विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

एकला चालो रे …….

•| ॐ |•
🪷 सुप्रभात 🪷

आपले स्वतःचे शरीरही काही काळानंतर आपल्याला साथ देणे सोडून देते,पण सद्गुरुंचे तत्व आणि ज्ञान आपल्याला जन्मोजन्मी साथ देते.
कुमुदताई गोसावी, पुणे.
संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक

🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏🏻

•| ॐ |•

खूप दिवसांपासून मी विचार करत होते. सरस्वती आणि कृष्ण यांचा काय संबंध असावा? आज मला आपसूकच उत्तर मिळालं. विद्येच्या देवतेचा हा ज्ञानदीप तेवता ठेवण्याची जबाबदारी कृष्ण घेतो.

                            श्रीकृष्णार्पणमस्तु!

ज्ञानदीप ठेवो तेवता माझा श्रीकृष्ण
देवा सुटो रे आता जगाचे कूट प्रश्न

होऊ नये उपेक्षा आता रे गुणांची
आणि उगा जोपासना अवगुणांची

नसेल येथ चाड होणा-या पापाची
व्हावी रे देवा आता गणना पुण्याची!

वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!



एकला चालो रे …एक दंतकथा!

अंधारात तुम्ही लावला
असा प्रकाशाचा दिवा
विझवू शकेना त्याला
कोणतीही वादळी हवा

मंत्र दिला चाल एकटा
थकू नकोस कधीही
वेच रे तू प्रत्येक काटा
देवही देतो मग साथ ही!

जन्मताच तुम्ही रवींद्र
होऊन आलात इंद्ररव
चालता चालता हे महींद्र
झालात अनाथांचा देव

काय सांगू देवा तुम्हा
माझ्या मनीची व्यथा
काळ उद्याचा म्हणेल
तुम्हा एक दंतकथा!

वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!


देवा, तुझ्या प्रकाशात विसावेल का सायली, जपते रे नाम तुझे ती पावलोपावली !

*गुरुदेव रवींद्रनाथ टागोर: भारतीय विचारांचा मूर्त आविष्कार*

✍️ डॉ.ज्ञानेश्वर थोरात

—————————–

       सर्वश्रेष्ठ प्रज्ञा आणि प्रतिभेची परमोच्च अभिव्यक्ती ज्यांच्या साहित्यामध्ये आहे ;असे जागतिक किर्तीचे सुप्रसिद्ध साहित्यिक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर भारताची अस्मिता जागविण्यात आपल्या वाणी आणि लेखणीचा सातत्याने उपयोग करत राहिले. “जन गण मन” हे आपलं राष्ट्रगीत त्यांच्या लेखणीतून आवतरलं; राष्ट्रीय अस्मिता आणि एकात्मता जोपासण्याचा मूलमंत्र या राष्ट्रगीताने आपल्याला दिला .हे आपलं परम भाग्य आहे.

       ‘गीतांजली’ हा त्यांचा काव्यसंग्रह जगातील विद्वानांच्या लोकाभिरूचीला पात्र ठरला आणि इ.स. १९१३ मध्ये त्यांना साहित्यातील सर्वोच्च नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य जगतातील या सर्वोच्च पुरस्काराचे ते भारतातील पहिले मानकरी ठरले आणि चमत्कार झाला.

       देश विदेशातून त्यांना ऐकण्यासाठी निमंत्रण येऊ लागली. फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी त्यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं. त्या देशातील सुप्रसिद्ध लेखक रोमां रोलां हे त्या व्याख्यानात उपस्थित होते. स्थळ-काळाच भान हरवून सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.भारतीय साहित्य आणि संस्कृती समजून सांगताना आणि समजून घेताना वक्ता आणि श्रोते एकरूप होऊन गेले होते. व्याख्यानाची सांगता झाली आणि गर्दीतून वाट काढत रोमां रोलां गुरुदेवांच्या भेटीसाठी गेले .विनम्रभावाने त्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाला त्यांनी अभिवादन केलं आणि म्हणाले,”मला भारत जाणून घेण्याची इच्छा आहे ;त्यासाठी मी काय करावे? कृपया आपण मला मार्गदर्शन कराल का ?”

