विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

कृष्ण सावली

ही कृष्ण सावली करे मज कृष्ण सावळी!


भारताचे जीवितकार्य – ५४

दि. ०४ ऑक्टोबर १९७१

(भारतासमोर असलेल्या विविध समस्यांना तोंड देण्यासाठीचे उपाय श्रीअरविंदांनी वेळोवेळी सांगितले होते. ते विविध भारतीय भाषांमधून प्रकाशित करून, भारतीय जनसमुदायांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ‘श्रीअरबिंदोज ॲक्शन’ या सोसायटीतर्फे व त्यांचे मुखपत्र असलेल्या ‘श्रीअरबिंदोज ॲक्शन’ या इंग्रजी नियतकालिकातर्फे केले जात असे. या नियतकालिकाच्या संपादकांशी बोलताना श्रीमाताजींनी असे सांगितले होते की, …)

१) शिक्षण हे प्रादेशिक भाषेतून दिले गेले पाहिजे.
२) संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा असली पाहिजे.
३) इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असली पाहिजे.

  • श्रीमाताजी (CWM 13 : 375-376)

अधिक माहितीसाठी वाचा :
श्रीअरबिंदोज ॲक्शन (इंग्रजी नियतकालिक) -https://mr.wikipedia.org/s/7jdk)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

**

India’s Life-Mission – 54

04 October 1971

(Sri Aurobindo had, from time to time, articulated solutions to address the various challenges confronting India. The task of disseminating these solutions to the Indian masses — by publishing them in various Indian languages — was undertaken by the ‘Sri Aurobindo’s Action’ Society and its English periodical of the same name, which served as its mouthpiece. While conversing with the editors of this periodical, The Mother stated that…)

(1) the regional language should be the medium of instruction,
(2) Sanskrit should be the national language, and
(3) English should be the international language.

  • The Mother (CWM 15 : 57-58)

Do visit and subscribe to our website auromarathi.org and YouTube channel AUROMARATHI.


•| ॐ |•

संवाद कृष्णसखीशी !

सांगे मज कृष्णसखी
उमलून गंध येतो
आतून त्या कळ्यांचा
मग का छंद लागतो?
फुललेल्या पाकळ्यांचा!

उमलता ते फूल
इतरांस पडते भूल
धावत येती फुलपाखरे
होऊन चंचल नाचती क्षणभर
या फुलावरून त्या फुलावर

होऊन ज्याचा भोवरा
मारत राहतो चकरा
होता सांज तो भृंगराज
अडकून कमलपुष्पी
जाणतो सारे राज

होऊन सूर्योदय
फुलता फूल
भुंग्यासही लागते
प्रकाशाची चाहूल
तो उडून जातो स्वैर

कधी करते का फूल
त्या भुंग्याशी वैर
सखे, जाणून घे
अंतरात्म्याचे गूज
बघ, अंकुरलेले बीज !

संपूर्ण समर्पण!
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!


•| ॐ |•

कृष्णकळी

मी म्हणले कृष्णाला
कृष्णा, संपली तृष्णा

कृष्ण म्हणे मग
उत्तर दे एका प्रश्ना
का फिरते इकडे तिकडे
कधी मी कधी सखी कधी राम
का करत नाही गं तू आराम ?

खळखळून मी हसले
कृष्णानेही वळून पाहिले

मज ठाऊक कृष्णा
शिवशक्तीचा खेळ
अन् या जगताचा मेळ
ठाऊक रे मज
एकरूप तू सखी आणि राम!

समजून तुम्हा वेगळे मी ठरेल खुळी
अलगद फुलली मग ती कृष्णकळी !

संपूर्ण समर्पण!
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!


•| ॐ |•

कृष्णसंवाद

मी : कृष्णा, काल आपण घेणाऱ्याच्या भूमिकेबद्दल बोललो. आज तू मला घेणाऱ्याचा भाव कसा असावा हे सांग बरं.

कृष्ण : त्याच्या वजनानुसार.

मी : (चमकून) काय ? वजनानुसार ? म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला?

कृष्ण : अरे देवा! आता वजन म्हणजे काय हे पण मलाच समजावून सांगावं लागणार का?

मी : तसं नाही रे. पण मला जी वजनं माहिती आहेत त्याच्यामध्ये एक आम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर करतो ते आमच्या शरीराचं वजन, भाजीपाला किराणा घेतो तेव्हा त्या वस्तूंचं वजन ; एवढेच ठाऊक आहे रे.

कृष्ण : अगं मग इथे पण तसंच आहे. तुमच्या मनातल्या भावाचं जेवढं वजन तेवढं तुम्ही घेणार.

मी : बापरे ! भावाला पण वजन असतं मला खरंच नव्हतं रे ठाऊक कृष्णा !

कृष्ण : अगं या भावाचं वजन मनाच्या शुद्धतेवर ठरतं.

मी : म्हणजे कसं?

कृष्ण : तुला ती सत्यभामा आणि रुक्मिणीची कथा ठाऊक असेल ना?

मी : हो. सत्यभामेनं नारदांना तुलाच दान देऊन टाकलं होतं तीच कथा ना !

कृष्ण : अगदी बरोबर. सांग बरं त्या कथेचा सार?

मी : सत्यभामेच्या सोन्याचं जितकं वजन भरलं नाही, तितकं रुक्मिणीच्या एका तुळशीपत्राचे भरलं बघ. मी अगदी सद्गदित होऊन म्हणाले –


घ्यावे कृष्णभावे
घेता घेता कृष्ण व्हावे!

कृष्ण : बापरे ! तू तर एक पाऊल माझ्यापुढे निघालीस की.

आम्ही दोघेही खळखळून हसलो आणि मग आमच्यापेक्षा आमचं मौनच अधिक बोलत गेलं.

संपूर्ण समर्पण!
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!



संपूर्ण समर्पण !

श्रीरामकृष्णार्पणमस्तु!

यावर आपले मत नोंदवा