विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

द्वादशीच्या निमित्ताने !

पतितपावना तू मनभावना, तुजविण मज गमेना !

https://www.facebook.com/share/p/1HoBEuTfqS

ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही कार्ये आहेत… पण त्या कार्यांपूर्वी जे शांत, अदृश्य, सर्वव्यापी चैतन्य आहे… कदाचित त्यालाच गुप्त रुप अर्थात गुरु म्हणत असावेत. सर्व अवतार जणू त्या एका गुरुतत्त्वाच्या विविध अभिव्यक्ती आहेत.


•| ॐ |•

आनंदे पूजीन
ब्रह्मज्ञान
प्रश्न जे निर्मे
मी कोण ?

मी कोणी नाही
शून्य निराकार
शिवकृपे झाले
सगुण साकार!

त्याच्याच कृपे
त्याचीच आस
व्हावे त्याचे
सोडुनी विलास!

श्रीकृष्णार्पणमस्तु!


•| ॐ |•

नित्य निरंतर घेता नाम
अंतरी प्रकटे श्रीराम!
कानी सांगे मधुर वारा
हाच आहे तो निवारा

म्हणे स्वामी हेच धाम
जेथे कृष्णनाम वसले
शोधू नकोस येथे तेथे
प्रेमे तव अंतर फुलले

वसतो गं मी फुलामुलात
सा-या राबणाऱ्या हातात
होऊन त्यांची दाट सावली
धन्य हो तू आता माऊली !

श्रीकृष्णार्पणमस्तु!



https://www.aathavanitli-gani.com/Song/Pandurang_Kanti_Divya_Tej


शब्देविण संवादू !

।ॐ।

तू मजला दाखवले
रे देवा गाव तुझे
शब्दांच्या पलीकडले
त्या गावाला जाईन मी
गीत तुझे गाईन मी

मौनाच्या त्या गावी देवा
गवसे रे अमूल्य ठेवा
ती अगाध शांती …
क्षणात मिटवे सारी भ्रांती !
कसला उद्रेक कसली क्रांती?

तुजविण तेथे कोणी नाही
तूच तुला रे पाहात राही
पाहता पाहता तुला मीही
मुळीच माझी उरत नाही
बोलावे मग कसे काही?

होत जाते धुसर मौनाचीही रेषा
बदलून टाके जी आत्म्याच्या वेशा
कसे जाऊ कुठून जाऊ कुठे येऊ
देवा तू तर वसशी माझ्या अंतर्यामी
दर्शन देऊन तृप्त करतो स्वामी!

श्रीकृष्णार्पणमस्तु!

https://vrunda-deshpande-joshi-prasangik.blogspot.com/2026/06/blog-post_07.html



….नुरे काही!

https://vrunda-deshpande-joshi-prasangik.blogspot.com/2026/06/blog-post_12.html


•| ॐ |•

शब्दवेध

‘गंगाजळ’ व ‘गंगाजळी’
(जळ – जल – पाणी या अर्थी)

आज कमला एकादशीचा उपवास आहे. त्यामुळे द्वादशीला देवाला काय नैवेद्य याची आम्हा सासू – सुनांची चर्चा सुरू होती. आई म्हणाल्या, “अधिकातली एकादशी आहे. तर उद्या पुरणाच्या धोंड्यांचा नैवेद्य दाखवू.” मी आपलं नेहमीप्रमाणे हो म्हणलं. बोलता बोलता त्या म्हणाल्या फक्त जरा पाण्याचं वाटतं. सोवळं सांभाळलं जात नाही. मी भर्रकन म्हणाले, “अहो आई गंगाजल टाकूयात त्यात थोडे. … आणि तेही नसलं तर आपलं मन ओतूयात थोडंसं.” मी आपसूक बोलून गेले. या बोलण्याने मला थेट नेलं ते संत मुक्ताबाईंकडे, त्यांच्या ‘ताटीच्या अभंगां’कडे –

गंगाजळ हृदय करा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा !

