स्त्री ही सृजनात्मक, संवर्धनात्मक, संरचनात्मक कार्याचे प्रतिरूप आहे.
त्या शिवाच्या शक्तीला विध्वंसात्मक होण्यास समाजाने भाग पाडू नये.

शक्तिर्हि शक्त्या शक्येत शक्तिज्ञः शक्तितत्त्ववित्।
शक्तौ स्थितं जगत्सर्वं शक्तिर्देव्याः प्रकीर्तिता॥
इस संसार में कोई भी कार्य केवल शक्ति के द्वारा ही संभव हो सकता है। जो व्यक्ति इस रहस्य को समझता है, वही वास्तव में ज्ञानी और शक्ति के तत्व को जानने वाला है। यह संपूर्ण ब्रह्मांड शक्ति के भीतर ही स्थित (टिका हुआ) है, और वह परम शक्ति ही साक्षात् ‘देवी’ (आदिशक्ति) कही गई हैं।
•| ॐ |•
मातृशक्ती
अभ्यासात मुली पुढे. घर सांभाळणे गृहिणीचे कर्तव्य. बाहेरच्या कामांमध्ये महिलांचा सहभाग आणि जबाबदारी अधिक. कीर्तन प्रवचनाला महिलांची गर्दी जास्त. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात, समाजातील प्रत्येक स्तरात आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्री चैतन्यशील असते. तरीही निर्णयप्रक्रियेत पुरूषांनाच स्थान! का?
पुरूष ‘माऊली’ होतो तेव्हा संत ज्ञानदेव घडतात, तो पराक्रमी होतो तेव्हा शिवाजी महाराज घडतात, तो संवेदनशील व करूणामयी होतो तेव्हा गौतम बुद्ध घडतात.
दैनंदिन जीवनात आमच्या बंधूंना नक्की होतं काय?
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!

•| ॐ |•
कर्पुरासम जीवन व्हावे
देवा मी रे पावन व्हावे !
आहे तोवर शुभ्रच असावे
नाही तेव्हा तुझ्यात विसावावे
का जळतो तो क्षणात कापूर
वाहवतो का तो भक्तीचा पूर?
सुफळ होऊन पूजा आरती
मग ओवाळू दे कापूर वाती
पतंगापरी गात्रं सारी झेपावती
देवा,मिटू दे क्षणात सारी भ्रांती!
संपूर्ण समर्पण!
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!
तिची रजा
अरे वा ! तिने घेतली की रजा
देवांनाही वाटली मजा
म्हणाला कोपऱ्यातला कृष्ण
चला सुटला आजचा प्रश्न !
एरवी कशी ती,
पटपट आंघोळ घालते
मंत्र पुटपुटते; दूध शिंपडते
काहीतरी सांगते,काहीतरी मागते
आज जरा निवांत बसेल
आपलंही थोडं कुशल पुसेल !
अगं, आण जरा गरम पाणी
आई, थोडंसं देना लोणी
बाहेर बघ आलंय कोणी
अपॉइंटमेंट घेतेस फोननी?
अगं, दवाखान्यात चलतेस ना
आधी धुणे – भांडे टाकतेस ना !
तिच्या अस्तित्वानं …
आजारी घरही फुललं
हवं नको ते मागू लागलं
घरातला पाहून पसारा
खुदकन हसला कोपरा
बाईनेही घेतली वाटतं सुट्टी
आता घेते आपल्याशीच कट्टी
कोपऱ्याकडे जाताच लक्ष
म्हणाली…
अय्यो ! झाला घोळ …
माझीच अजून राहिली आंघोळ
घर सारं तृप्त न्हात
म्हणालं,
कृष्णा, उगाच बसलास
पाहात वाट !
तिचा खरा देव आहे रे माणसात !
तोवर लेकीने सावरलेली पूजापात्र म्हणाली, आपण सारी निमित्तमात्र !
रसरशीत हातांनी सजणारा देव्हारा
मंत्रघोष करत होता…
बाई असते घराचं घरपण
मुलगी निभावते भावी आईपण !
वृंदा आशय
आत्मभान
गृहीत धरली जाते ती गृहिणी,
जिने गृहीत धरायचं नसतं,
ती गृहिणी !
घराचं जिच्यावर स्वामित्व असतं,
ती गृहस्वामिनी !
कशाला करायचा
असा नकारात्मक विचार?
प्रिय गृहिणी,
तूच तुझ्या कुटुंबाचा आधार !
तू सारं संचित साठवायचं;
तुझ्या शुभलक्षणी,
सृजनशील हातांनी
तू भविष्य पेरायचं !
आणि तुलाच ठाऊक
कसं सा-यांना कामाला लावायचं !
तुझं रूप मातेचं
तुला वरदान मातीचं
तू सृजन करतेस सु-जनांचं
तू भविष्य घडवतेस जगाचं !
थोडं अंत:रंगात बघ
नवदुर्गेची तुझ्यात शक्ती !
आकाशाचे पंख देऊन
तूच घडवतेस
उंबरठ्यावरची भक्ती !
तू विस्तारतेस स्वतःला
आणि घेतेस घराला
तुझ्या पंखांखाली
तुझ्या कर्तृत्वामुळेच
शब्द सार्थकी लागतो ‘माऊली’!
कोणत्याही काळात
घर कसं चालवायचं
तुलाच ठाऊक !
तुझ्याशिवाय हलत नाही
घराचं पान;
तुझ्यामुळेच सा-यांचा
होतो मान – सन्मान!
प्रिय गृहिणी,
जागू दे तुझं आत्मभान !
वृंदा आशय

