विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

जानकी जन्मोत्सव

,,,,, संपादक वृंदा आशय




Post from Aurodhwani YouTube Channel

http://youtube.com/post/Ugkx4YF-njwIr6V91t3BLIbx2loRnJb-NgC4?si=rOnC3fTKCgXx1PB5

विनम्र कृतज्ञतेने संपूर्ण समर्पण !



कृष्णसंदेश

•|ॐ|•
वाणि विद्यादायिनी नमामि त्वां!


जीवाहून जास्त मोल असलेल्या सीतेचा त्याग करणे राजा रामचंद्राचं प्राक्तन होतं. तर जीवच असलेल्या राधेला सोडून जाणं कृष्णाला भाग होतं. कारण मनुष्य अवतार घेतलेल्या या देवांच्या नियतीत ते आधीच लिहून ठेवले गेले होते. ….. तरीही, भारतीय संस्कृतीच्या उपासकांच्या नसानसातून वाहणारे राम-कृष्ण ‘प्रेमाचा’ संदेश देतात, ही मानवी जीवनाचे प्रतिनिधित्व करणारी विसंगती नव्हे काय?
….. हो. ही विसंगतीच. कारण त्यांनी धारण केलेला मानवी अवतार !

‘एक धागा सुखाचा
शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा
तुझियाआयुष्याचे’

हा मानवी जीवनाचा नियमच आहे आणि वरवर वाटणारी ही विसंगती जो सृष्टीचालक आहे तो मात्र सृष्टीच्या सुसंगतीसाठी निर्मित असतो किंवा या विसंगतीचा वापर एका महान सुसंगतीसाठी करत असतो; असे आपल्याला म्हणता येईल. मात्र ही महान सुसंगती आपल्या साध्या डोळ्यांना दिसू शकत नाही किंवा व्यग्र मेंदूला आणि व्यस्त मनाला आकलन देखील होऊ शकत नाही. ती कळणे आपल्या आवाक्यात नसते अशातला भाग नाही, मात्र त्यासाठी आवश्यकता असते, निरागस मनाची आणि निरामय जीवनाची! त्यासाठी आवश्यकता असते सृष्टीचा एक घटक म्हणून आपलं ‘व्यष्टीपण’ जपण्याची आणि याच धरतीवर ‘समष्टी’ जोपासण्याची!
कदाचित म्हणूनच कृष्ण म्हणतो….
” सृष्टी आहे तशी पाहुयात, दृष्टी विकसित करुयात.”
शुभं भवतु !


वृंदा आशय
🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏🏻



तो रूद्रांश तो शिवांश

निळ्या नभात लाल आभा
सांगे येतोय आदित्य बघा
बघता तो उगवता नित्य
वेड लावतो मज आसमंत
अन् स्मरतो तो हनुमंत !

जो जगताचा संकटमोचक
आहे श्रीरामांचा परमसेवक
पवनवेगे क्षणार्धात येईल
प्रकटेल पुन्हा तो चिरंजीवी
गुण गातील त्याचे महाकवी !

आयुष्य ज्याचे आहे श्रीराम
स्मरेना त्याला दुजे काही काम
अकस्मात प्रकटला अशोकवनी
चिरंजीव झाला हो तो रामायणी
महाभारती कृष्णसेवा ध्वजावरुनी !

अन्याय घडतो जेव्हा जेथ जेथ
तो झेपावतो पुढे रामादेश घेत
असो कोणतेही क्षेत्र अन् काळ
कलियुगीही त्याची हीच धारणा
समर्थ उत्तर देईल सीताहरणा!

वृंदा आशय


उघड्या दारातून सताड
जाताना तुझ्या पल्याड
का व्हावी चेंगराचेंगरी
पुसे माझी मनमंजिरी

का त्या जुन्या खुणा
डोकावती पुन्हा पुन्हा?
जेथले तेथे टाकून द्यावे
घेऊ नयेच काही सवे!

अशा कोणत्या आठवणी
सांगे तो सारंगपाणी ?
जेथ सरस्वतीचे नृत्य
तेथ कैसे न येई सत्य?

वृंदा आशय


ऊन आता असह्य झालं श्रीरामा, तू माझ्यासाठी सावली हो ना !

श्रीराम आर्त ऐक हाक श्रीराम

तुला प्रार्थिते तू कर एक काम

तूच वसतो माझ्या अंतरी

धनुष्य हाती कधी बासरी

पवित्र मम अंतर जाहले

राम कृष्ण हरी इथे विसावले

येथे कैसी नांदे अपवित्रता?

तरीही रावण हरे सीता

आले रे मी तुझ्या सवे वनी

सत्याला मम मनी चिंतूनी

कधी जानकी कधी राधा रुक्मिणी    

श्रीकृष्ण धरे जिला जनी मनी !

– वृंदा आशय


||• ॐ•||

ती चंद्रकोर
येई माझ्यासमोर
आणि म्हणे लोपेल मी
मग होईल अमावस्येचा अंधार !

मी तिला प्रार्थिते
नको ना गं असं करू
तूच माझ्या उजेडाचा आधार !

नको तोडू तू अशी मैत्री
तुझ्यामुळेच तर शिव आमचा होतो भालचंद्र
अन् येणार बघ आता महाशिवरात्री,
सर्व तेजाची दात्री!

संपूर्ण समर्पण!

वृंदा आशय

|| श्रीहरिहरेश्वरार्पणमस्तु !||


कृष्णतुलेची कथा – कीर्तनकार – डॉ. सौ. सविता जयंत मुळे, तबला – श्री . सुमेध मुळे, टाळ – कु, रेवा मुळे,

संवादिनी – श्री. दिनेश डोळे


मॉंझी, नैय्या पार कर दिजिए ना, राह देख रहे हैं किनारा कब आएगा?
संपूर्ण समर्पण!

हम अक्सर बात करते है
‘ना‘ कहने की
हम कहते है कि हमें ‘ना‘ कहना आना चाहिये
लेकिन इसी का एक और पक्ष भी है
हमे ‘ना‘ सुनना भी आना चाहिये
मनन कीजियेगा कि हमने ‘ना‘ कहने का साहस तो जुटा लिया
लेकिन क्या किसी की ‘ना‘ को हम सम्मान दे पायेंगे ?
जरूरी है अपने आत्मसम्मान के साथ हम सामने वाले के सम्मान को भी मान दे।
प्रकृति और जीवन सदैव संतुलन चाहते है ।

आत्ममुग्धा #sangeetasart (Threads वरून साभार )


यावर आपले मत नोंदवा