
देव – संदेश
माणसाने क्षमा मागावी ते दुसऱ्याचे मन मोठे असते म्हणून नव्हे
तर स्वतःचे मन व हृदय व्यापक व्हावे म्हणून !
स्वामी विवेकानंद _ युवकांचे चिरंतन प्रेरणास्थान !
तारुण्याचे तीन ‘त’ कार – तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता !

हम चरित्र निर्माण न भूलें !
स्वार्थ साधना की आंधी में
वसुधा का कल्याण न भूलें ||१||
माना अगम अगाध सिंधु है
संघर्षों का पार नहीं है
किन्तु डूबना मझधारों में
साहस को स्विकार नही है
जटिल समस्या सुलझाने को
नूतन अनुसन्धान न भूलें ||२||
शील विनय आदर्श श्रेष्ठता
तार बिना झंकार नही है
शिक्षा क्या स्वर साध सकेगी
यदि नैतीक आधार नहीं है
कीर्ति कौमुदी की गरिमा में
संस्कृति का सम्मान न भूले ||३||
आविष्कारों की कृतियों में
यदि मानव का प्यार नही है
सृजनहीन विज्ञान व्यर्थ है
प्राणी का उपकार नही है
भौतिकता के उत्थानों में
जीवन का उत्थान न भूलें ||४||


स. भु. विज्ञान महाविद्यालय कनिष्ठ विभागातील कार्यक्रम
स्वामी विवेकानंद संस्कृत भाषण
आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर शिक्षकवृंद आणि माझ्या येथे जमलेल्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आज मी स्वाती संदीप देशपांडे आपल्यासमोर ‘स्वामी विवेकानंद’ यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे, तरी ते आपण शांततेने ऐकावे अशी मी आपणास विनंती करते.
भारतदेशे अयं दिवसः युवा दिवसः। स्वामी विवेकानंद: मूलनाम नरेंद्रः । मातुः भुवनेश्वरदेवी, तस्य पितु: नामधेयम् विश्वनाथ दतः) बाल्यादेव सः प्रतिभावान्, धर्मजिज्ञासु, ऐश्वर्य संपन्ना कुशाग्रबुद्धी, छात्रः संपन्न व्यक्तिमत्वः असीत् । रामकृष्ण परमहंस आध्यात्मिक गुरुः असीत् । स्वामी विवेकानंद भारतस्यभूषणं विराजते । तस्य प्रिया संस्कृत भाषा | तस्य प्रियः विषयाः वेदवाइयमयं उपनिषद:पुराणं प्रियं विषयम् ।
हिंदू धर्मस्य महान् उपदेशकः । अमेरिकादेशे विश्वधर्मसंमेलन म् अभवत् । सर्वेभ्यः जनेभ्यः भाषण अतीव रोचते। भगिनी निवेदिता तस्य परमा शिष्या। विवेकानदस्य चरितं, जीवनं मध्यम् अतीव रोचते । सः भारतस्य अलंकारः, जयतु भारतम् जयतु राष्ट्रम् जयतु संस्कृतम् ! धन्यवाद .
मार्गदर्शक – श्री. प्रवीण नंद
https://www.facebook.com/share/1DNeVH3Axj/
उत्तिष्ठ भारत
उत्तिष्ठ ! जाग्रत ! प्राप्य वरान्निबोधत।
https://www.facebook.com/share/1GYSro5hDr/

देश का युवा कैसा हो , स.भु. के युवा जैसा हो !
स. भु. च्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने सह्याद्री गिरिभ्रमण मोहीम यशस्वी
सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय छात्र सेना युनिटच्या वतीने दिनांक २ व ३ जानेवारी २०२६रोजी सह्याद्रीतील ‘हरिश्चंद्रगड’, ‘कोकणकडा’, ‘संदन व्हॅली’ अशी ‘सह्याद्री गिरिभ्रमण मोहीम’ यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. राष्ट्रीय छात्र सेनेचे४७ छात्र यामध्ये सहभागी झाले होते. ही मोहीम कॅप्टन डॉ. गजानन सानप यांच्या नेतृत्वात राबवली गेली.
दिनांक १ जानेवारी रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश पाटील व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ विशाल देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच मोहिमेस शुभेच्छा दिल्या. या संवादात त्यांनी सह्याद्रीमध्ये गिरिभ्रमण करताना घ्यावयाची काळजी विशद केली व या मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्वामध्ये ‘साहस’ आणि ‘धैर्य’ या बाबी विकसित कराव्यात असे आवाहन केले.
सदरील मोहिमेमध्ये संदन व्हॅली येथे सर्व छात्रांना रॅपलिंग अनुभवता आले.दोनशे फूट खोल असणाऱ्या आशियातील दोन क्रमांकाची लांब व खोल दरी म्हणून ‘संदन व्हॅली’ आपणास परिचित आहे, या ठिकाणी रॅपलिंगचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरला.

सरस्वती भुवन शिक्षण संस्था अंतर्गत,सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, शारदा मंदिर कन्या प्रशाला, सरस्वती भुवन प्रशाला यांच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने ‘राष्ट्रीय युवक दिना’निमित्ताने व ‘राजमाता जिजाऊ’ यांना अभिवादन करण्यासाठी युवा रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते. या भव्य रॅलीचे उद्घाटन संस्थेचे सरचिटणीस व स्वामी विवेकानंदांचे अभ्यासक डॉ श्रीरंग देशपांडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश पाटील, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे, राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी कॅप्टन डॉ. गजानन सानप, लेफ्टनंट शाहू पाटील, एनसीसी फर्स्ट ऑफिसर श्री मंगेश डोलारे, फर्स्ट ऑफिसर श्रीमती हेमलता पवार जगताप यांच्यासह राष्ट्रीय छात्र सेनेचे 300 विद्यार्थी सहभागी झाले होते.
जिस देश का बचपन सही सिखा हो, उस देश का यौवन समर्थ होगा !
Be CENTENARYIAN to blossom as SB’ian. Enroll & become a SB CENTENARYIAN to discover & realize your true potential as a student & a human being!!

To satisfy yourself through the beautiful discussion & guidance feel free to contact Principal Mr. Rahul Mohanpurkar – 9822333803
SBES Centenary School अर्थात स.भु.शताब्दी प्रशाला प्राचार्य श्री. राहूल मोहनपूरकर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करत आहे. वाचनाच्या बाबतीत ते सांगतात, “मी जेंव्हा पुस्तक आत्मसात करतो तेंव्हा त्याचे ‘वाचन’ पूर्ण झाले असे समजतो.” …….’यथा राजा तथा प्रजा’ या न्यायाने आपले पाल्य निश्चितपणे याच मार्गावर वाटचाल करते. शुभास्ते पन्थान: |
What to be read in teenage? A suggestion by the Principal Mr. Rahul Mohanpurkar

यावर आपले मत नोंदवा