विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

किरणोत्सव _ २

(दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२६)

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ज्ञानोत्सवचा किरणोत्सव !

कृष्ण संदेश

                                                  •|ॐ|•

वाणि विद्यादायिनी नमामि त्वां!

आपल्याला जीव लावणाऱ्या माणसांसाठी मनाला आणि मताला मुरड घालता आली पाहिजे.
…… आणि आपल्या वरून जीव ओवाळून टाकणाऱ्यांसाठी मनाची आणि मताची मोडतोड देखील करता आली पाहिजे. कारण या विसर्जनातूनच होत असतं नवसृजन.

– वृंदा आशय

शुभं भवतु !

वाणीच्या देवतेला समर्पित!


माझी कृष्णतुळस फुलली रे ; माझी रामतुळस सुकू नये एवढीच प्रार्थना, श्रीरामा!

केला नाही कधी
मत्सर द्वेष हेवा
तरीही का सुकावी रे
माझी रामतुळस देवा?

केले नाही गैरभाष्य
ना केली व्याजस्तुती
तरीही का जावी रे
माझी प्रतिमा सती?

दिला गुरुंनी वसा
करावे कौतुक गुणांचे
अन् ठासून सांगितले
व्हावेच खंडन अवगुणांचे

हे वाणीची देवता
सार हे मौखिक ज्ञानाचे
मग तरी का गं तुटते
नाते जनामनांचे?

का तुटते नाते शब्दांचे
आपुल्याच अर्थाशी !
भरल्या पोटी कसे जगावे
जेंव्हा राही मन हे उपाशी!

वृंदा आशय








यावर आपले मत नोंदवा