विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

Art and Expression

Paintings by Apurva
देव पूजिले , गुरु पूजिले, पूजिले सारे संत 
कृपामयी तो असा जाहला मजवरी भगवंत
काही सांगे,काही मागे जे त्याला लागे विविध रूपे नटूनी रे तो माझ्यासवे वागे

तोचि कर्ता आणि करविता
तोचि धर्ता आणि धरविता
हवे त्याला ते घेतो करुनी
मनी माझ्या ते बीज पेरुनी

हे भगवंता रे तू ताता
तृप्त केले मज तू आता
साधन म्हणूनी मज स्वीकारूनी!

वृंदा आशय

2.

प्रा. सीमा ढगे– ह्यांनी तयार केलेला गणेशोत्सव विशेष फॉर्म नक्की भरा https://forms.gle/rDzQf1nYN2tAfMLj6

प्रा.डॉ. सीमा ढगे
M.Com. M.Phil.NET,Ph.D.
1)सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य विभागात मागील 16 वर्षापासून सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यरत.
2) राष्ट्रीय व/आंतरराष्ट्रीय परिषदेत 16 शोधनिबंध प्रकाशित व 4 शोधनिबंध सादर
3) 2 कार्यशाळांमध्ये सहभागी तसेच resource person म्हणून आमंत्रित
4)दिव्य मराठी वृत्तपत्रात Ph.D. संशोधनावर मुलाखत प्रकाशित
3)विविध दिवाळी अंक,वार्षिक अंकात कविता प्रसिध्द
4)लोकमत तर्फे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त
5)लोकमत वृत्तपत्रात ललित लेखन
6)राज्यस्तरीय कविसंमेलनात निमंत्रित व सहभागी कवियत्री
7) वाणिज्य विषयक दोन पुस्तकांचे प्रकाशन

3.

यंदा माझ्या लक्ष्म्यात
बाई, पूजला गं नारायण
सारी सृष्टी करेल आता
सुख समृद्धीचे पारायण !

वृंदा आशय

5.