विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

जनहितार्थ…

…जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||

जनी जनार्दन या श्रद्धेतून ‘जनहितार्थ’ या शीर्षकाअंतर्गत विविध प्रकारची माहिती ज्ञानोत्सवच्या रसिकांपर्यंत पोहोचवली जाईल. जे जे आपणास ठावे ते ते इतरास सांगावे या संत रामदासांच्या वचनाला स्मरून जे मला तुम्हाला उत्कटतेने सांगावे वाटते, जे सर्वांच्या हिताचे आहे असे वाटते, ते याठिकाणी विनम्रपणे सातत्याने प्रकाशित केले जाईल. शुभं भवतु ! – वृंदा आशय


वंदे मातरम् !

शासन परिपत्रक – घर घर संविधान



Unveling Healing – Book Review – Varsha Vijay Deshpande

रुग्णांच्या चष्म्यातून – इंग्रजी अनुवाद – Unveling Healing
साधना प्रकाशन
लेखिका – डॉ. शुभदा राठी – लोहिया
मो.नं. : ९४२२७४४८४४

रुग्णांच्या चष्म्यातून हे पुस्तक काय आहे? तर ते आहे, एका साक्षेपी डॉक्टरचे समृद्ध होत जाणारे अनुभव विश्व! पंचवीस वर्षांच्या वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टर, रुग्ण आणि त्यांच्यातील नाते संबंधाची भाव-चिकित्सा! ही भाव चिकित्सा एका डॉक्टर ने केली आहे ‘रुग्णांच्या चष्म्यातून’ !
या पुस्तकात रुग्णांच्या उपचारात संवादाचे महत्त्व, स्पर्शाची जादू, सकारात्मक दृष्टीची महती कशी असते हे सगळं जसं आहे, तसंच सामान्य माणसाच्या शहाणपणातून शिकणाऱ्या डॉक्टरांचे ‘विद्यार्थिपण’ सुद्धा आहे.

या पुस्तकात एखाद्या असाध्य आजाराच्या असण्याने खचून जाऊ पाहणाऱ्या आयुष्याला त्या आजाराची वस्तुनिष्ठ माहिती देऊन त्याच्याशी खंबीरपणे लढण्याची हिंमत मिळवून देणारे समुपदेशन आहे.

एखाद्याची श्रद्धा जीवनाच्या संघर्षात त्याला आत्मबल देणारी कशी ठरू शकते… मन हरले तरच आपली हार असते म्हणून मनाला हरु न देता संघर्षपूर्ण जीवन सकारात्मक विचारांनी कसे जगता येईल याची दिशा दर्शवणारे अनुभव या पुस्तकातून लेखिकेने दिले आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांशी रुग्णाचे संबंध हे आजारपणाशी लढताना कसे महत्त्वाचे ठरतात हे जसं या पुस्तकात येतं तसंच रुग्णांच्या डॉक्टरांवरील विश्वासाचाही सकारात्मक उपचारात सिंहाचा वाटा असतो हेही यात प्रकर्षानं येतं.

रुग्ण, त्याचा आजार, त्याची जीवनदृष्टी, विविध नाते संबंध, पती पत्नीच्या सहजीवनापासून ते मृत्युच्या अपरिहार्यतेपर्यन्तचा हा प्रवास वाचताना वाचकालाही समृद्ध करत जातो.

डॉक्टर – रुग्ण व्यवहाराचे निमित्त घेऊन विविध आजार, त्यातून वाट्याला येणारे दुःख, त्याच्याशी लढणारी मानसिक कणखरता, सकारात्मक दृष्टी, मृत्युचे अटळपण अशा जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करत लेखिका आपल्या समोर मांडत जाते एक समृद्ध जीवन – जगण्याचे प्रिस्क्रीप्शन! त्यात वाचक स्वतःला शोधत जातो. तो शोधत जातो त्याचे आजार, त्याचे मन, त्या मनाच्या व्यवहाराचे धागे दोरे! तो अनुभवत जातो त्याच्या संघर्षपूर्ण जीवनाशी लढण्यासाठी खंबीर होत जाणारे मन!

लेखिकेसाठी हा जसा समृद्ध करणारा प्रवास आहे तसाच वाचकांसाठी सुद्धा तो अनेक अर्थांनी समृद्ध करणारा अनुभव ठरतो.

  • नामदेव गुंडाळे
    वाचक , यांची प्रतिक्रिया


नैनिताल – मराठी स्वाध्याय शिबिर

हिमालयाच्या कुशीत वसलेले व महायोगी श्रीअरविंद यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नैनिताल येथील श्रीअरविंद आश्रम, वन-निवास, येथे मराठी मधील स्वाध्याय शिबिरांचे दरवर्षीप्रमाणे आयोजन केले आहे. त्वरित नोंदणी करावी.
नैनिताल आश्रमाचे स्वरूप आता अधिकच सुंदर आणि सोयीचं झालं आहे, त्यामुळे नवे बदल अनुभवायला अवश्य या.

शिबिराच्या तारखा

  1. 1-एप्रिल-2026 ते 7-एप्रिल-2026
  2. 8-एप्रिल-2026 ते 14-एप्रिल-2026
  3. 15-एप्रिल-2026 ते 21-एप्रिल-2026
  4. 22-एप्रिल-2026ते 28-एप्रिल-2026

विषय व व्याख्याते लवकरच कळवित आहोत.

स्थळ
स्वाध्याय शिबीर स्थळ: हिमालयन सेंटर ऑफ वन आश्रम (श्रीअरविंद आश्रम), बारा पत्थर, नैनिताल, उत्तराखंड.