मी आईंना म्हणलं, ” आई, संत मुक्ताबाईंच्या वेळेला गंगा किती शुद्ध असेल नाही! त्या संत ज्ञानदेवांना हृदय ‘गंगाजळा’सारखं निर्मल करा असं सांगत आहेत!” मग आईंनी नैमिषारण्यातील ‘गोमती’ कशी स्वच्छ आणि शुद्ध आहे हे सांगितलं. मी आपलं मनातल्या मनात म्हणून घेतलं, तिचं नावच तिच्या शुद्धतेची साक्ष देत आहे.
एकीकडे मी विचार करत होते तो मानवी जीवनाच्या प्रवासाचा. बाराव्या तेराव्या शतकातून एकविसाव्या शतकात आपण आलेलो आहोत. प्रगतीच्या नावाखाली दिमाखाने वावरत आहोत. माझ्या दृष्टीने हा प्रवास म्हणजे त्या काळात निसर्गतः गंगा विलक्षण शुद्ध होती आणि आता आम्हाला गंगा शुद्ध करण्यासाठी आवर्जून अभियानं राबवावी लागतात, चळवळी कराव्या लागतात. नदीचे, वृक्षांचे महत्त्व सांगावे लागते. जीवनाची ही गती माझी मती गुंग करते.
असं का झालं असावं, याचा मी विचार करत होते. तेव्हा ‘गंगाजळी’ हा शब्द समोर आला. खरं म्हणजे बोलीभाषेनुसार ‘गंगाजळी’ म्हणजे बचत केलेले, शिल्लक असलेले पैसे. पोटाला चिमटा काढत, आवडीनिवडींना बाजूला सारत, काटकसर करत पै पै जोडून मागे टाकलेली शिल्लक म्हणजे ‘गंगाजळी’. खूप आवडला मला हा शब्द. गंगेइतकाच पवित्र, पावनभाव मला या ‘लक्ष्मी’मध्ये सापडला. त्याबरोबर ‘उदास विचारे वेच करी’ हे सांगणारे संत तुकाराम देखील आठवले.
संत तुकोबा आठवले आणि डोक्यात प्रकाश पडला, पैसे कालही गरजेचे होते, आजही गरजेचे आहेत आणि उद्याही गरजेचेच राहणार. पैशांचं सोंग घेता येत नाही हेच खरं. मात्र ‘उदास विचारे’ या संकल्पनेमध्ये जी ‘अलिप्तता’ अपेक्षित आहे ती संपुष्टात आल्याने सगळी गडबड, गोंधळ निर्माण झालेला आहे. एकदा माणूस लिप्ततेमध्ये अडकला की ‘हवं’ याचं रूपांतर ‘हाव’ मध्ये होते. लक्ष्मीप्रतीचा मनातला भाव बदलला की बेभान होऊन आम्ही सगळं काही बेभाव विकायला काढतो. लक्ष्मीच्या हव्यासामध्ये आपण सरस्वतीच विकायला काढली आहे ; हे आपल्या लक्षातही येत नाही. त्या दोघींना सांभाळणारा ‘नारायण’ मात्र अखंड सजग असतो. या लिप्ततेने, या मायेने ; ते मूळ परब्रह्म जराही डगमगत नाही.
दाटून आलेला अंधार सर्वत्र दहशत पसरवायला लागतो. अंधार इतका घनदाट असतो की माया परब्रह्म वाटायला लागते. शिवशक्तीच्या या रूपाला मात्र ठाऊक असतं ; पडदा किती वेळ ठेवायचा आणि कधी काढून घ्यायचा? पडदा वर उचलला गेला की परब्रह्माच्या दर्शनाने अखिल विश्व उजळून निघते. आता वाट फक्त त्याचीच…

श्रीकृष्णार्पणमस्तु!



संपूर्ण समर्पण !

यावर आपले मत नोंदवा