विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

मुलाफुलांचे पान _ साने गुरुजी विशेष

जाणा साने जगा सुखाने _ वृंदा आशय


पांडुरंग सदाशिव साने
जन्म २४ डिसेंबर१८९९ मृत्यू – ११ जून १९५०


मुलांवर साने गुरुजींची अपरंपार माया. मुलांमध्ये ते फुलत-खुलत. आपल्याजवळ जे जे काही सर्वोत्कृष्ट ते ते या मुलांसाठीच, अशी त्यांची भावना असे. त्यांचे समयवयस्क, त्यांचा स्नेह लाभावा म्हणून झुरत, पण गुरुजींच्या मनाच्या पाकळ्या उमलवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नसे. ‘मुले म्हणजे देव’ मुले म्हणजे राष्ट्राची मोलाची ठेव’ असे साने गुरुजींना वाटे. प्रभूशी आपला संबंध जोडणारा हा एक दुवा आहे. अशी त्यांची भावना होती. मुलांची बुद्धी प्रखर आणि मने कोवळी असादी यासाठी ते लिहीत. मुले हा त्यांच्या साहित्याचा वाचकवर्ग. त्या मुलांना समोर कल्पूनच ते सारे लिहीत, बोलत. वात्सल्यात ओला होऊन प्रत्येक शब्द त्यांच्या लेखणीतून उमटे. ते म्हणत,

‘करी मनोरंजन जो मुलांचे, जंडेल नाते प्रभुशी तयाचे’

यदुनाथ थत्ते


“आकाशाचे प्रतिबिंब सर्वत्र पाण्यात पडलेले असते, परंतु निर्मळ पाण्यात ते स्पष्ट दिसते; त्याप्रमाणे परमेश्वराचे प्रतिबिंब निर्मळ पाण्यात ते स्पष्ट दिसते; त्याप्रमाणे परमेश्वराचे प्रतिबिंब निर्मळ हृदयात स्वच्छ पडलेले दिसून येते. शबरी, आपले मन आपण घासून घासून इतके स्वच्छ करावे की, परमेश्वराच पवित्र प्रतिबिंब येथे पडावे व त्याचे तेज आपल्या डोळ्यांवाटे, वाणीवाटे, आपल्या प्रत्येक हालचालीत बाहेर पडावे. आपण आपले मन व बुद्धी ही घासून स्वच्छ करीत असतानाच इतरांच्याही हृदयाला स्वच्छ करण्याचा आपण प्रयत्न करावा. शबरी, तू तपस्विनी आहेस, तू आपले हृदय पवित्र केले आहेस. तू तुझ्या जातीतील स्त्री पुरुषांची मनेही निर्मळ व प्रेमळ व्हावीत म्हणून प्रयत्न केले पाहिजेस. स्वतःचे खरे हित साधून परहितार्थ म्हणून सततोद्योग करीत राहणे, हे विचारशील मानवाचे जीवितकार्य आहे.” (शबरी , पृष्ठ (पान) क्र. २१)









यावर आपले मत नोंदवा