प्रकाशन – शनिवार दिनांक – १४ फेब्रुवारी २०२६ , स्थळ – ऑनलाईन – https://wp.me/pgMjw7-Gl , संपादक – वृंदा आशय




•|ॐ|•
शब्दवेध
‘ओढ’ आणि ‘ओढ’
‘ओढ’ हा शब्द आपल्या सगळ्यांनाच अत्यंत परिचित असलेला असा आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा शब्द घेऊन आपण कृतिशील असतो. आज ‘ओढाओढ करणे’, ‘चढाओढ लावणे’ हे आमच्या बाजारकेंद्री जीवनाचे मध्यवर्ती सूत्र झालेले आहे. त्यामुळे आयुष्य ‘ओढत’ आपण जगत राहतो आहोत.
….. दुसरी ‘ओढ’ मात्र अतिप्राचीन आहे. चिरकालीन आहे. ती ‘हृदयाची ओढ’ आहे. सारी सृष्टी जिथे प्रेमवृष्टी करते त्या भारतीय संस्कृतीतली ती ‘ओढ’ आहे. माणसाला आत्मसन्मान देणाऱ्या आणि मित्रत्वाने उभ्या करणाऱ्या, जीवनाची ती अजोड जोड आहे.
……… खरंतर ‘तिच्या’मुळे माणसाचं आयुष्य मधासारखं गोड आहे.
तेंव्हा ‘ओढ’ आणि ‘ओढ’ या शब्दांविषयी, संकल्पनेविषयी आणि अजून बरंच काही जाणून घेऊयात १४ फेब्रुवारी रोजी ‘जनहितार्थ’ प्रकाशित होणाऱ्या ‘ज्ञानोत्सवा’च्या ‘प्रेमोत्सवा’मध्ये !
इथे……
वंदन करूयात आपल्या देवतांना!
भेटूयात कुसुमाग्रजांना
जाणून घेऊयात सुरेश भटांना, कडकडून मिठी मारूयात आपल्या भाषा आणि संस्कृतीला!सज्ज होऊयात राष्ट्रसेवेला ! कारण हे सारे आम्हाला सांगत आहेत –
…. प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश!
अहो,
माणूस माणसाला भेटल्यावर
‘रामराम’ करतो तो दर(रोज)चा ‘रामराम’ जो आमचं आयुष्य ‘गुलाबा’सारखं आकर्षक आणि सुगंधीत करतो तो आम्हाला सांगतो –
आप हो मेरे श्रीराम
मेरे हृदय का आराम
संबंध जैसा भक्त हनुमान
प्रभू आप ही हो मेरा सन्मान!
ज्ञानोत्सव समितीसह आपल्या भेटीला येत आहे – संपादक वृंदा आशय
🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏🏻
यावर आपले मत नोंदवा