सरस्वतीची वीणा आली खड्ग होऊन हाती ….

संपूर्ण समर्पण माँ !
रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी स. भु. विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे ‘सलग १८ तास वाचना’चा जो उपक्रम घेण्यात आला त्यात गवसलेल्या या पुस्तकाने माझी दृष्टीच पालटली त्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार ! आता माझी सृष्टीही बदलावी ही विधात्याच्या चरणी कळकळीची प्रार्थना !
संपूर्ण समर्पण !

,,,,,व्यावहारिक विद्या वा शास्त्रे शिकविणारे, किंवा धंदेवाईक धर्मगुरू वा भिक्षुक यांना गुरू मानण्याची चूक करू नये. ते गुरू नव्हेतच! ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे, एवढेच नव्हे तर जो शिष्याला आध्यात्मिक साह्य करून आत्मसाक्षात्कार घडवितो, तो गुरू खरा. अशा गुरूची महती वर्णनातीत आहे. खऱ्या गुरूची योग्यता भारताशिवाय अन्यत्र ठाऊकच नाही. भारतात परमेश्वररूप समजूनच गुरूची पूजा होते. आध्यात्मिक उन्नतीकरिता गुरूची खरीखुरी गरज भारतीयांव्यतिरिक्त इतरत्र जाणवतच नाही, आणि म्हणून आपले बहुतेक धर्मग्रंथ खऱ्या गुरूच्या आवश्यकतेची व त्याच्या महतीची विलक्षण थोरवी गातात.
अधिक स्पष्ट सांगायचे म्हणजे, जीवात्म्याला दुसऱ्या आत्म्यापासूनच प्रेरणा मिळू शकते, अन्य कशापासूनही नाही. जन्मभर ग्रंथांचा अभ्यास केला आणि खूप बुद्धिमत्ता मिळविली तरी शेवटी असे आढळते की आध्यात्मिक दृष्ट्या थोडीही प्रगती झालेली नाही. पारमार्थिक गोष्टींबद्दल अथवा अध्यात्म व वेदान्त या विषयांवर आपण उत्कृष्ट भाषणे देऊ शकतो; पण प्रत्यक्ष आचरणाची वेळ आली, किंवा पारमार्थिक जीवन व चारित्र्य यांची कसोटी लागण्याची वेळ आली की आपले नैतिक सामर्थ्य फारच कमी पडते असे दिसून येते. याचे कारण हेच की पारमार्थिक वाढ होण्याच्या दृष्टीने पुस्तकी ज्ञान अगदी कोते आहे. आध्यात्मिक प्रगतीला वेग मिळावा याकरिता प्रेरणा दुसऱ्या आत्म्याकडूनच मिळाली पाहिजे. अशा प्रेरणेचा प्रभाव इतरांच्या पूर्ण पवित्र व उन्नत अंतःकरणांवर पडतो, त्यांतून आत्मिक शक्ती निर्माण होते व ती सर्वत्र शांती निर्माण करते, आणि संबंध येईल त्या जीवांना प्रभावित करते. अशी प्रेरणा ज्या महात्म्याकडून मिळू शकते त्याला गुरू म्हणतात खरा विश्वासू गुरू, आणि ज्याच्या अंतःकरणाला प्रेरणा मिळते त्याला म्हणतात शिष्य – खरा अनुयायी.

ही मायभू ही पुण्यभू
इजस्तव स्वीकारली
आता क्षत्रियता
….. सावध व्हावे
अन्यथा
भूई कमी पडेल पळता !
संपूर्ण समर्पण!
•|ॐ|•
वासुदेवा
वासुदेवा तुझा करते मी धावा
घेऊन जा ना मला
तू तुझ्या गावा
मागून तुला रे
मी काय मागितले?
माझे एक स्वप्न चिमुकले
पण ठाऊक नाही
काय आले तुझ्या मनी
केलीस तू माझीच चिमणी
फक्त म्हणालास भुर्र
मी उडून पडले दूर
क्षणात पालटलास सारा नूर
परत एका क्षणात
सारं पालटशील का?
चिमणीला तिचं घरटं देशील का?
वासुदेवा……
श्रीकृष्णार्पणमस्तु!

•| ॐ |•
हे दशरथसूत हे कौसल्यानंदन
सद्भावे करते रे मी तुजला वंदन
तुझ्या धनुष्याने रेख आता तू
प्रिय विजयाचे ते भालचंदन
संकटात पडली माझी माता
अन् कृष्ण सांगतो रोज कथा
आता नाही आता नाही, रामा
थांबणे आता एक क्षणही नाही
कृष्णा, ठेव आता ती बासरी
अन् घे हाती तो पांचजन्य
तुज शंखध्वनीशिवाय मज
न ऐकणे आता काही अन्य !
वृंदा आशय
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!

•|ॐ|•
मंत्रास्त्र
शब्द येथले शब्द नाहीत
मंत्रास्त्र होऊन येतात ते
सर्वस्व त्यागून निर्मिले जे
मज भारावून टाकते ते
ओसाड नाही ही भूमी
रत झाले इथे निर्मोही
कर्मे रूजली जी इथे
आज उगवताना पाहते
ओढ लागली या सूर्याला
सत्याची अन् सातत्याची
साक्ष मिळते विस्ताराची
वृक्ष देती दिशा भविष्याची
शुभं भवतु!
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!

•| ॐ |•
आप मेरे श्रीराम हो
करते मेरा हर काम हो
भूमि से जो जन्म लिया है
नाता उसी से जुड़ गया है
इतनी प्यारी इतनी सुंदर
धरती कैसे हो सकती बंजर
पुण्य यहाँ का है सृजन
संभल सके इसे सिर्फ सुजन
मेरी जीवन का
जो बनती है सावन
कैसे छल सकता है
इसे कोई रावण
प्रभु,
आप हो आप हो आपहो
तो दूर तो
हर पाप हो पाप हो पाप हो |
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!
यावर आपले मत नोंदवा