शिबिर शुल्क

  • शिबिर शुल्क: ₹12096(with GST)/per person/Camp(शिबीर) (निवास, चहा, नाश्ता, जेवणा सह).
  • प्रवास खर्च, नैनिताल स्थलदर्शन खर्च  इ. वैयक्तिक असेल.

नोंदणी करून शिबीर शुल्क जमा करण्यासाठी अयोजकांशी लवकरात लवकर संपर्क साधावा. नोंदणी झाल्यावर पुढील माहिती त्वरीत पाठविली जाईल.

संयोजक:

  1. श्री. श्रीकृष्ण दीक्षित, पुणे – 9890331144
  2. सौ. तृप्ती नेरकर, नागपूर – 9422804593

<object class="wp-block-file__embed" data="https://dnyanotsav.in/wp-content/uploads/2025/12/adobe-scan-29-nov-2025.pdf&quot; type="application/pdf" style="width:100%;height:600px" aria-label="<strong>ओळख पुस्तक व लेखकाची – पी डी ओळख पुस्तक व लेखकाची – पी डी Download

आधा चाँद मांगता है पूरी रात… – मराठी अनुवाद – श्री. प्रमोद (पी. डी.) देशपांडे

https://www.facebook.com/share/r/1HA9a9Cw8i

आधा चाँद मांगता है पूरी रात…

पूरी रात के लिए मचलता है
आधा समुद्र

आधे चाँद को मिलती है पूरी रात
आधी पृथ्वी की पूरी रात
आधी पृथ्वी के हिस्से में आता है
पूरा सूर्य
आधे से अधिक
बहुत अधिक मेरी दुनिया के करोड़ों-करोड़ लोग
आधे वस्त्रों से ढाँकते हुए पूरा तन

आधी चादर में फैलाते हुए पूरे पांव
आधे भोजन से खींचते पूरी ताकत
आधी इच्छा से जीते पूरा जीवन
आधे इलाज की देते पूरी फीस
पूरी मृत्यु
पाते आधी उम्र में।

आधी उम्र, बची आधी उम्र नहीं
बीती आधी उम्र का बचा पूरा भोजन
पूरा स्वाद
पूरी दवा
पूरी नींद
पूरा चैन
पूरा जीवन

पूरे जीवन का पूरा हिसाब हमें चाहिए
हम नहीं समुद्र, नहीं चाँद, नहीं सूर्य
हम मनुष्य, हम –
आधे चौथाई या एक बटा आठ
पूरे होने की इच्छा से भरे हम मनुष्य।

नरेश सक्सेना

आधा चाँद मांगता है पूरी रात…

हिंदीतील ज्येष्ठ कवी नरेश सक्सेना यांची ही कविता केवळ चंद्र, समुद्र वा पृथ्वीची नाही. ती अर्धवटतेत अडकलेल्या माणसांच्या पूर्णत्वाच्या आकांक्षेचा जणू आवाज आहे. सामाजिक भान जागवणाऱ्या या कवितेचा मराठी अनुवाद—

अर्धा चंद्र मागतोय पूर्ण रात्र

अर्धा चंद्र मागतोय पूर्ण रात्र

पूर्ण रात्रीसाठी उसळतो
अर्धा समुद्र

अर्ध्या चंद्राला मिळते पूर्ण रात्र
अर्ध्या पृथ्वीवर पसरते पूर्ण रात्र
अर्ध्या पृथ्वीच्या वाट्यास येतो
पूर्ण सूर्य
अर्ध्यापेक्षा जास्त, खूपच जास्त
माझ्या जगातील कोट्यवधी लोक
अर्ध्या वस्त्रांनी झाकतात पूर्ण देह

अर्ध्या चादरीत पसरतात पूर्ण पाय
अर्ध्या जेवणातून खेचतात पूर्ण ताकद
अर्ध्या इच्छेनं जगतात पूर्ण आयुष्य
अर्ध्या उपचाराची देतात पूर्ण फी
आणि मिळवतात
पूर्ण मृत्यू
केवळ अर्ध्या आयुष्यात

अर्ध आयुष्य…
उरलेलं अर्धं आयुष्य नव्हे
तर गेलेल्या अर्ध्या आयुष्यात
मिळायचं राहिलेलं पूर्ण अन्न
पूर्ण चव
पूर्ण औषध
पूर्ण झोप
पूर्ण शांती
पूर्ण जीवन

पूर्ण आयुष्याचा
पूर्ण हिशेब आम्हाला पाहिजेय
आम्ही ना समुद्र, ना चंद्र, ना सूर्य
आम्ही माणसं —
अर्धा, पाव, किंवा अष्टमांश भाग
पूर्ण होण्याच्या आकांक्षेनं भरलेली
आम्ही माणसं

मूळ हिंदी कविता: नरेश सक्सेना
मराठी अनुवाद: प्रमोद देशपांडे ‘पीडी’

nareshsaxena #man #deficit #hindipoem #hindipoetry #socialpoetry #hinditomarathi #marathitranslation #BhashaBandh #peedeedeshpande #bhashabandh #PramodDeshpande #peedeequotes #khushbookasafar #नरेशसक्सेना #सामाजिककविता #हिंदीकविता #हिंदीकाव्य #हिंदीसेमराठी #मराठीअनुवाद #माणूस #मनुष्य #अनुशेष #भाषाबंध #प्रमोददेशपांडे #पीडीदेशपांडे #ख़ुशबूकासफ़र


🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु ! 🙏

यावर आपले मत नोंदवा