       एका विदेशी साहित्यिकाची तळमळ आणि जिज्ञासा लक्षात घेऊन रवींद्र टागोरांनी क्षणाचाही विलंब न करता प्रतिसाद दिला आणि ते म्हणाले,” तुम्हाला भारत जर जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही स्वामी विवेकानंदांच्या समग्र साहित्याचं अध्ययन करा. त्यांच्या साहित्यात प्रत्येक गोष्ट ही भावात्मक ( सकारात्मक) आहे;अभावात्मक (नकारात्मक) त्यात कुठेच काही नाही.”

        खरंतर त्यांनी स्वतःच साहित्य वाचण्याचा सल्ला दिला असता परंतु त्यांनी तसं केलं नाही. इतरांमध्ये ज्यांना मोठेपणा प्रत्ययाला येतो;अशी माणसं खऱ्या अर्थाने मोठी असतात.

       पुढे रोमां रोलां यांनी स्वामी विवेकानंदांच्या समग्र साहित्याचा अभ्यास केला आणि ‘The Life Of Vivekananda’ अर्थात ‘विवेकानंदांचे जीवन’ या ग्रंथाची निर्मिती केली .भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव असलेल्या त्यांच्या साहित्यालाही इ.स.१९१५ मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देत असताना रोमां रोलां यांनी प्रतिपादन केले,”माझ्या साहित्याची प्रेरणा विवेकानंदांच्या साहित्यातून आली आहे आणि विवेकानंदांच्या साहित्याकडे मी प्रवृत्त झालो ते केवळ आणि केवळ गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांमुळे.” केवढी ही कृतज्ञतेची कबुली आहे ,नाही का ?

       गुरुदेवांनी कलकत्ता शहराच्या बाहेर निसर्गाच्या सानिध्यात ‘विश्वभारती’ विद्यापीठाची स्थापना केली आणि भारतीय राष्ट्रवाद ,स्वदेशी, शिक्षण, साहित्य, संस्कृती आणि कला यांचा पुरस्कार केला. देश विदेशातील विद्यार्थ्यांचे एक अभ्यास केंद्र म्हणून ते नावारूपाला आले आहे.

       महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत प्रा. नरहर कुरुंदकर लिखित ‘शिवरात्र’ नावाच्या लेखसंग्रहात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या संदर्भातील एका लेखाच्या समारोपात त्यांनी लिहिले आहे, महात्मा गांधीजी रवींद्रनाथ टागोरांच्या भेटीसाठी शांतिनिकेतनमध्ये गेले होते .रवींद्रनाथांच्या मनात स्वातंत्र्याविषयी आस्था असली तरी खादीग्राम उद्योगाचे प्रेम फारशे नव्हते . सकाळच्या वेळी गुरुदेव टागोर आणि गांधीजी मोकळ्या हवेत फिरत होते. वेळ सूर्योदयाची होती. पूर्वेला लाल रंग पसरला होता .पाखरे आनंदाने किलबिल करत होती .कवी म्हणाले, “गांधीजी ,या सौंदर्याला ,या आनंदाला तुमच्या तत्त्वज्ञानात काही जागा आहे काय?”

राष्ट्रपित्याने तात्काळ उत्तर दिलं ,”निश्चित जागा आहे .सूर्योदयाचे रमणीय रंग पाहून पाखरांनी गाणी गावीत ; यासाठी तर माझं तत्त्वज्ञान आहे. मात्र तुम्ही सूर्योदयाच्या वेळी गाणारी पाखरे पहाता अन् मी सूर्योदयाच्या वेळी पाखरांना गाण्याची इच्छा व्हावी म्हणून सायंकाळी ती पोटभर जेवून झोपलेली असावीत ; याचीही काळजी घेतो.” प्रसंग अतिशय साधा परंतु अधिक सूचक आहे अर्थात टागोरांची पाखरं दोन पंखांची आहेत तर महात्मा गांधीजींची पाखरं ही दोन हातांची आहेत.प्राय: प्रस्तुत प्रसंगात दोन महात्म्यांच्या एकत्रित येण्यातून घडलेला संवाद मात्र साधा नाही .तो तुम्हा आम्हाला खात्रीने एकत्रित आणण्याचं सामर्थ्य ठेवतो, हे या निमित्ताने आपण लक्षात घेतलं पाहिजे .देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांहून अधिक काळ झाला,अशा प्रदीर्घ वाटचालीतही स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया आपणाला या निमित्ताने अधिक गतिमान करावी लागेल;आत्मपरीक्षण करावे लागेल.आत्मनिर्भर होण्यासाठी कोणाचीतरी उपेक्षा आणि टिका-टिपणीचे भाव कायमचे दूर झोकून देऊन राष्ट्रकार्यासाठी

