विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

स्मरण _पराक्रमाचे, जाणत्या राजाचे !

शिव जयंती – दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ , संपादक वृंदा आशय

जनहितार्थ ७ – ज्ञानोत्सवतर्फे शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन आणि त्यांची शिकवण आचरणात आणणाऱ्या सामान्य जनांना मनोभावे वंदन !

https://www.facebook.com/share/r/1Abr7RsBTU

माय माऊली तुळजाभवानी !

सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन दिनांक १९ फेब्रुवारी



बाल राजवीरचा पोवाडा


आई जगदंबेच्या कृपेने घराघरात शिवाजी जन्मावा , प्रत्येक जिजाऊने पराक्रमाचा ठेवा घडवावा !

https://www.facebook.com/share/176Cb7PSjL/

अंदमान ! जगाच्या दृष्टीने देखणी पाचूची बेटं, पण आमच्यासाठी क्रांतीतीर्थ ! – पार्थ बावस्कर


शिवजयंतीच्या निमित्ताने…
छत्रपती शिवराय :एक चिंतन

✍️ डॉ.ज्ञानेश्वर थोरात

मी महात्मा गांधी विद्यालय, मंचर येथे इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होतो.वर्गशिक्षक होते परम आदरणीय श्री बी.आर.नलगेसर.
त्यांचा अध्यापनाचा विषय होता इंग्लिश.विषय अवघड परंतु त्यांची अध्यापन पद्धती अतिशय सुलभ होती.त्यांनी शिकवला विषय विस्मृतीत कधीच गेला नाही .
इयत्ता दहावीच्या इंग्लिश विषयाच्या पाठ्यपुस्तकात एक पाठ होता – Shivaji ,The Great. आणि ह्या पाठात एक वाक्य होतं, The Nation is born when it becomes aware of its own existence.
अध्यापनाचा एक भाग म्हणून आदरणीय सर प्रकट वाचन करत होते आणि त्यांच्या सुचनेनुसार आम्ही पुस्तकात डोके घालून सर कसे वाचतात , कोणत्या इंग्लिश शब्दांचा कसा शुद्ध उच्चार करतात ; ह्याचे त्यांच्या वाचनासोबत पाठ्यपुस्तकातील ओळी ओळींवर बोट फिरवत आकलन करत होता.आमचे लक्ष आहे की नाही ; हे पडताळून पहाण्यासाठी ते मध्येच थांबत आणि आमच्यापैकी कोणालातरी उभे करून जेथे वाचन आलं आहे , त्याच्या पूर्वीची वाक्यं वाचायला सांगत .
उपरोक्त इंग्लिश वाक्य वाचून झाले आणि ते थांबले.आम्हाला उद्देशून म्हणाले,” Underline this sentence and pay attention to what I say, Learn it by heart, tomorrow.” आणि प्रस्तुत विधानाची विशेषता त्यांनी सखोल आणि विस्तृत विशद केली.परंतु त्या वाक्याचा अर्थ आणि त्यावरील सरांचे मार्मिक भाष्य आमच्या आकलनक्षमते बाहेरील होते . तथापि आम्ही त्यांच्या सूचना अमलात आणल्या होत्या.तासभराचा काळ ते वाक्य पाठ करावयास लागला होता परंतु आजही ते वाक्य कंठस्थ आहे.
आज बदलत्या संदर्भात आणि बदलत्या वर्तमान काळात त्याची विशेषता सर्वाधिक जाणवते.
आदरणीय सरांनी कंठस्थ करून घेतलेला वाक्याचा अर्थ होतो ” राष्ट्र तेंव्हाच जन्माला येते, जेंव्हा त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते.” स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे व्यक्तीला स्थळ काळाचे भान असणे होय. जागृती ह्यालाच म्हणतात.जेंव्हा व्यक्ती कोठे आहे आणि त्या स्थानात व्यक्तीचे अस्तित्व कोणत्या काळात आहे; याचा मेळ घालता आला की पराक्रम आणि पुरुषार्थाची साधना सफल झाल्यापासून राहत नाही .त्यासाठी आपणाला जागृतीची नितांत आवश्यकता असते. राष्ट्राच्याही बाबतीत हेच सूत्र लागू पडते .ज्या राष्ट्राला आपल्या अस्तित्वाची स्थलकाळसापेक्ष जाणीव असते ;ते राष्ट्र प्रथम राष्ट्र म्हणून उदयाला येते आणि उदयन्मुख समाजाची जडणघडण करत संपूर्ण विश्वात उच्च स्थानी विद्यमान होते. म्हणून ‘स्व’ ची आणि ‘सत्वा’ ची जाणीव होणं; नितांत आवश्यक आहे. भूतकाळाचे यथार्थ ज्ञान, वर्तमानाचे सजग भान आणि भविष्याचा अचूक वेध ,या तिन्हींच्या संगमावर भारत विकसनशील देश म्हणून गणला न जाता एक विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल ; हेच स्वप्न मध्ययुगीन शिवकालात छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिले आणि आपल्या बाहुबलाच्या सामर्थ्यावर;आपल्या निष्ठावंत सहकाऱ्यांच्या साह्याने हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करून सत्यसृष्टीत उतरविले.



जय देव जय देव शिवराया – कवी वि. दा. सावरकर – सादरीकरण – गीता गद्रे


यावर आपले मत नोंदवा