(दिनांक १४ जानेवारी ते दिनांक २८ जानेवारी २०२६)
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ज्ञानोत्सवचा किरणोत्सव !

जीवन में दो चीज
का कभी अंत नहीं होता..
भगवान की कथा और मनुष्य की व्यथा
प्रार्थना कुछ माँगने के लिए नहीं लेकिन.
ईश्वर ने जो कुछ दिया है
उसके प्रति आभार व्यक्त करने के
लिए होनी चाहिए !
(देवा, तुला एकच प्रार्थना – एकवेळ कोणाला सुखावता आले नाही तरी चालेल; पण खचितच दुखावू नये आणि जाणीवपूर्वक तर नाहीच नाही ! कसं आहे ना देवा, टोचणे हा काट्याचा गुणधर्मच असतो पण फुलं जेंव्हा टोचायला लागतात ना तेव्हा ती स्वधर्म सोडून देतात. देवा ही सगळी सृष्टी तुझीच आहे रे. इथं स्वधर्म सोडून वागण्याचा कोणालाही अधिकार नसावा असं नाही वाटत का रे तुला ? काय आहे ना आम्ही पामर माणसं शेवटी तुलाच न्याय मागणार ना रे ! ‘राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर जावं कुठे?’ अशी एक लोकोक्ती आहे. तुझ्याबद्दल असं काही म्हणायची वेळ येऊ देऊ नको रे एवढीच प्रार्थना!)
विलक्षण धक्कादायक आणि दु:खद घटना – भावपूर्ण श्रद्धांजली !

अवघा रंग एक झाला – संत सोयराबाई
https://www.aathavanitli-gani.com/Song/Avagha_Rang_Ek_Jhala

•|ॐ |•
होके बड़ा कृपालु
आया है मेरा कान्हा
चल रही है यहॉं
देखो ठंडी हवा
झूम उठा है हां
अब सारा जहॉं
रोमांचित हूॅं मै
पुलकित तन मन
देख के उसका ‘सुदर्शन’
कर के आपका सु-दर्शन !
संपूर्ण समर्पण!
- वृंदा आशय

कृष्ण माझा – मी कृष्णाची!
कृष्ण माझा सखा सोयरा
घुसमटलेल्या क्षणी येतो
होऊन मंजुळ वारा….
घेऊन करी ती बासरी
‘ काय झाले’, विचारे
माझा श्रीहरी…
वाहती त्या क्षणी
घळघळ धारा, पाहुनी
त्याचा जीव अर्धा….
बोल ना गे माझी राधा !
क्षणात होई कृष्ण स्पर्श
राधेच्या मनी दाटे हर्ष
कृष्ण माझा मी कृष्णाची
गाठ आमुची जन्मोजन्मीची
– वृंदा आशय

मी घट्ट मिठी मारते
वाऱ्याला, राधा होऊन
तोही क्षणभर स्तब्धावतो
जरा बावरून….
मी घाबरते
रागावलास काय, विचारते
तो स्वतःला सावरतो
सायलीला हलवून…
हळूच डोकावे सूर्य
त्या सायलीमधून
किती घेतो काळजी
तिला न लागो ऊन!
– वृंदा आशय

•| ॐ |•
आयुष्यास लाभावे
‘रामपादुकापण’
तेथ असावा
भरत जाण
असावा हनुमान
शक्तीभक्तीचे भान
तेथ नसावा
कैकयीचा कान
अन् नसावेच तेथे
मंथरेचे मानी मन!
संपूर्ण समर्पण!
वृंदा आशय

रात्रीच्या अंधारात
तुझा आधाराचा हात
जेथ देव हृदयात
तेथ ना घात – आघात!

- | ॐ | •
विरे जेव्हा वृत्ती
होई शुद्ध मती
ना अहं ना सोहं
ना राही प्रश्न कोहं
ना मी कोणाची
कोणी नसे माझा
सर्व होई माझे
अन् मी सर्वांचा !
संपूर्ण समर्पण!
- वृंदा आशय
यावर आपले मत नोंदवा