‘ देश हा देव असे माझा ‘ या उर्मीने आणि उत्साहाने  पुढे आले पाहिजे आणि जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत आणि श्वासापर्यंत राष्ट्रचिंतनात कृतियुक्त गढून गेलं पाहिजे , तेंव्हा आपलं राष्ट्र वैभवाच्या शिखरावर जायला वेळ लागणार नाही.


जयंतीनिमित्ताने प्रतिभेस वंदन!

विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या ‘मोने पोडा’ या प्रसिद्ध बंगाली कवितेत आईच्या निधनानंतर एका लहान मुलाच्या मनात उमटणाऱ्या भावनांचे अतिशय हळवे चित्रण आहे. जरी त्याला आईचा चेहरा नीट आठवत नसला, तरी दैनंदिन गोष्टींतून त्याला तिच्या अस्तित्वाची जाणीव होत राहते. या कवितेचा मराठी अनुवाद:

मला माझी आई आठवत नाही…

मला माझी आई आठवत नाही
पण कधीतरी खेळता खेळता अचानक
ती मला जोजवताना आवडीने गायची
त्या अंगाईची सुरावट माझ्या खेळण्यांमध्ये
अजूनही रेंगाळताना जाणवते

मला माझी आई आठवत नाही
पण कधीकधी शारदीय पहाटे
पारिजातकाचा सुगंध जेव्हा खोलीत दरवळतो
तेव्हा देवपूजेच्या त्या मंगल गंधात
मला माझ्या आईच्या अस्तित्वाचा सुगंध जाणवतो!

मला माझी आई आठवत नाही
पण आजही माझ्या शयनगृहाच्या खिडकीतून
जेव्हा मी त्या अथांग निळ्या नभाकडे पाहतो
तेव्हा तिची ती वात्सल्यपूर्ण नजर माझ्या चेहऱ्यावर रेंगाळते
आणि वाटते की तिच्याच मायेने हे संपूर्ण आकाश व्यापले आहे.

मूळ बंगाली कविता : रवींद्रनाथ टागोर
अनुवाद: प्रमोद देशपांडे ‘पीडी’


नित्य आठवावी देवा बाळास रे आई ; सुखे झोपावया त्यास गाईल कोण अंगाई? – वृंदा आशय


Cannot Remember My Mother
by Rabindranath Tagore
(translated by Michael R. Burch)

I cannot remember my mother,
yet sometimes in the middle of my playing
a melody seemed to hover over my playthings:
some forgotten tune she loved to sing
while rocking my cradle.

I cannot remember my mother,
yet sometimes on an early autumn morning
the smell of the shiuli flowers fills my room
as the scent of the temple’s morning service
wafts over me like my mother’s perfume.

I cannot remember my mother,
yet sometimes still, from my bedroom window,
when I lift my eyes to the heavens’ vast blue canopy
and sense on my face her serene gaze,
I feel her grace has encompassed the sky.

(प्रमोद देशपांडे ‘पीडी’ यांच्या सहकार्याने हा अनुवाद उपलब्ध झाला, धन्यवाद.)


रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१, रोजी कोलकाता येथे तर मृत्यू ७ ऑगस्ट १९४१ रोजी कोलकाता येथे झाला. महर्षी देवेंद्रनाथ टागोर आणि शारदा देवी यांचे ते सुपुत्र. खरे तर या कुटुंबाचे मूळ आडनाव कुशारी. वर्धमान जिल्ह्यातील ‘कुश’ हे त्यांचे मूळ गाव. तेथून यशोहर या गावी स्थलांतर केले. जातिबहिष्कारामुळे आपले यशोहर (जेसोर) गाव सोडून महेश्वर व शुकदेव हे त्यांचे पूर्वज कलकत्त्याच्या दक्षिणेला गोविंदपूर गावी स्थायिक झाले. पुढे पंचानन कुशारी ह्या पूर्वजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचे ठेके घ्यायला सुरुवात केली. त्या काळी ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांना ‘ठाकूर मोशाय’ अशा बहुमानार्थी नावाने संबोधीत. इंग्रज कप्तानांनी ‘ठाकूर’ चा ‘टागोर’ असा उच्चार केला.

रवींद्रनाथ टागोर हे एक जगप्रसिद्ध भारतीय कवी, लेखक, संगीतकार, तत्त्वज्ञ होते. त्यांना ‘गुरुदेव’ या नावानेही ओळखले जाते. त्यांनी भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत ‘आमार सोनार बांगला’ रचले असून, साहित्य क्षेत्रातील नोबेल मिळवणारे ते पहिले आशियाई व्यक्ती होते. त्यांना १९१३ साली  त्यांच्या ‘गीतांजली’ या प्रसिद्ध कवितासंग्रहासाठी साहित्यातील प्रतिष्ठित ‘नोबेल पारितोषिक’ मिळाले. त्यांच्या साहित्यात कविता, कादंबऱ्या, लघुकथा आणि नाटके आदींचा समावेश आहे. रवींद्रनाथ यांनी अगदी लहान वयातच कविता लिहायला सुरुवात केली आणि त्यांच्या हयातीत त्यांनी जवळपास ६० काव्यसंग्रह प्रकाशित केले, ज्यात त्यांनी भावगीत, सॉनेट, ओड, नाट्यसंवाद, संवाद कविता, दीर्घ कथात्मक आणि वर्णनात्मक रचना, आणि गद्य कविता यांसारख्या अनेक काव्यप्रकारांचे आणि तंत्रांचे प्रयोग केले. ‘द काबुलीवाला’ मध्ये एका अनोळखी व्यक्तीबद्दल वडिलांची सहानुभूती, ‘द पोस्टमास्टर’मध्ये विरहाचे दुःख, ‘व्हेन विशेस कम ट्रू’मध्ये विनोद आणि ‘द रिटर्न गिफ्ट’मध्ये संपत्तीमुळे निर्माण होणारी सामाजिक दरी आपल्याला आढळते. त्यांनी सुमारे २५०० पेक्षा जास्त चित्रेही काढली.

     या कुटुंबाचा इतिहास पाहता लक्षात येते की ईस्ट इंडिया कंपनीच्या बरोबर टागोर कुटुंबाचीही भरभराट झाली. इंग्रज व्यापारी, राज्यकर्ते आणि ज्ञानोपासक ह्यांच्यात वावर असणाऱ्‍या नव्या सरंजामदारांत टागोर घराण्याचाही अंतर्भाव झाला. त्यांपैकीच राजा राममोहन रॉय (१७७२–१८३३) यांनी बंगालच्या सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या भूमिकेशी रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ एकरूप झाले. सार्वजनिक कार्याला त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे, तर स्वतः उत्तम कायदेपटू आणि व्यासंगी असल्यामुळे वैचारिक परिवर्तनाच्या कार्यातही भाग घेऊन साहाय्य केले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र देवेंद्रनाथ हे रवींद्रनाथांचे तीर्थरूप. बंगाली ब्राह्मो समाजाच्या स्थापनेत आणि प्रसारात त्यांचा फार मोठा वाटा आहे. ब्राह्मो समाजाचे अनुयायी त्यांचा महर्षी देवेंद्रनाथ असा उल्लेख करीत. सर्व प्रकारच्या ऐहिक सुखसंपत्तीची अनुकूलता असूनही उपनिषदांतील तत्त्वज्ञानाच्या गाढ व्यासंगामुळे आणि जन्मजात ईशप्रेमामुळे देवेंद्रनाथांच्या अंगी विरक्ती बाणलेली होती.

बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलपूरजवळ एक विस्तीर्ण माळ रायपूरच्या जमीनदाराकडून देवेंद्रनाथांनी विकत घेऊन तेथे एक कुटिर बांधले. पुढे त्याचीच दुमजली इमारत केली. तिचे नाव ‘शांतिनिकेतन’. जवळच असलेल्या सप्तपर्णीच्या विशाल वृक्षाखाली महर्षी देवेंद्रनाथ ध्यानाला बसत. रवींद्रनाथांचा संस्कृत, इंग्रजी भाषांचा अभ्यास स्वतः देवेंद्रनाथांनी इथल्या वास्तव्यात करून घेतला. ज्योतिर्विद्येची त्यांना गोडी लावली. रवींद्रनाथांचे काव्यलेखन बालवयातच सुरू झाले होते. तत्त्वबोधिनी  पत्रिका नावाच्या नियतकालिकात त्यांची ‘अभिलाष’ ही कविता प्रसिद्ध झाली. त्या वेळी ते बारा वर्षाचे होते. देशप्रेम, सामाजिक सुधारणांचा प्रचार यासाठी टागोर कुटुंबियांच्या साहाय्याने नवगोपाळ मित्र, राजनारायण बसू वगैरे समाजसुधारक कलकत्त्यात ‘हिंदु मेला’ नावाने एक उत्सव साजरा करीत. त्याच्या नवव्या अधिवेशनात रवींद्रनाथांनी वयाच्या चौदाव्य वर्षी (१८७४) देशप्रेमाने प्रेरित होऊन लिहिलेली ‘हिंदु मॅलाय उपहार’ ही कविता वाचली. ह्याच सुमाराला त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले. नंतर बंधू ज्योतिरिंद्रनाथ आणि वहिनी कादंबरी देवी यांचे छत्र त्यांना लाभले.

त्यांनी १९०१ मध्ये शांतिनिकेतन येथे एका अनोख्या शाळेची स्थापना केली, जी पुढे विश्वभारती विद्यापीठात रूपांतरित झाली. वंगभंगाच्या चळवळीला घातपाताचे स्वरूप येऊ लागल्यामुळे त्यांनी त्यातून लक्ष काढून घेऊन ग्रामीण भागातील विधायक कार्य व शांतिनिकेतनातील जीवनशिक्षणकार्याकडे ते केंद्रित केले. १९०७ साली वंगीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ह्या काळात सुप्रसिद्ध बंगाली संपादक रामानंद चतर्जी यांच्याशी त्यांचा स्नेह वाढत गेला आणि प्रवासी ह्या त्यांच्या मासिकातून त्यांची गोरा  (१९१०) ही पुढे जागतिक लौकिक मिळवलेली कादंबरी प्रसिद्ध होऊ लागली. याच वर्षी त्यांचा कनिष्ठ पुत्र शमींद्रनाथ वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी कॉलरा होऊन वारला. १९०९ साली लिहिलेल्या प्रायश्चित ह्या नाटकात धनंजय बैरागी ह्या पात्राकरवी त्यांनी असहकार आणि अहिंसात्मक प्रतिकाराचे जे तत्त्वज्ञान सांगितले आहे, ते नंतरच्या काळातील गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी जुळणारे आहे. राजा (१९१०) हे रुपकात्मक नाटकही त्यांनी याच वर्षी लिहिले. ज्येष्ठपुत्र रथींद्रनाथ १९१० साली अमेरिकेहून परतल्यावर त्याचा प्रतिमा देवी ह्या बालविधवेशी विवाह केला.

शांतिनिकेतनातील रहिवाशांनी त्यांचा पन्नासावा वाढदिवस १९११ साली साजरा केला. प्रवासीमधून त्यांच्या जीवनस्मृती क्रमशः प्रसिद्ध होत होत्या आणि गीतांजलीतून (१९१२) संगृहीत झालेल्या मूळ कविता व डाकघर (१९१२) हे नाटकही याच काळात लिहिले गेले. २७ डिसेंबर १९११ रोजी कलकत्त्यात राष्ट्रीय सभेचे सव्विसावे अधिवेशन भरले असताना ‘जणगणमन-अधिनायक जय हे भारत-भाग्यविधाता’ हे त्यांनी रचलेले आणि संगीतबद्ध केलेले गीत पहिल्या प्रथम गायले गेले. त्यानंतर माघोत्सवांत हे गीत ब्रह्मसंगीत म्हणून गात असत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्या गीताचा ‘राष्ट्रगीत’ म्हणून अधिकृतपणे स्वीकार झाला.

