विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

माऊली

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी – कवी यशवंत

तुझं असण हाच मुहूर्त, दुसरा अर्थ आहे कोठे ?

थकले गं आई आता.

संपूर्ण समर्पण !


•| ॐ |•

तुझ्या पायी मी
जन्म वाहिला देवा
सखा आता माझा
पांडुरंग व्हावा

जन्मोजन्मी देवा
हाच माझा धावा
मज देव हवा
मज देव हवा !

देव माझा देवा
क्षणभर उभा राहतो
सभोवती पाहतो
कृपा वाहवतो….

दिव्य त्या कृपेत
न्हाऊत आता सारे
इथे वाहती हो
पवित्र मंगल वारे !

संपूर्ण समर्पण मॉं !


•| ॐ |•
ही विशाल छाया काढून घेते माया | सांगते जीवनसत्त्व ओतते विधातातत्त्व
संपूर्ण समर्पण!

सीमोल्लंघन

पितामह भीष्म,
अजून किती सभांमध्ये गप्प बसताल ‘अर्थस्य पुरुषो दास:’, असं म्हणून
सत्ता आणि संपत्तीला भजताल ?
माफ करा ,
प्रश्नचिन्ह तुमच्या नीतिमत्तेवर नाही
ते आहे तुमच्या अव्यक्त भूमिकेवर !

सांगून ठेवतो साऱ्या सभांना
आता पाहू नये परीक्षा कोणी
द्रौपदीच्या संयमाची
आणि रामाच्या सीतेची
ती आहे आदिशक्ती-आदिमाता
तिने घेतले शस्त्र हाती आता
ती तक्रार नाही, करेल शासन
तिच्यासाठी समान आहेत
रावण, महिषासुर आणि दु:शासन

ती मर्यादांच्या सीमेत राहते
म्हणून तुमचं बरं चाललंय
तिला आव्हान देऊन
निमंत्रण देऊ नका संकटांना
ती जेंव्हा जेंव्हा सीमा उल्लंघते
तेव्हा माजतो सर्वत्र हाहाकार
नाश होतो दुष्टांचा, असत्याचा
आणि मांगल्य होते साकार!

वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु!


•| ॐ |•

आज उठायला जरा उशीरच झाला. थेट साडेपाच वाजता जाग आली. त्यामुळे स्वाभाविकच फिरायला निघण्यासाठीही उशीर झाला.
वाटेत चालताना रोजचं एक लिंबाचे झाड दिसलं. मी आश्चर्याने त्याच्याकडे पहातच राहिले. कारण त्या झाडाच्या प्रत्येक फांदीच्या शेंड्याला मला सुदर्शन चक्रासारखा आकार दिसत होता. मी अचंबित झाले.
त्या दर्शनाने मला कालची गोष्ट आठवली. काल मी देवासमोर दिवे लावत होते. खरं म्हणजे तुपाच्या दिव्यात मी रोज दोन फुलवाती एकत्र करून लावते. काल मात्र एकच लावली. ‘एकला चालो रे’ हा विचार मनात आला आणि काळजात चर्र झालं. त्याच वेळेस तेलाच्या दिव्याची वात मात्र रोजच्यापेक्षा अधिक तेजस्वी आणि आनंदी दिसत होती. मी म्हणलं का गं बाई, ” कसला एवढा आनंद झाला आहे तुला?”
ती मला म्हणाली, ” वेडीच आहेस. तुझ्या लक्षात आलं नाही.”
मी विचारलं ,”काय ते ?”
“अगं बाई, शिव आणि शक्ती एकरूप झालेत.”
“कसे?”
“हे बघ, तू एकच वात लावलीस. तिला आज कुंकूही लावलं नाहीस. आणि न ओवाळताच मनातल्या मनामध्ये मात्र ‘सत्य सुंदर मंगलाची…’ ही तुझी प्रार्थना केलीस.”
किती बरं वाटलं मला, आपलं मन इतकं स्वच्छ आणि पारदर्शकपणे कोणालातरी कळतं!
मी तिचं बोलणं अधिकच लक्ष देऊन ऐकू लागले. तिने बोलावं म्हणून मी म्हणलं, “खरं आहे, पण मग पुढे?”
ती गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, ” अगं ती विठ्ठल वात आहे. त्यात आज रुक्मिणी एकरूप झाली आहे. तिचं वेगळं अस्तित्व राहीलंच नाही बघ.”
मी रोजच्यापेक्षा अधिकच मनोभावे देवाला नमस्कार केला आणि बाजूला झाले.
…… आज सकाळी लिंबाच्या झाडाला एवढे सुदर्शन चक्र दिसल्यानंतर मला सहाजिकच कालचं तेलाच्या वातीच सारं बोलणं आठवलं. मन मागे गेल्यामुळे मी देखील क्षणभर मागे वळून पाहिलं. तर आज सूर्य उगवून आलेला होता. रोज त्याची आभा मला आधी दिसते. आज मात्र आदित्य नारायणाचे दर्शनच घडले. त्याला मनोभावे वंदन करत मी माझ्या वाटेने पुन्हा चालू लागले.

श्रीकृष्णार्पणमस्तु!


यावर आपले मत नोंदवा