविंदाग्रजांनी एका कवितेमध्ये करून ठेवलेलं आहे –

ते हृदय कसे आईचे

मी उगाच सांगत नाही

जे आनंदेही रडते

त्याचे दुःखात काय होई!

डोळ्यातल्या पाण्याने आयुष्यातला प्रत्येक क्षण ती साजरा करत आली. कदाचित म्हणूनच ती नेहमी राहिली एखाद्या निरागस बालकासारखी! जिला व्यवहाराची भाषा कधीच कळली नाही आणि तिच्या सहवासात जो कोणी आला तो ‘हृदयाची भाषा’ शिकल्याशिवाय राहिला नाही. परमेश्वरानं या अपरिमित वैभवाच्या घरी आम्हाला जन्म दिला, आम्ही धन्य झालो!

आम्हाला जे यश सहजतेने लाभत गेलं ते पाहता वाटायचं ,असेल काही पूर्वजांची पुण्याई किंवा आपल्या
पूर्वजन्मांचीही ! पण आता कळतं, असं काही नव्हतं. आम्हाला उभे राहता यावं म्हणून तुम्ही दोघांनी जे सोसलं,भोगलं, झाडाच्या मुळांसारखं स्वतःला जमिनीत खोलवर गाडून घेतलंत तेव्हा परमेश्वरही थक्क झाला ! त्यानं तुम्हाला आशीर्वाद दिला,
“….. तयाचा वेलू गेला गगनावरी!”

हा आशीर्वाद घेऊन आम्ही मिरवतोय, तुमच्या संस्काराने तो परमेश्वर चरणी समर्पित करत!

प्रिय आई – अण्णा पुनश्च

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

आपलेच सर्वरत्न

वृंदा आशय – फोटोतल्या सर्वांसह!


आज माझ्या आयुष्यातला खास दिवस आहे—माझ्या वडिलांचा, अण्णांचा, ऐंशीवा वाढदिवस.
अण्णा म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते साहित्य सहकार संघचं पुस्तकांचं दुकान. शालेय पुस्तकांपेक्षा मराठी साहित्य, कादंबऱ्या, कथा-कविता लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची धडपड मला नेहमीच प्रेरणा देते.


‘व्यवसाय फक्त कमाईसाठी नसून विचार पसरवण्यासाठीही असतो’, हे मला त्यांनीच शिकवलं.
१९९० च्या दशकातला ‘परिचय अपार्टमेंट’चा प्रसंग तर आजही लक्षात राहतो.
त्यावेळी आमच्याकडे गुंतवणुकीसाठी फार काही नव्हतं, पण अण्णांची दूरदृष्टी विलक्षण होती. एक बांधकाम व्यावसायिक अलिशान फ्लॅटची ऑफर घेऊन आला होती, पण अण्णांनी ती नाकारली. शून्यावर करार करून कोणतीही अतिरिक्त गुंतवणूक न करता पूर्ण मजला आपल्याकडे राहील याची तजवीज केली. त्या शून्यातून आज विश्व उभे राहिलेले आहे. आज तीस वर्षांनंतर त्या निर्णयाचं महत्त्व खरं कळतं—तो निर्णय आमच्या कुटुंबासाठी स्थैर्य आणि प्रगतीचं पाऊल ठरला.


फक्त कामातच नाही, तर नातेसंबंधातही अण्णा तेवढेच पुढे. अण्णांचा एक मोठा गुण म्हणजे सगळ्यांना समानतेने घेणं. आमच्या कुटुंबात मी असो किंवा माझे चुलत भाऊ-बहीण—त्यांच्यासाठी सगळे सारखेच. आईच्या नातलगांशी त्यांनी नेहमीच आपुलकीचं नातं जपलं, त्यामुळे ‘नातेसंबंध जपणं हीच खरी श्रीमंती आहे’, हे शिकायला मिळालं.

आज मी एका मोठ्या कंपनीत काम करतो. माझ्या कामाची नीती, लोकांना एकत्र घेऊन पुढचं पाऊल टाकण्याची कला—हे सगळं अण्णांकडूनच शिकलो. त्यांच्या गुणांमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे.