इंग्लंडमधील स्नेह्यांकडून त्यांना समानशील इंग्रज साहित्यप्रेमी लोकांना भेटण्याविषयी आग्रहाची निमंत्रणे येत होती. त्यांनी जाण्याचे ठरवले परंतु ऐनवेळी आजारी पडल्यामुळे बेत रद्द केला व ते शिलाइदह येथे हवापालट करण्यासाठी गेले. ह्या ठिकाणी त्यांनी गीतांजलीत आलेल्या बंगाली कवितांचे स्वतः इंग्रजीतून भाषांतर केले. १९१२ च्या मे महिन्यात ते इंग्लंडला गेले. तेथे सुप्रसिद्ध चित्रकार रोदेन्‌स्टाइन यांनी ते वाचायची इच्छा प्रकट केल्यावरून ते त्यांच्या हाती दिले. त्यांनी श्रेष्ठ कवी डब्ल्यू. बी. येट्स ह्यांच्याकडे त्या रत्नाची पारख सोपवली. येट्स कविता वाचून मुग्ध झाले [⟶ बंगाली साहित्य]. पुढे अनेक नामवंत इंग्रज साहित्यिकांशी त्यांचा परिचय झाला. दीनबंधू सी. एफ्. अँड्र्यूज यांची पहिली भेट याच वेळी झाली आणि पुढे ते त्यांचे आजन्म स्नेही आणि सहकारी झाले. रॉयल आल्बर्ट हॉल ह्या प्रख्यात नाट्यगृहात त्यांच्या ‘दालिया’ नावाच्या कथेवरून इंग्रजीत रचलेल्या ‘महारानी ऑफ आराकान’ ह्या एकांकिकेचा प्रयोग झाला.

लंडनहून ते अमेरिकेत गेले. गीतांजलीच्या इंग्रजी आवृत्तीचे उत्तम स्वागत झाल्याची वार्ता त्यांना कळली. येट्सनी त्या संग्रहाला प्रस्तावना लिहिली होती. १९१३ च्या नोव्हेंबरात शांतिनिकेतनला ते परतले. १३ नोव्हेंबरला त्यांच्या गीतांजलि ह्या काव्यसंग्रहाला स्वीडिश अकॅडेमीने नोबेल पारितोषिक दिल्याची वार्ता कळली. साहित्यासाठी हे पारितोषिक मिळवलेले रवींद्रनाथ हे पहिले आशियाई लेखक होत. रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळण्यापूर्वीच कलकत्ता विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्मानदर्शक पदवी देण्याचा ठराव केला होता. प्रत्यक्ष समारंभ २६ डिसेंबरला झाला. त्यांच्या पुस्तकांची यूरोपातील महत्त्वाच्या भाषांतून तसेच भारतीय भाषांतूनही भाषांतरे होऊ लागली. आंद्रे झीद (फ्रेंच), झेनोबिया येमेनेझ (स्पॅनिश) यांच्यासारखे श्रेष्ठ यूरोपीय लेखक त्यांना भाषांतरकार म्हणून लाभले.

१९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी ब्रिटीश सरकारने दिलेली ‘नाइटहूड’ (सर) ही पदवी परत केली. टागोर हे केवळ साहित्यिक नव्हते, तर त्यांनी भारतीय कला आणि शिक्षणात आधुनिक विचार आणले. त्यांना आधुनिक भारतीय साहित्याचे जनक मानले जाते.

