विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

जनहितार्थ ५ _ श्री गजानन महाराज प्रकट दिन


आज पहाटेपासून इतके छान सुंदर काही वाट्याला आले की मला ही ‘देवप्रभात’च वाटली. पहाटेचे हे देवदर्शन खुले करत आहे जनी जनार्दनासाठी ! – वृंदा आशय

गण गण गणात बोते


https://youtu.be/dcrJGeog50Y

# कृष्णसंदेश

लेखन व निवेदन – वृंदा आशय

चित्रफित संपादन – वर्षा विजय देशपांडे

श्री गजानन महाराज प्रकट दिन

शेगावमध्ये प्रकट झाला अवलिया
नाव त्याचे गजानन,कोणी म्हणे
आहे दत्तरुपी तर कोणी म्हणे
साक्षात भगवान श्रीगणेश !

गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा !

शेगावचे श्री गजानन महाराज हे महान संत होते. दत्तसंप्रदायातील योगी म्हणून त्यांना ओळखले जाते. १८७८ फेब्रुवारी महिन्यात गजानन महाराज विदर्भातील शेगाव येथे दिगंबर अवस्थेत तारुण्यात पहिल्यांदा भक्तांना दिसले. त्यांनी कायम लोकांना सेवाभाव शिकवला. आपल्या लीलांनी अनेक चमत्कार गजानन महाराजांनी केले. महाराजांना लोक भगवान गणेशाचा अवतार देखील मनात असत. कोणतेही अवडंबर न करता केवळ भक्तिमार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हेच त्यांनी दाखवले. “गण गण गणात बोते” हा मंत्र त्यांनी जगाला दिला.


श्री गजानन विजय ग्रंथ

https://www.dattamaharaj.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5


•|ॐ|•

रे भगवंता … तुज अर्पियले माझे मन | फुला पानातून देऊन दर्शन | तूच केले रे त्याला उन्मन ||


येथ सारे जाणती स्वरूप | कोणी न करते कोणा विद्रूप | आहे त्यांना एक दुसऱ्याचे अप्रूप ||

तुझ्या निर्मितीत | कसे असेल अपरूप | म्हणून देवा तुझ्या कृपेने | झाले रे मी तुजशी तद्रूप ||


संपूर्ण समर्पण!

वृंदा आशय
🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏🏻



https://www.facebook.com/share/185rWmUVnv/

गण गण गणात बोते या मंत्राचा अर्थ


•|ॐ|•

येथे सांगा लपतं कोण | ढगांच्या आडून बघतं कोण

आला आला माझा चंद्र | शीतलतेचा तो महामंत्र

नका रे ढगांनो त्यावर जाऊ | शीतलतेला लपवून ठेवू

गरज जगाला या सौख्याची | शांततेची आनंदाची…..

तिमिर सरावा हर्ष भरावा | सर्वांच्या आयुष्यात पौर्णिमेचा चंद्र राहावा

चंद्रा हे तुझे जाणे येणे | बघ वाटते उगाचच जीवघेणे

तू असा जवळी राहा |आकाशातून कृपादृष्टीने पाहा


वृंदा आशय
🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏🏻

यावर आपले मत नोंदवा