विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

सांग सांग भोलानाथ

•| ॐ |•

कृष्ण संदेश

‘एकला चालो रे SSS’ या प्रवासामध्ये विविध कळा स्वभावतः विकसित होतात. एकेक पाकळी उमलत जाते आणि आयुष्याचा सोहळा होतो.

जय श्रीकृष्ण!

उंबरठ्याने घर खाऊ नये !

पूर्वीच्या काळात प्रत्येक घराला घरातल्या प्रत्येक खोलीला ‘उंबरठा’ असायचा. उंबरठा म्हणजे मर्यादा. भौतिक पातळीवर हा ‘उंबरठा’ खोलीची, घराची मर्यादा निश्चित करत होता. तर त्याच्या नात्यातील अर्थांमध्ये पाहिलं की आपल्याला लक्षात येतं ; प्रत्येक नात्याचा एक ‘उंबरठा’ असतो तो उंबरठा जपला – जोपासला तरच घराची मान मर्यादा राहते.
नात्याचा हा उंबरठा केवळ मर्यादाच नाही तर प्रत्येक माणसाला त्या नात्याने त्याचा असलेला ‘धर्म’ काय आहे हे देखील सांगतो. हा धर्म काय धरावं काय सोडावं, काय करावं काय टाळावं याचं आपसूक ज्ञान देतो. प्रत्येक नातं असं स्पष्टतेमध्ये राहीलं म्हणजे कोणत्याही प्रकारचा कौटुंबिक अनाचार निर्माण होत नाही , कोणावरही अत्याचार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
दुर्दैवाने आजच्या समाजामध्ये कौटुंबिक अत्याचार हा फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. त्याचे रूप – स्वरूप प्रत्येक नात्यागणिक वेगळे आहे. नात्यांचा उंबरठा जोपासला तर कर्तव्य करत, स्वधर्म सांभाळत आपण समाजाचा पाया भक्कम करू शकतो. मानवी समाजाच्या विकासासाठी घरापासून , घरातल्या घरात बसून, स्वतःमध्ये डोकावून, आत्मपरीक्षण करून, अन्यांचे निरीक्षण करून, संवेदनशील होऊयात का?

श्रीकृष्णार्पणमस्तु!


प्रिय भाईजी,

आज घरून निघताना गंमतच झाली. मला काही लवकर गाडी बाहेर काढता येईना. मनात आलं – कोणीतरी मदतीला आलं पाहिजे गड्या. इतक्यात एक पिटुकलं पिवळं फुलपाखरू माझ्या बाजूनं वाऱ्यावर आनंदाने लहरत गेलं. त्याला पाहता पाहता गाडी केव्हा बाहेर निघाली मलाच माझं कळलं नाही. महाविद्यालयाच्या जसजशी जवळ येत गेले तशी माझ्या मनानं तुम्हाला कडकडून मिठी मारली. त्यामुळे आज आल्या आल्याच तुम्हाला भेटायला आले. तर इथल्या बागेत मोठे पिवळं फुलपाखरू आनंदाने लहरत होतं. मन पुन्हा प्रसन्न झालं. तुमच्याजवळ रेंगाळलं. ती मिठी सुखाची होती की आनंदाची हे मात्र अजून कळलं नाही.

श्रीकृष्णार्पणमस्तु!


मी म्हणलं ,
मज सोसवेना आघात
की माझा कृष्ण आला मेघात!


शिवजी प्रणाम !

आज काय झालं माहिती आहे का , मी भाईजीना भेटून परत येत होते. तेंव्हा आमचे एक कर्मचारी भेटले. त्यांनी मला विचारले, ” मॅडम आपल्या सुट्ट्यांचे काय ?” खरे म्हणजे माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. मात्र त्यांचा अतिचिंतीत चेहरा पाहून मी त्याविषयी त्यांच्याशी जुजबी काहीतरी बोलले. निघावा काहीतरी मार्ग, आवश्यक आहे, असे सांगितले. पण शिवजी , खरे सांगू हक्काची सुट्टी नाही मिळाली तर लहान मुलांच्या चेहेऱ्यावर कशी एक नको वाटणारी उदासी दिसतेना ; तसा दिसलाहो मला त्यांचा चेहेरा. जीव गलबलला बघा. साहजिकच मग तुमची आठवण आली ,

” सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?”

सांगा ना भोलानाथ ……

श्रीकृष्णार्पणमस्तु!





ॐ नमः शिवाय !

•| ॐ |•

माझा पांडुरंग
मज करी दंग
त्याच्या सवे आता
गाईल अभंग
उभा तो माझ्यासवे
होऊन श्रीरंग
आयुष्यात रोज नवा
भरे एक रंग
माझा तो ईश्वर
माझा सर्वेश्वर
पावतो गे मला
तो वेगे येऊन सत्वर !

श्रीकृष्णार्पणमस्तु!


यावर आपले मत नोंदवा