||ॐ||
|| ॐ गं गणपतये नम: ||
|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||
नमस्कार. सुप्रभात ! आज या उगवत्या सूर्याच्या साक्षीने सांगण्यास आनंद होत आहे की येत्या २१ डिसेंबर रोजी ज्ञानोत्सव संकेतस्थळ प्रकाशित करत आहे आपले विशेष पृष्ठ –
*’ज्ञानोत्सव’ चे दीपपृष्ठ*
वास्तविक पाहता ज्ञानोत्सवचे ‘दिवाळी पान’ काढावे ही अगदी अंतरीची इच्छा होती. त्या दृष्टीने दिवाळीच्या काळात तयारी देखील सुरू होती. मात्र ‘ज्ञानोत्सव’ चे बोधवाक्य आहे
‘ज्ञान म्हणजे उजळून निघणं’
आणि लक्षात आलं मनामध्ये अनेक किल्मिषं आहेत, जाळी – जळमटी आहेत, आणि घराची – अंतर्मनाची स्वच्छता झाल्याशिवाय आपल्याला दिवाळी साजरी करायला बरं वाटत नाही. म्हणून दिनदर्शिकेवरच्या दिवाळीपेक्षा, मनाची जेव्हा स्वच्छता होईल त्या वेळेला – त्या अनुषंगाने ज्ञानोत्सव चे दीपपृष्ठ प्रकाशित करावे हे तेव्हाच ठरले आणि परमेश्वराने दिलेल्या आदेशानुसार येत्या २१ डिसेंबर रोजी हे पृष्ठ प्रकाशित होत आहे –
रे कृष्णा,
तू धरले मला करी
मी धरले तुला उरी
तू प्रवेशाला अंतरी
कृपाळू, तो माझा श्रीहरी !
या अंकामध्ये आपल्या भेटीला येणार आहेत
१. ज्ञानोत्सव या संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या वेळी गुरुवर्य डॉक्टर सुधीर रसाळ सर यांनी दिलेले आशीर्वचन – अर्थात सरांचे भाषण
२. संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक कुमुद ताई गोसावी यांचे आशीर्वाद
३. मला ‘ विद्यावाचस्पती’ या पदवीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या गुरु प्रा. डॉ. लता मोहरीर यांचे लेखन
४. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त श्रीमती सुशीला ताई अभ्यंकर यांची विशेष मुलाखत
५. डॉ. रंजन गर्गे यांची विज्ञान कथा
६. श्री प्रमोद देशपांडे यांचे काव्य लेखन
७. श्री प्रमोद पाठक यांचे संत बहिणाबाईंविषयक लेखन
८. सॉफ्टवेअर इंजिनियर श्री केदारनाथ शास्त्री यांचे – एस. एल. भैरप्पा विषयक लेखन
९. प्रा. डॉ. ज्ञानेश्वर थोरात यांचे लेखन
१०. प्रा. डॉ. अलका काथार यांचे काव्य
११. सौ. मधुरा अन्वीकर लिखित कुटुंब विषयक श्रुतिका
१२. श्री. विजय देशपांडे यांचे आळंदी व संत ज्ञानदेवांच्या साहित्य विषयक अनुभव
१३. डॉ . वर्षा देशपांडे यांचे योग विषयक लेखन
१४ . कु. मधुरा विवेक देशपांडे हिचे पाश्चात्य देशातील शिक्षण विषयक अनुभव
१५. कु. श्रिया आशय जोशी हिचे काव्य
१६. अंबाजोगाई येथील ग्रंथमित्र श्री. अभिजीत जोंधळे यांची ‘पुस्तक पेटी’
*विशेष सहभाग – थेट अमेरिकेहून – कोणाचा?
…..वाट पाहा २१ डिसेंबरपर्यंत!
शिवाय वृंदा आशयचं बरंच काही….
तेव्हा २१ डिसेंबरला खालील दुव्यावर अवश्य या.
‘अतिथी देवो भव’ या नात्याने आम्ही आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहोत.
सुस्वागतम् ! – ज्ञानोत्सव समिती*
संपादक – वृंदा आशय
शुभं भवतु !
🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏
*
यावर आपले मत नोंदवा