विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

भान काळाचे तेजोमय उद्याचे !

श्रीकृष्णार्पणमस्तु !

https://vrunda-deshpande-joshi-aabhai.blogspot.com/2026/07/blog-post.html

स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुलांच्या भेटीला – आभाई !



https://www.facebook.com/share/p/1D5ECyHGUT

A circuit ending where at first began
Is dubbed the forward and eternal march
Of progress on perfection’s unknown road.
Each final scheme leads to a sequel plan.
Yet every new departure seems the last,
Inspired evangel, theoriey ‘s ultimate peak,
Proclaiming a panacea for all Time’s ills
Or carrying thought in its ultimate zenith flight
And trumpeting supreme discovery;
Each brief idea, a structure perishable,
Publishes the immortality of its rule,
Its claim to be the perfect form of things,
Truth’s last epitome, Time’s golden best.
But nothing has been achieved of Infinite worth:
A world made ever new, never complete,
Piled always hahf-atttempts on lost attempts
And saw a fragment as the eternal Whole.

  • SAVITRI, SRI AUROBINDO. P- 198.

https://www.facebook.com/share/p/1BSVgTyYa1


काल दि. ०४ जुलै रोजीच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !


चिंतनाचे शुभचिंतन !

https://vrunda-deshpande-joshi-prasangik.blogspot.com/2026/07/blog-post.html

          माझे स्वतःचे असे प्रांजळ मत आहे, आजच्या परिस्थितीचे खरे कारण हे,  ‘मराठीचे तास कुठे करायचे असतात का?, या मानसिकतेमध्ये आहे.’ पूर्वीच्या काळी अगदी सातवीचा वर्ग पास झालेल्या माणसांचे ज्ञान हे पदवी प्राप्त केलेल्या माणसांइतके असायचे ही वस्तुस्थिती आहे. कारण तत्कालीन शिक्षणाचा दर्जा त्याला कारणीभूत होता. अन्य साधने फारशी उपलब्ध नसल्यामुळे आणि ‘वाचनाने माणूस वाचतो’ हे कळल्यामुळे माणसं वाचत होती. अवांतर वाचन करा, असं सांगावं लागत नव्हतं. अशा माणसांनी ‘मराठीचे तास कुठे करायचे असतात का?’, असं म्हणलं तर कदाचित चालू शकेल. मात्र गुणवत्ता यादीमध्ये आलेले विद्यार्थी जेव्हा एखादा अर्ज लिहिताना ‘मी अचूक पद्धतीने अर्ज लिहू शकेल’ हा आत्मविश्वास दाखवू शकत नसतील, तर तिथे केवळ विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून चालत नाही, तिथे शिक्षणाचाच दर्जा तपासावा लागतो. आठवीच्या वर्गापर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना विनासायास पास करणार असू आणि दहावी मध्ये त्यांनी पास व्हावे, अशी अपेक्षा करणार असू तर हे कोणत्या गणितात बसते हे मला कळत नाही. खरं म्हणजे मी श्री अरविंदांची शिक्षण प्रणाली वाचलेली असल्यामुळे ‘परीक्षा नाही’ हे धोरण मला फार योग्य वाटते. मात्र सर्वसामान्यांमध्ये  ‘परीक्षा नाही = अभ्यास नाही’ असे एक सर्वमान्य सूत्र नकळत तयार व्हायला लागते. आजच्या काळात जेव्हा या विद्यार्थ्यांना मोह घालणारी अनेक व्यवधानं आहेत तिथे तर विचारायलाच नको. त्यामुळे परीक्षा द्यावी लागेल आणि विद्यार्थ्यांचा पुरेपूर कस लागेल अशा कसोटीवर ती घेतली जाईल अशी मानसिकता जेव्हा पालक आणि शिक्षक हे दोघेही स्वीकारतील तेव्हाच विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकेल. 


सीइटी परीक्षेनंतर अभियांत्रिकी शाखा प्रवेशाची लगबग सुरु आहे. त्यानिमित्ताने अभियांत्रिकी शाखा प्रवेशास मार्गदर्शक अशी गतवर्षी घेतलेली मुलाखत पुनर्प्रकाशित करत आहे. ( ही मुलाखत वरील व्हिडिओमध्ये ९ मिनिटे ४५ सेकंदानंतर सुरु होते.)


गोकुळी मी कृष्ण झालो

जन्मलो मथुरेत मी अन् वाढलो नंदाघरी ! गोकुळी मी कृष्ण झालो, नांदतो सर्वांतरी ! ।। धृ० ।।

साधु-धर्मा रक्षण्याला, दक्ष आहे फार मी वारण्या भू-भार सारा, घेतसे अवतार मी चंद्र झालो, सूर्य झालो मी प्रभंजन-बासरी !
गोकुळी मी कृष्ण झालो, नांदतो सर्वांतरी ! ।।१।।

मीच विश्वाधार होतो, भूमिही आंदोळता लक्ष्मी माझ्याकडे ये, ये मला सांभाळता आत्मज्ञानी मीच योगी, मीच योद्धा संगरी !
गोकुळी मी कृष्ण झालो, नांदतो सर्वांतरी ।।२।।

मृत्युच्या पडद्यापुढे जे, विश्व तेही आकळे काय शिजले ते मला हो, वास न येता कळे मीच कर्ता-करविताही, मी जळी स्थळि अंबरी !
गोकुळी मी कृष्ण झालो, नांदतो सर्वांतरी ! ।। ३ ।।

माझिया आज्ञेविना ते कार्य कोठे ना घडे मीच सौभाग्यास देतो दान, ते कुंकू-चुडे मंत्र मी झालो ऋषींचा, दास मी संता घरी !
गोकुळी मी कृष्ण झालो, नांदतो सर्वांतरी ! ।।४।।

मी मनांच्या फत्तरांचे, वितळितो ज्ञाने खडे कर्म-भक्ती-अत्तरांचे, शिंपितो जगती सडे मी उरातुन, मी घरातुन हासतो गिरिकंदरी
गोकुळी मी कृष्ण झालो, नांदतो सर्वांतरी ! ।।५।।

भक्तिचा त्या मी भुकेला, भक्तकार्या जाइ मी जन्म-मरणा पार करुनी, पुण्यवंता नेई मी मीच भक्ता पोचवितो, मुक्तिच्या त्या बंदरी !
गोकुळी मी कृष्ण झालो, नांदतो सर्वांतरी ! ।।६।।

बायबलि अन् चर्चमध्ये, ख्रिश्चना मी ख्रिस्त-अल्ला त्या कुराणी, त्या मशीदी, मुस्लिमांचा मीच अल्ला मीच गीता सांगतो अन् देव झालो मंदिरी !
गोकुळी मी कृष्ण झालो, नांदतो सर्वातरी ! ।।७।।

000

कवी – मुल्लाअल्ली अब्बास


श्रीकृष्णार्पणमस्तु !

यावर आपले मत नोंदवा