विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

किरणोत्सव ४ _ ध्वज मराठीचा _ साज संस्कृतीचा

स्वागत सरस्वतीच्या लेकींचे !

(विशेष पृष्ठ – स्वागत अभिनेत्री चिन्मयी सुर्वे ऊर्फ चिन्मयी सुमित यांचे आणि विशेष अभिनंदन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांचे ! ) – संपादक वृंदा आशय

(जागतिक मातृभाषा दिन आणि मराठी भाषा दिन घेऊन आलेल्या फेब्रुवारी महिन्याचे ज्ञानोत्सव तर्फे हार्दिक स्वागत! भेटत राहू अधूनमधून, जेंव्हा जेंव्हा एकमेकांची आठवण येईल उत्कटतेने – ज्ञानोत्सव समिती )

https://www.facebook.com/share/p/1CzyhPh75E/

आज निलपुष्प उमलले माझ्या अंगणात
अन् फुलला वसंत स.भु. च्या प्रांगणात!

आदर ज्ञानाचा क्षण अभिमानाचा !

पुनश्च हार्दिक अभिनंदन !

सरस्वती भुवनला आपला नितांत अभिमान आहे. मूल्याधिष्ठित राजकारणासाठी हार्दिक शुभेच्छा !

उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर केवळ अर्थ खाते वगळून अजित पवारांकडे असलेल्या सर्व खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.

https://share.google/ZFugs1xlY56Ix6ey9


क्षण आनंदाचे – शिशिरोत्सवाचे ! (स्नेहसंमेलन – सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय )

सर्व विद्यार्थ्यांतर्फे जल्लोषात – आनंदात स्वागत चिन्मयी सुर्वे ऊर्फ चिन्मयी सुमित यांचे ! –

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A4



हे महाकवे, निवांत असते मी जेंव्हा तुम्ही असता पाठीशी, कारण तुमच्यासोबत आपसूक येतात शाश्वत शब्द आणि समर्थ साहित्य, ‘लढायला बळ देणारे आणि घडण्याचा संदेश देणारे !’ विनम्र अभिवादन !

दर्शन निसर्गाचे

दर्शन – कवी मंगेश पाडगावकर 

मीं कधींच नाहीं म्हटलें कीं तूं दे मज दर्शन

होत्या लाटा उधळित अपुली फेनिल कविता फुलांफुलांतुन अखंड उमलत होती नवता

होते वारे वाहत, तारे होते चमकत बाभळीवरही गुच्छ फुलांचे होते लगडत

 रे कसें वेगळे म्हणूं सांग तुज यांच्यापासून ? मीं कधींच नाहीं म्हटलें कीं तूं दे मज दर्शन

उठूनी पहाटे जावें तर तूं रंगच व्हावें  नभीं पहावें तर तूं ढग होऊन झुलावें

 या धारांतुन तुझे कृपामय हात दिसावे किरणांच्या अधरांवर स्मित तव फुलत असावें 

हें डोळे भरुनी बघतों आहें सारें अनुदिन, मीं कधींच नाहीं म्हटलें कीं तूं दे मज दर्शन

तूं नाहिंस ? या वसंतांतुनी कोण फुले मग ? तूं नाहिंस ? दवबिंदुत कां मग झगमग झगमग ? 

तुझ्यावाचुनी बीजांमधुनी कोण फुले रे ? तुझ्यावाचुनी रंगांमधुनी कोण खुले रे ?

मीं कधिं न पाहिलें तुझें निराळेपण त्यांच्याविण, मीं कधींच नाहीं म्हटलें कीं तूं दे मज दर्शन

हेलावे जनसागर माझ्या अवतींभवती खरें सांग, हीं नाना रूपें तुझींच नव्हतीं ?

मनामनांतुन त्यांच्या होती तुझी चेतना कर्माकर्मामधून होती तुझी प्रेरणा !

मी कसें उणें तुज करूं त्यांचिया सुखदुःखांतुन ? मी कधींच नाहीं म्हटलें कीं तूं दे मज दर्शन

तुला पाहिलें ऋतूऋतूंतुन; फुलाफळांतून, त्या गगनांतून, या मातींतून, स्थितीगतींतुन, संघर्षातून,

सुखदुःखांतुन, व्यथेव्यथेतून या सृष्टींतून, अन् भवतींच्या मानवतेंतून……………………

 रे कसें शोधुं तुज वेड्यापरि मीं तुलाच टाकून ? मीं कधींच नाहीं म्हटलें कीं तूं दे मज दर्शन

काकरवाडी : वर्धा

१८-८-५२


मातृभूमीचा आणि मातृभाषेचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे !

श्रीकृष्णार्पणमस्तु !

यावर आपले मत नोंदवा