प्रा. डॉ. वृंदा देशपांडे – जोशी , मराठी विभाग प्रमुख , स. भु. विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
बी. एस. सी. / बी. सी. एस. / बी. व्होक. द्वितीय वर्ष
स्पर्धा परीक्षेसाठी मराठी भाग १

वरील अभ्यासक्रमावर आधारित संभाव्य प्रश्न
(परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न प्रत्येकी २ गुणांना तर अन्य प्रश्न प्रत्येकी ०५ गुणांसाठी येतो. एकूण गुण ३० )
बहुपर्यायी प्रश्नांमध्ये एकूण ०५ प्रश्न सोडवावे लागतात. ते १० गुणांचे असतात.
१. शब्दांच्या एकूण जाती किती आहेत?
१.आठ २. पाच ३. चार ४. सात
२. (!) कंसामध्ये दिलेल्या चिन्हाचा काय म्हणून वापर केला जातो?
१.उद्गारवाचक चिन्ह २. संक्षेप चिन्ह ३. पूर्णविराम ४. यापैकी नाही
३. शब्द तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
१. शब्दघडण २. शब्द साधन . शब्दसिद्धी ४. यापैकी नाही
४. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला कोणत्या संज्ञेने ओळखले जाते?
१. क्रियाविशेषण २. विशेषण ३.विशेष नाम ४. यापैकी नाही
५. शब्दसंधीबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.
१. शब्दांचा संधी होताना शब्द एकमेकात मिसळून नवीन शब्द तयार होतो.
२. शब्द संधी म्हणजे शब्दांची मैत्री होय.
३. शब्द संधी मध्ये काही शब्द वगळले जातात आणि काही शब्द मिसळले जातात.
४. वरीलपैकी कोणताही पर्याय बरोबर नाही.
६. अं व अ: यांना कोणत्या संज्ञेने ओळखले जाते?
१. स्वर २ व्यंजन ३. स्वरादी ४.यापैकी नाही
७. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?
१. नाम २. सर्वनाम ३. विशेषण ४. क्रियापद
८. भाषा श्रेष्ठ-कनिष्ठ नसते, हे विधान
१. योग्य आहे. २. अयोग्य आहे. ३. थोडे योग्य व थोडे अयोग्य आहे. ४. यापैकी नाही.
९. लेखनविषयक नियमांना अनुसरून केल्या जाणाऱ्या लेखनाला काय म्हणतात ?
१. व्याकरण २. विज्ञान ३. नियम ४. प्रमाण लेखन
१०. कोणत्या जातीतील शब्दांचे रूप कोणत्याही प्रकारे बदलले न जाता जशाच्या तसे वापरले जाते?
१. नाम २. सर्वनाम ३. विशेषण ४. अव्यय
११. ज्या शब्दातून क्रिया दर्शवली जाते त्या शब्दाला काय म्हणतात?
१. नाम २. सर्वनाम ३. विशेषण ४. क्रियापद
१२. भाषेत काही शुद्ध अशुद्ध असे नसते. हे विधान
१. योग्य आहे. २. अयोग्य आहे. ३. थोडे योग्य व थोडे अयोग्य आहे. ४. यापैकी नाही.
१३.. अभ्यासाच्या दृष्टीने भाषेची जी व्यवस्था लावली जाते तिला काय म्हणतात?
१. व्याकरण २. विज्ञान ३. नियम ४. प्रमाण लेखन
१४. कोणत्या जातीतील शब्दांचे रूप कोणत्याही प्रकारे बदलले न जाता जशाच्या तसे वापरले जाते?
१. नाम २. सर्वनाम ३. विशेषण ४. अव्यय
१५. ध्वनिशास्त्रामधील ‘ध्वनी‘ यांनाच व्याकरणात ‘वर्ण’ अशी संज्ञा आहे,
१. सत्य २. असत्य ३. काही प्रमाणात सत्य ४. सहमत नाही
खालील प्रत्येक प्रश्नासाठी ०५ गुण आहेत. परीक्षेत खालीलपैकी एकूण ४ म्हणजेच २० गुणांचे प्रश्न सोडवायचे असतात.
- मराठीच्या वर्णमालेची ओळख करून द्या
- उच्चारस्थानानुसार वर्णांचे वर्गीकरण कसे केले जाते ते सांगा.
- मराठीतील स्वरव्यवस्था विशद करा.
- मराठीतील व्यंजनव्यवस्था स्पष्ट करून सांगा.
- शब्द संधी म्हणजे काय ते सांगून तिचे प्रकार विशद करा.
- संधी म्हणजे काय हे सांगून संधींचे प्रकार सांगा.
- शब्दसंधींचे तीन प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.
- शब्दांची जात म्हणजे काय ती कशावरून ठरते? शब्दांच्या सर्व जातींची ओळख करून द्या.
- विकारी व अविकारी या दोन गटात शब्दांच्या जातींची विभागणी करा
- शब्दांच्या जाती किती व कोणत्या आहेत?
———————————————————————————
यावर आपले मत नोंदवा