पृष्ठ क्र, २
सरावासाठीचे प्रश्न
१. ‘स्मशानातील सोने’ या कथेतून अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या भिमाच्या जीवन संघर्षाचे चित्रण करा.
२. तुम्हाला आवडलेली एक कथा (कथाकथनसाठी) प्रोजेक्ट पेपरवर लिहून आणा. (प्रात्यक्षिक)
३. आनंद यादव यांच्या ‘तिरकूट’ या कथेतून आलेल्या विनोदी प्रसंगाचे वर्णन करा.
४. तुमच्या एका आवडत्या वक्त्याची माहिती लिहून सादर करा. (प्रात्यक्षिक)
५. प्रभावी वक्तृत्वासाठी वक्त्यामध्ये कोणते गुण आवश्यक आहेत ते लिहा.
६. पुढीलपैकी एका विषयावर ८०० ते १००० शब्दात वक्तृत्व संहिता लिहा व सादर करा.
अ) मतदान एक प्रभावी साधन आ) समाज माध्यम आणि तरुणाई इ) अभिजात दर्जा व मराठीचे भवितव्य (प्रात्यक्षिक)
७. एखादा कथासंग्रह किंवा तुम्हाला आवडलेले अवांतर वाचनातले मराठीचे कोणतेही एक पुस्तक लक्षपूर्वक वाचून त्याचा परिचय तुमच्या शब्दात लिहून द्या.
८. राज्य घटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘राज्यघटनेचे महत्त्व’ या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी भाषण तयार करा.
विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करताना केलेल्या काही भाषणांची link खाली देत आहे.
आमचे विद्यार्थी हीच आमची श्रीमंती ! ज्ञानोत्सवच्या माध्यमातून सरस्वती भुवनचे विद्यार्थी घेऊन आलेले आहेत आपले ‘विचारधन’ . अवश्य ऐका , ही विनंती. धन्यवाद.
‘अमृतधारा’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात प्रा. डॉ. वृंदा देशपांडे – जोशी यांची झालेली भाषणे
धन्यवाद !
यावर आपले मत नोंदवा