त्यांची सर्वांत थोरली कन्या माधुरीलता (बेला) हिचे १९१८ साली निधन झाले. त्यानंतर सुमारे चार महिने शांतिनिकेतनातील शिक्षणकार्यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. ‘यंत्र विश्वं भवत्येक नीडम्’ ह्या भावनेने स्थापन केलेल्या ‘विश्वभारती’ ह्या संस्थेंची २२ डिसेंबर १९१८ रोजी पायाभरणी झाली. ‘भारतवर्षातील शिक्षणपद्धतीने वैदिक, पौराणिक, बौद्ध, जैन, मुसलमान इ. सर्व विचार एकत्र आणले पाहिजेत व ही विचारसंपत्ती एका ठिकाणी संगृहीत करायला पाहिजे’, हा विचार ह्या स्थापनेच्या मुळाशी होता. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील संस्कृतींच्या अभ्यासाचे आणि संशोधनाचे ते केंद्र व्हावे आणि देश, राष्ट्र इ. मर्यादांचे उल्लंघन करून भूत, वर्तमान आणि भविष्यकाळातील मानवाची प्रगती ही त्या केंद्राच्या विकासाची दिशा राहावी, हे त्यामागील ध्येय होते.

  
माहिती संकल
श्री. दिगंबर पाठक


दैनिक लोकसत्ताच्या सौजन्याने

https://share.google/DKpvRgvcrqPk7jP78


https://share.google/aDjcsVBzcCW3ADsG0



भारताचे जीवितकार्य – ३१

दि. २६ जानेवारी १९६४

साधक : तुमच्या दिव्य दृष्टीला भारत कसा दिसतो असे जर तुम्हाला एका वाक्यात विचारले तर तुम्ही सारांशरूपाने काय सांगाल?
श्रीमाताजी : जगद्गुरू होणे ही भारताची खरी नियती आहे.

साधक : तुम्हाला आजचे वास्तव कसे दिसते, यावर तुम्ही एका वाक्यात आम्हाला काय सांगाल?
श्रीमाताजी : सद्यस्थितीतील वास्तव हे एक मोठेच मिथ्यत्व (falsehood) आहे; त्याने शाश्वत सत्य दडवले आहे.

साधक : तुमच्या मते, स्वप्न आणि वास्तव यांच्यामध्ये अडथळा बनलेल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या?
श्रीमाताजी : १) अज्ञान २) भीती ३) मिथ्यत्व, खोटेपणा

साधक : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने आजवर जी एकंदर प्रगती केली आहे त्याबाबत तुम्ही समाधानी आहात का?
श्रीमाताजी : नाही.

साधक : अलीकडच्या काळातील सर्वात मोठी लक्षणीय उपलब्धी कोणती? तुम्हाला ती एवढी महत्त्वाची का वाटते?
श्रीमाताजी : सत्याविषयीची आस जागृत झाली. ही बाब महत्त्वाची वाटते कारण सत्याशिवाय वास्तवच नाही.

साधक : सर्वात दु:खदायक अपयश म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टीकडे निर्देश कराल? आणि ती तुम्हाला सर्वात दु:खद का वाटते?
श्रीमाताजी : अप्रामाणिकपणा. कारण तो विध्वंसाकडे नेतो.

  • श्रीमाताजी (CWM 13 : 358-359)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.**

India’s Life-Mission – 31

26.01.1964

  1. Sadhak : If you were asked to sum up, just in one sentence, your vision of India, what would be your answer?
    The Mother : India’s true destiny is to be the Guru of the world.
  2. Similarly, if you were asked to comment on the reality as you see it, how would you do so in one sentence?
    The Mother : The present reality is a big falsehood — hiding an eternal truth.
  3. What, according to you, are the three main barriers that stand between the vision and the reality?
    The Mother : (a) Ignorance; (b) fear; (c) falsehood.
  4. Are you satisfied with the over-all progress India has made since Independence?
    The Mother : No.
  5. What is our most outstanding achievement in recent times? Why do you consider it so important?
    The Mother : Waking up of the yearning for Truth. Because without Truth there is no reality.
  6. Likewise, can you name our saddest failure? On what grounds do you regard it as so tragic?
    The Mother : Insincerity. Because insincerity leads to ruin.
  • The Mother (CWM 13 : 358-359)

Do visit and subscribe to our website auromarathi.org and YouTube channel AUROMARATHI.


संपूर्ण समर्पण !

यावर आपले मत नोंदवा