विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

अद्वैत

🪷 सुप्रभात ! 🪷
🕉️
श्रीगणेशाची आराधना म्हणजेच सर्व देवांची आराधना. कारण सृष्टी निर्माते ब्रह्मा, पालनकर्ते विष्णु, संहार कर्ते महेश, विश्वमित्र सूर्य, मनाचं नियंत्रण करणारी मोहरूपी आदिशक्ती, हे पाचही ब्रह्मरूप ईश्वर म्हणजे गण.
या गणाचा पती म्हणजेच नेता. गणपती.

•| ॐ |•

शिल्पकार

नसलो जरी मी मूर्तिकार
कळला मला घडता शिल्पकार !

कळले मला छन्नी हातोडा
हवे तेव्हा जोडा हवे तेवढेच तोडा !

पाहता मूर्ती दिसे गणपती,
विठ्ठल रुक्माई, कधी शिवशक्ती !

नि:संग कृष्ण जरी आनंद आकंठ
जग उद्धाराया शिव होई नीलकंठ !

वृंदा आशय


नाहीं ते चित्र दाविती । परि असे केवळ भिंती। प्रकाशे ते संवित्ति । जगदाकारें ।।१३।।
(चांगदेव पासष्टी – संत ज्ञानेश्वर)

नाही नाही ती चित्रे चित्रकार समोरल्या भिंतीवर चितारतो. अनेक प्रकारची उत्तमोत्तम चित्रे तो सुंदर रंगवतो. आपण ती चित्रे पाहतो. त्या चित्रांचे कौतुकसुद्धा करतो. परंतु ती सर्व चित्रे दृष्टीने अनुभवल्यावर शेवटी काय लक्षात राहते तर ज्यावर ही चित्रे रेखाटली ती समोरली भिंत… कारण चित्रे उद्या पुसली जातील, परंतु भिंत मात्र निश्चित राहील. कदाचित त्या भिंतीवर नवी चित्रे काढली जातील. परंतु भिंतच लक्षात राहील. कारण ती चित्रे शेवटी भिंतच सांभाळते आहे. ज्याप्रमाणे ती भिंतच आपल्याला प्रतीत होते. त्याप्रमाणे ह्या विश्वआकारातून आपण परमात्माच अनुभवतो. जगाच्या आकारात प्रकाशणारे हे परमेश्वराचे केवलज्ञानच आहे. म्हणजे काय? तर ह्या विश्वात जेवढे जेवढे म्हणून आकार आहेत, ते भिन्न भिन्न जरी जाणवले तरी या विश्वाकारात ती संवित्तीच म्हणजे केवलज्ञानच प्रकाशित झाले आहे.

संदर्भ ग्रंथ – सार्थ अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी – श्री. वामन देशपांडे


•| ॐ |•
सावळ्याची सावली !


माध्यान्हीचं ऊनही होऊन येतं स्वप्नील
तेव्हा मन माझं होतं जातं घननीळ

ती झाडं त्या सावल्या
ती हिरवाई तो गारवा
आपसूक मन माझं
होत जातं मारवा

वाहत येतो घुटमळणारा
तो थोडा धसमुसळणारा
मनी बहरलेला मंदधुंद समीर
विश्वासतो छेदेल मी तिमिर

दिसता खळी माझ्या गाली
समजतो तो फुलणार कळी!
हाकारे मज माझी आई काळी
ये गं झरकन् सावळ्याची सावळी !

श्रीकृष्णार्पणमस्तु

•| ॐ |•

अद्वैत

आज पहाटेच वाटले करावे स्नान

लावावा दिवा अन् गावे तुझे गुणगान

जागवले रे देवा तू अद्वैताचे भान !

https://www.facebook.com/share/p/1J9mxrBMWj

 काय शिव काय शक्ती 
 एक करते दोघा भक्ती 

 काय भक्त काय अभक्त 
 दोघातून वाहते लाल रक्त 

 काय एक काय दोन 
 काय वाणी काय मौन

 काय पृथ्वी काय आकाश 
 उजळवतो त्यांना एक प्रकाश 

 देवाला जाणता जाणता 
 माणसा चाल रे सावकाश!

        संपूर्ण समर्पण!
     श्रीकृष्णार्पणमस्तु!

अद्वैत !

भक्त होऊ नये दुःखी
म्हणून घेतोस किती कष्ट
अभक्तालाही येतो
प्रत्यय तुझा स्पष्ट !

तुला समर्पित होताच
मिटतात सारे भेद
कृष्णा, तुझ्या स्पर्शाने
साऱ्याच द्वैतांना जातो छेद!

वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु!


संपूर्ण समर्पण !

श्रीकृष्णार्पणमस्तु!

यावर आपले मत नोंदवा