काळयाकुट्ट आकाशातही
दिसतोच ना पांढरा ढग !
भारतीय घरांइतकीच
पक्की आहेत
भारतीय कार्यालयं
कारण
तिथं बाई वावरते
आई होऊन !
वृंदा आशय


प्रिय सखी / प्रिय गृहलक्ष्मी / प्रिय गृहिणी,
तुझ्यावरची संक्रांत ( कोणतेही संकट) फक्त तूच टाळू शकतेस
प्रत्येक ‘भारतीय स्त्री’ ला हार्दिक शुभेच्छा स्वत:ला तीळ-गुळ देण्यासाठी, स्वत:शी गोड बोलण्यासाठी, आत्मसन्मान राखण्यासाठी ! घरी-दारी ‘भारतीय स्त्री’ ला अव्हेरणा-या समाजाला धडा शिकवण्यासाठी!
तुझं शस्त्र हेच शास्त्र !
विसरू नकोस तू आहेस सत्यवानाला जीवदान देणारी सावित्री, त्रिदेवांना धडा शिकवणारी माता अनसुया !
अहल्या द्रौपदी कुन्ती तारा मन्दोदरी तथा।
पञ्चकन्या: स्मरेन्नित्यं महापातकनाशिनी:॥
संस्कृतीतील या पंचकन्या आठवायच्या त्यांच्या कर्तृत्वासाठी. अहिल्येने स्वतःची चूक उमगताच प्रायाश्चित्त घेतले. द्रौपदीने, ‘पुरुषो अर्थस्य दास:’ हे सिद्ध केले. कुंतीने दु:खालाही आश्रय दिला. तारा आणि मंदोदरीच्या ‘स्त्री सत्त्वावर’त्यांचे रूढार्थाने दुष्ट ठरलेले पती तारले गेले.
(“अर्थस्य पुरुषो दासो दासस्त्वर्थो न कस्यचित्। इति सत्यं महाराज बद्धोऽस्म्यर्थेन कौरवैः॥”
इसका अर्थ:
पुरुषो अर्थस्य दासः (Purusho arthasya dasah): मनुष्य (पुरुष) धन या भौतिक सुखों (अर्थ) का गुलाम (दास) होता है. धन / लक्ष्मी किसी की दास नहीं होती है!)
आत्मसन्मानातून येणारा आत्मविश्वास हाच तुझ्या जगण्याचा मूलमंत्र आहे.
तिळगुळाच्या स्नेहानं तू कुटुंब सांभाळतेस, बांधून ठेवतेस चेष्टा नाही ही!
भारत माता प्रत्येक ‘स्री’ ला हा संदेश देत आहे. तिचं खरं रूप – स्वरूप दाखवत आहे. प्रश्न इतकाच आहे, आम्ही जाग्या होणार की नाही?
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदल विहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलाम्
सुजलां सुफलां मातरम्॥
वंदे मातरम्!
तुम ही दस अस्त्र धारण की हुई दुर्गा हो। तुम ही कमल पर आसीन लक्ष्मी हो। तुम वाणी एवं विद्या देने वाली (सरस्वती) हो, तुम्हें मेरा प्रणाम है। तुम धन देने वाली हो, तुम अति पवित्र हो, तुम्हारी कोई तुलना नहीं हो सकती है, तुम जल देने वाली हो, तुम फल देने वाली हो। मां तुम्हें मेरा प्रणाम है।
वृंदा आशय
•|ॐ|•
प्रिय सूर्या,
माझ्या राम वाटेवर
तू भेटलास मला
लिंबासोबतच्या पारंब्यातून
आणि भर माध्यान्हीही
माझं अनवाणी मन
चालत गेलं गारव्यातून
तुझं अंकुरणं, रूजणं
बहरत जाणं आणि राहणं
अनंतहस्ते तू व्यक्त करतो
शक्यता रूजण्याच्या
मग तू मला दिसशीलचना
मुक्तहस्ते आशीष देणारा कृष्ण!
सावित्रीचं वडाला फार मोठं देणं
मला माहीत नाही रे खरंच
तिनं वडाला दिलं की वडानं तिला
पण अजरामर केलं त्यांनी परस्परांना
त्यासाठी सत्यवान मात्र मरणासन्न झाला
सत्याचं नेहमीच असं होतं का रे, सूर्या?
वृंदा आशय
संपूर्ण समर्पण!
•| ॐ |•
ज्ञानं ज्ञानेन ज्ञेयं स्याज्ज्ञानज्ञो ज्ञानतत्त्ववित्।
ज्ञानेनैव जगद्भाति ज्ञानं मोक्षस्य कारणम्॥
ज्ञान का वास्तविक स्वरूप ज्ञान के द्वारा ही समझा जा सकता है। जो व्यक्ति ज्ञान के तत्त्व को जानता है, वही सच्चा ज्ञानी है। ज्ञान के प्रकाश से ही यह सम्पूर्ण संसार समझ में आता है और अन्ततः यही ज्ञान मोक्ष (मुक्ति) का कारण बनता है।
यावर आपले मत नोंदवा