विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

The day of celebration !

|| ॐ ||

श्री मॉं!



देवेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

राम-लक्ष्मणासारखा बंधुभाव सर्वत्र नांदता राहो


श्री. संकर्षण कऱ्हाडे यांनी ऋषीकेश एन्टरप्राइझचे केलेले मनमोकळे कौतुक ही ऋषीच्या मेहनतीला आणि कल्पकतेला मिळालेली रसिक दाद ! ऋषीकेश आणि अपेक्षा यांचे हार्दिक अभिनंदन आणि अधिक मेहनतीसाठी खूप खूप शुभेच्छा !

सहज किंवा चुकून डॉ. सुधीर रसाळ सरांचा ‘हार्दिक अभिनंदन’ असा संदेश आला. गुरुवर्यांचा आवाज ऐकूनच जीव मोहरतो. असा आशीर्वाद तर जीव फुलवणाराच !


आत्मसत्ता !

होऊन वृत्ती – प्रवृत्तींचे घर्षण
जेथ सुखाचे वर्षण
दुःखाचे अवर्षण
षडरिपूंच्या पलीकडे जाता
घडते रे कृष्णाचे दर्शन !

कृष्ण भेटाया
नाही व्हावे लागत
मीरा आणि राधा
कृष्णाला माझ्या हवा
फक्त भक्तिभाव साधा !

कसली सत्ता, कसली मत्ता
उडवितो कित्येक राजसत्ता
गिरवूनी संस्कृतीचा कित्ता
त्या परमात्म्यासी भेटाया
साधावी आत्मसत्ता !

भेटता आत्मा-परमात्म्याशी
हे सत्य तू जाणसी
येथे कृष्ण धरे चक्र
अन् राम धरी कोदंड
राजदंडापेक्षा नित्य श्रेष्ठ धर्मदंड!

वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु!

संपूर्ण समर्पण मॉं!


प्रतिक्रिया व्यक्त करा