अण्णा,
तुमच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त एवढंच म्हणेन—
तुमची दूरदृष्टी, लोकांशी जोडून राहण्याची ताकद आणि नेतृत्व हीच माझी खरी शिदोरी आहे. माझी हीच प्रार्थना आहे की देव तुम्हाला निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य देवो 

विवेक विजय देशपांडे


जेंव्हा पासुन पडली आई

अण्णाच झाले आई…

जरी ते बोलत नसलेले काही

लक्ष सतत त्यांचे तिच्याच ठाई

उठुन जाराशी बसे जेव्हा खुर्चीवरती

हळूच हे मागुनी उशी सारती…

येणार म्हणताच लेक सुन दिवाळीला 

उत्साहाचे वारे लागले व्हायला 

आणली त्यांनी रंगत दिवाळीच्या फराळाला…

येणार म्हणतच लेकी जेव्हा सांगते आई 

लगबगीने स्वयंपाकघरात जातीने 

लक्ष घालून काय हवे नको ते पाही…

धन्य माझे अण्णा 

आणि धन्य माझी आई-

सहजीवनाचा अर्थ त्यांच्याकडे बघुन

आपोआप उलगडत जाई..

अण्णा आईच्या सहजीवनाला

सुंदर साथ देते आमची वर्षा ताई !!

विशाखा प्रशांत नाईक

https://youtu.be/JSBySmbmOEk?si=Tuqzd6xfV3X6YcoR

आई – अण्णांचे यासंदर्भातील व योगशास्त्राने त्यांना कसे तारले याबाबतचे अनुभव जाणून घेण्यासाठी वरील लिंक click करून वश्य भेट द्या वर्षा विजय देशपांडे हिच्या ‘विजयश्री निसर्गोपचार केंद्रा’च्या यू ट्यूब चॅनलला. धन्यवाद.


आज गाठली आहे जी काही आयुष्यात उंची… त्याचे पूर्ण श्रेय आहे जीला ती म्हणजे आई आमची

पण एक सांग आई …

तुझी काहीच स्वप्न न्हवती का ग आई 

आमच्या साठी तू तुझी स्वप्ने 

गुंडाळून ठेवलीस का ग बाई 

अग वेडे असे काही नाही.. 

मी फक्त माझ्या आणि तुझ्या गतीचे समीकरण मांडले …

बस एवढेच बाकी फार काही नाही 

आणि असंही सांगते तुला पोरी…

जर लावले आपण एखादे रोपटे जरी दारी…

लक्ष देतोच ना ग आपण त्याकडे वरचेवरी …

अग तुला तर नऊ महिने 

वाढवले मी उदरी…

तुला अशीच सोडेन 

का मी वाऱ्यावरी

आणि बरे का जेव्हा लागशील तू तुझ्या विश्वा मध्ये भरारी घ्यायला…

तेव्हा मी पण द्रुतगतीने येते

की नाही बघ तुला पकडायला 

पण मला सांग बाबांची काहीच जीम्मेदारी नाही 

नाही नाही असे मुळीच नाही… 

पण माहीत आहे ना त्यांना ही…

आईवरच असते घराची भिस्त…

म्हणून असतात जरा ते बिनधास्त 

स्त्री पुरुष समानतेचे गिरवीत बसता धडे…

आशा कशा ग तुम्ही आजकालच्या मुली वेडे…

अग निसर्गाने च ठेवले आहे 

बाईला पुरुषांच्या एक पाऊल पुढे…

म्हणूनच तर आपण *आई* होऊ शकतो ना वेडे 

किती ग तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची घाई…

जरा श्वास घ्या आणि मग बघा किती आनंद आहे घरादारा ची जीम्मेदारी सांभाळून घेण्यात उंच भरारी

अग हे सगळे करू जाणे एक स्त्री च ती संसारी…

म्हणूनच सांगते आई होणे सोपे नसते पोरी.

