अनुभवता ओवी एक, लगोलग, तू होतो रे जीवाचा जीवलग !

तू मनकवडा
तरी विचारे मी वेडी
तू का आकाशाएवढा?
कृष्णबोल
ना पडते चंद्राची भूल
ना ऐकू येती पोपटाचे बोल
निनादतो एकच ध्वनी
उठती तरंग मनी
सखे, जा गं तू खोल खोल


https://vrunda-deshpande-joshi-prasangik.blogspot.com/2025/08/blog-post_15.html

https://vrunda-deshpande-joshi.blogspot.com/2021/10/blog-post.html

संदेश
मजसवे बोले आकाश
दाखवे मज प्रकाश
तो भासे नीलवर्णी लक्ष्मीकांत
जो असे अनादी अनंत…
कधी कृष्ण मेघांची दाटी
सांडलेली कधी दूध वाटी
जमवूनी काळे- पांढरे ढग
म्हणे काय दिसते ते बघ
कधी दाखवे अश्व
सांगे गतिमान हे विश्व
दाखवे कधी कुर्म
संयम हेच जीवन – मर्म
हाती बासरी, प्रसंगी केसरी
भासे रे तो मज कंसारी…
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!
यावर आपले मत नोंदवा