येथ मांगल्य नांदावे !

•| ॐ |•
आनंदाचे धाम माझे
दत्तप्रभूचे नाम रे
रात्रंदिन मी करते
तो जे सांगे ते काम रे
एका नामी मिळतो
मला सारा विश्राम रे
देवा,
तुझ्या नामी असा विसावा
पुन्हा दुसरा जन्म नसावा
मी ना थकले ना विटले ना
तुझ्या सुंदर जगावर रुसले
पण
तूच सांग बरे
मी बोलते ना खरे
मग थेंब चाखता अमृताचा
कसा धरावा आग्रह रे मी मला
माघारी फिरण्याचा ?
देवा,
तुझ्या नामातली गोडी
स्वस्वरूपाशी जोडी
प्रेमे तव बहरले अंतर
ओढ आता तुझीच निरंतर !

वृंदा आशय
संपूर्ण समर्पण!
श्रीकृष्णार्पणमस्तु!

•| ॐ |•
ही मायभू ही पुण्यभू
ही कर्मभू ही धर्मभू
ही मूल्यभू ही ज्ञानभू
आज देवा,कर्तृत्वाने
राखलीत तुम्ही मर्मभू
एक प्रार्थना,
प्रिय ईश्वरा
इथे वाहावा प्रेमझरा
प्रत्येक ह्दयी लागो
प्रेमाचा नंदादीप
कृतज्ञतेने उजळो जीवन
ही भूमी होवो प्रदीप !
संपूर्ण समर्पण मॉं !
यावर आपले मत नोंदवा