विशाखा प्रशांत नाईक


सफेद सदरा , सफेद केस 

असा आहे त्यांचा वेष |

थोडे ठसकेदार जरा जास्तच गोड

नेहमीच काढतात सगळ्यांची खोड |

दात गेले सारे

तरी म्हणता ” माझे तुमच्या सगळ्यांपेक्षा मजबूत दात , हवा तर आजमावून बघा आज ” |

 त्यांना आहे खायचा शौक

नेहमीच म्हणतात ” अप्पू ताई होऊन जाऊद्या तुमच्या हातचे काहीतरी चमचमीत आणि गोड धोड मेजवानी आज “|

आफाट आहे त्यांचे ज्ञान

आम्हाला म्हणतात ” हवे ते काहीही विचारा “|

ह्यांनी पार पाडल्या आपल्या साऱ्या जवाबदाऱ्या एक्दम चोख

कधीच नाही पाहिले स्वतःचं सुख |

एक परफेक्ट भाऊ

एक परफेक्ट नवरा

एक परफेक्ट वडील

एक परफेक्ट सासरे

एक परफेक्ट आजोबा

अशे अनेक पात्रे त्यांनी निभावले

आम्हा सगळ्यांनाच गर्व आहे की

आम्हाला अण्णांनी घडवले |

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अण्णा 

तुम्हाला उदंड आयुष्य लाभो 

हीच देवा काढे प्रार्थना!

अपूर्वा प्रशांत नाईक


मधुरा विवेक देशपांडे


प्रिय अण्णा आणि आजी,

आपल्या परिवाराला एकत्र ठेवणारे, हा नात्यांचा वटवृक्ष कायम बहरत राहो यासाठी प्रयत्न करणाऱ्या अण्णा आणि आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

लक्ष्मण ( माझे बाबा )आम्हांला जातांना सांगून गेला, माझ्यासाठी माझे आई-वडील – बाप्पा-वहिनी, आणि अण्णा-काकूच, कारण मी त्यांच्याकडेच मोठा झालो आणि त्यांनी फक्त लक्ष्मणलाच नाही तर विद्याला (माझी आई) पण लेकीचं प्रेम दिलं. वाईट काळामध्ये दुःखाच्या दिवसात फक्त आणि फक्त मानसिक आधाराची गरज असती, आणि ती फक्त आम्हाला अण्णा आणि आजीने दिली. नाशिक वरून आल्यावर आईला एकटीला घरात राहावं वाटायचं नाही, म्हणून ती नेहमी फोन करून आईला आधीच सांगून ठेवायचे, “विद्या सरळ इकडे ये, आम्ही जेवण बनवून ठेवणार आहे”. प्रत्येकवेळी त्यांनी सूनेला लेकीसारखेच प्रेम दिले.
प्रत्येकवेळी यातून कसा मार्ग काढायचा, कसं पुढे जायचं हे समजावलं आणि धीर दिला. मला तर अण्णाचं, या सगळ्यातूनच आपण हुशार होतो, सगळे दिवस सारखे नसतात, आपण पुढे चालत राहायचं यामूळे खूप हिम्मत मिळाली.

आजीने तो मायेने डोक्यावरून फिरवलेला हात, मला आवडतं म्हणून खास डब्बा भरून लोणी आठवणीने घेऊन येणे, मला इतकं छान वाटायचं.

लहानपणी असं लाड करायला, विविध संवाद साधायला, मायेने जवळ घेणाऱ्या आजी-आजोबांचे प्रेम आम्हाला कधी भेटलंच नाही आणि यावरून मी जेव्हा जेव्हा रडायचे तेव्हा मला बाबा म्हणायचे हे तूझेच आजी आजोबा आहेत. तू कधीपण त्यांच्याकडे जा, ते तूला नेहमी त्यांच्या नातीसारखंच प्रेम करतील.

लहानपणी तर मी बेगमपुऱ्यात जायला खूप हट्ट करायचे आणि मी म्हणले की किती पण उशीर झाला असेल तरी बाबाआम्हाला बाप्पा आजोबाकडे घेऊन जायचे आणि रात्रीचे ११-१२ कितीही वाजलेले असले तरी तिथे आमचं स्वागतच व्हायचे. इतक्या उशीरा पण सगळे जण मला जे आवडेल ते खाऊ घालायचे, मी कधीपण गेले तरी बाप्पा आजोबा माझ्यासाठी ice Cream आणायलाच लावायचे, माझे खूप लाड करायचे. मोठी आजी डब्बा भरून बोरकूट दयायची.

मला असं वाटत. प्रत्येक लहान मुलाला आजी-आजोबाचं प्रेम भेटणं खूप गरजेचं आहे. घरामध्ये वडिलमाणसं ही हवीच त्यांच्यामुळेय घरामध्ये एकता, विनम्रता, राहते. नाती जोपासली जातात आणि प्रत्येक नात्याचं महत्त्व आपल्याला समजतं. हे सगळं आपल्या परिवारात बाप्पा आजोबा-मोठी आजी आणि अण्णा आजोबा – काकू आजी, यांच्यामुळेच आहे.

तुमचीच वैष्णवी

वैष्णवी लक्ष्मण देशपांडे


My Memories of Great Grandfather!

Most kids don’t get to know or even see their great grandparents. I am
one of the few fortunate kids who got the privilege to know my great
grandparents. For the time I had to spend with my great grandfather, I
would describe it as heaven. I loved his stories as he narrated them with
love. I remember the time I discovered what he did in his past in great
detail as it is the best thing that has happened to me.. My parents,
especially my mother, is a real indian patriot. Little did I know that she had
got that patriotism from my great grandfather. It came as a surprise as my
mom was telling me about when a student did a PHD on my grandfather. I
was little and in reply said “Why? Why did he do a PHD on my
grandfather?” What my mother said in answer to my question has always
stuck with me; he was a freedom fighter of India (specifically Hyderabad
Mukti Sangram). This came as a huge surprise as I never knew. Plus when
my mom said that they were famous, I literally didn’t believe her at first. As
a child I always fantasized of being related to a famous person like Shivaji
Mahraj or Lokmanya Tilak but never I had I thought that person was inside
my home. From then on I really began to respect my grandfather more than
ever before.
I had always thought of my grandfather as a loving person who loved his
country. As I learned more about him I found out he had met the prime
minister of India of the time (P.V. Nara Simha Rao). I was really shocked
because you have to be really important to even talk to the prime minister .
To prove it my mother showed me a picture of the two of them talking in a
book about my grandfather. Although I couldn’t read it I still flipped through
and saw a picture of my grandfather collecting award after award for his
patriotism. In the pictures where he wasn’t getting awards there were
pictures of his school and home or him in an interview.
Besides being a huge indian patriot my grandfather was also a
supporter of reading. He opened libraries and even went on a bicycle to
deliver books to people who wanted to read. He used to say “Books are a
man’s best friend.
” His love for reading got passed on to me and I still read
till this day.
“Oh Kelkar, Oh Kelkar, did you read today?” he would say to
me. My great grandfather was also a huge follower of Ramdas Swami. In
fact “Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram” still plays in their house to this day.
The day my great grandfather passed away, I didn’t know how to react. The
person who I loved and respected was gone. I still remember him saying
“Oh Kelkar, Oh Kelkar.
” I will forever remember his stories and what he has
done.
As I said at the beginning I am one of the lucky number of kids who
knew and met their great grandparents. But I am luckier than everyone of
those children combined because I was blessed by God to have this
Mahatma to be my relative and my great grandfather.

कौशिक केळकर


भावपूर्ण श्रद्धांजली!

तुम्ही गेलात आणि आम्हाला जाणवलं कोणत्याही भावस्थिती पेक्षा अभावस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते आणि मग शिल्लक राहते फक्त रुखरुख खूप काही हरवल्याची !

वृंदा आशय


आम्ही देशपांडे

यावर आपले मत नोंदवा